संघर्ष एक कथा _भाग एक

This is about a boy from village how he fight with problems & achieves sucees

                                                            संघर्ष  एक कथा 

शालिनी ला आत्ताच नववा महिना लागला होता. शालिनी एका आडगावात तिच्या सासूबरोबर राहत होती . शालिनीचा नवरा नोकरी निमित्ताने शहरात एकटाच राहिला होता . तसे हे शालिनीचे काही पहिले बाळंतपण नव्हते . त्याचा पहिला मुलगा माधव - ४ वर्षांचा , दुसरा मुलगा २ वर्षांचा आणि १ मुलगी ९ महिन्याची होती . शालिनी चे हे चौथे बाळंतपण होते  . सातव्या महिन्यात शालिनीचा नवरा म्हणजे मंगेश तिला आणि तिच्या मुलाला घेऊन गावी आला होता . तेव्हा शालिनीला गावीच ठेवून पुन्हा तो एकटाच शहरात गेला . शालिनी पण जरा हौशीने राहायला तयार झाली . तशी ती त्याच गावात लहानाची मोठी झाली होती . शिवाय नदीपलीकडे तीच माहेर  पण होत . नदीच्या अलीकडे माहेर  आणि पलीकडे सासर . त्यामुळे नवरा शहरी गेला कि चार पाच दिवस आईकडे राहायला मिळेल . जात नाही आलं तर आई भेटायला येईल . या आनांदात ती पण या अशा अवस्थेत ती गावी राहायला तयार झाली .

गावातील जीवन वाटते तितके सोप्प नाही हो. नदीवर भांडी घासायला , कपडे धुवायला जायचं. हांडे च्या हांडे भरून पाणी आणायचं .घरात गॅस नाही चुलीवर जेवण करायचं . याशिवाय लाकडे गोळा करणे, घर शेणाने  सारवणे  अशी अनेक काम असतात . शेती असेल तर तिकडे पण बघायचे . सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत काम आणि काम  या शिवाय काही उदयोग नाही . शालिनी पण हि सर्व काम जमेल तशी करत होती . शिवाय तिची   लहान मुलं पण होतीच त्याचं करण्यात  तीचा वेळ निघून जायचा .

दोन चार दिवसांनी ती आई कडे गेली .आई ने पण तिचे आणि नातवंडांचे  काही करण्यात कसूर सोडली नाही . लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी शालिनीला तिच्या आई ने न्हाऊ घातले . आई च्या हाताचे आवडीचे पदार्थ खाल्ले . थोडा आराम करून पुन्हा सासरी आली . असे करता करता आठवा महिना पूर्ण झाला आणि नववा महिना लागला

जसा नववा महिना लागला शालिनीला भीती वाटायला लागली . डिलिव्हरी इकडे गावात करणार कशी? तिकडे ना हॉस्पिटल ना दवाखाने . होते पण ते तालुक्याच्या गावी . गावातून बाहेर पडण्यासाठी आधी नदी ओलांडावी लागायची . तेव्हा कुठे रिक्षा वगैरे मिळू शकेल . शिवाय शालिनीच्या आधीच्या सर्व  डिलिव्हरी हि शहरात हॉस्पिटल ला झाल्या होत्या . गावात बायका सुईणीलाच बोलवायच्या .

शालिनीची सुईणीकडून डिलिव्हरी करून घ्यायची तयारी नव्हती .शहरातून यायच्या आधी ती चेक अप  करून आली होती त्यामुळे तिला अंदाजे तारीख माहित होती . अजून १५ दिवस आहेत डिलिव्हरी ला .

इकडे मंगेश ला वाटले कि इकडे  मी ऑफिस ला गेल्यावर बघायला कोणी नाही तर ती  गावी आहे ती  बरी आहेत . गावातल्या इतर बायका नाही का सुईणीकडून डिलिव्हरी करून घेतात . त्यामुळे दोन महिन्यात तो आला नाही तिला घ्यायला . शिवाय त्याची आई ,तिची आई आणि वडील पण होती त्याच गावात म्हणून हेच योग्य वाटले त्याला .

शेवटी शालिनीने मंगेश ला पत्र लिहले . माझे दिवस भरत आलेत तर तुम्ही शनिवारी मला घ्यायला या . मला सुईणीकडे डिलिव्हरी ची सवय नाही . मागच्या वेळी सारखे आपण हॉस्पिटलात जाऊ .

मंगेश हा पोस्टात काम करत होता त्यामुळे कुठूनही पत्र  आले  कि लगेच  ते त्यांच्या हाती पडे . पुढील दोन दिवसातच मंगेश ला आपल्या बायकोचे पत्र मिळाले . मंगेश ने  पत्र  वाचल्यावर ठरवले कि तसाही महिना संपायला २ दिवस राहिलेत . पगार झाला कि लगेच गावी जाऊन बायकोला डिलिव्हरी साठी इकडे शहरात आणू . त्याकाळी आता सारखे फोन नव्हते . जर काही अर्जेन्ट  असेल तर पत्र लिहायचे आणि अगदीच जीवन मरणावर असेल तर तार पाठवली जायची . पूर्वी लोकांना पगार पण फार  कमी असायचे त्यामुळे तार वैगैरे करणे सहज सहजी परवडायचे नाही .

मंगेश हा त्यांच्या आई वडिलांनाच मोठा मुलगा . आई वडिलांनी अतिशय गरिबीतून आणि हाल अपेष्टेतून मुलाला मॅट्रिक  पर्यंत शिकवलं . मॅट्रिक पर्यंत म्हणजे त्याकाळचे खूप शिक्षण झाले . सहसा मुले तेव्हा शाळेत जातच नसत . गाई गुरांना रानात चरायला न्यायाचे .. शेतावर राबायचे . या सगळ्या  कामातून शाळेत जायला वेळ कोण काढणार ? आणि आता आपण मुलांना क्लास  लावतो, त्यांचा अभ्यास घेतो . मुलांपेक्षा मुलांचे पालकच  जास्त अभ्यासात गुंतलेले असतात . पण मंगेश चा काळ साधारण इथून मागे ६० वर्षांपूर्वीचा आहे . म्हणजे त्यांचा जन्म साधारण 60 वर्षांपूर्वी झालेला असावा . असावा या साठी त्याकाळी कोण जन्म तारीख बघतय .सगळ्यांच्या जन्म तारखा  १ जुन असायच्या कारण तेव्हा नावाला शाळेत टाकताना शाळेचे हेड मास्टर त्यांचा पुन्हा जन्म करीत असत . थोडीफार वडिलोपार्जीत शेती होती त्या शेतीवर घरातल्यांची पोट भरेल  इतकीच  पोतं  धान्य शेतात पिकायचं . हातात खेळता पैसा नसायचा  त्यामुळे जेव्हा पण पैसे खर्च करायची वेळ येईल तेव्हा ते कुणाकडून तरी उसने घेऊनच तो व्यवहार व्हायचा .

मंगेश खूप मेहनती , हुशार आणि जवाबदार मुलगा  होता . घरी आई  वडिलांवर  त्याचं  खूप प्रेम होतं .  वडिलांनी का कुणास ठाऊक पण मंगेश च शिक्षण परिस्थिती नसताना पण चालू ठेवलं . मंगेश पण वडिलांच्या  आशेचा किरण विझू देत नव्हता . घरातील काम, शेतातली काम . गुरं ढोरांना चरायला न्यायचं . नदीवर जनावरांना आंघोळीला न्यायचं . आणि आपण  पण मित्र  मंडळींबरोबर नदीत सूर मारत असे . मुळात जे आहे ते आहे . आणि जे आहे हे असच राहणार आहे किमान आपण नोकरीला लागत नाही तोपर्यंत तरी याची त्याला कल्पना आली होती . त्यामुळे या सर्व कामातून वेळ काढून मंगेश अभ्यास मात्र नक्की करत असे . शाळेत शिक्षक पण त्याच नाव

काढत असत . बाकीच्या मुलांना त्यांचं उदाहरण देत असत " बघा मंगेश कडून काहीतरी शिका , तो कसा अभ्यास करतो . " शाळेचे मुख्याध्यापक दीक्षित गुरुजींचा मंगेश आवडीचा विद्यार्थी होता .

आई वडील आणि गुरु जनांचे आशीर्वाद ज्याच्या मागे आहेत त्याचं देव सुद्धा वाईट करू शकत नाही . मंगेश मॅट्रिक झाला आणि चांगल्या मार्कांनी पास झाला .

त्याच्या बरोबरचे मुलं कामधंदा शोधायला लागली . कोणी आई वडिलांबरोबर  शेतीच  करू लागले . कोणी काका कडे , कोणी मामा कडे नोकरी मिळतेय का ते बघू लागले ? मंगेश ला बाकीच्या मुलांपेक्षा मार्क तर चांगले पडले होते पण बाकीच्या मुलं सारखा सपोर्ट नव्हता . आई वडील म्हातारे झाल्यामुळे बाहेर गावी नोकरी   ला जावं का नाही जावं हाही प्रश्न  होता . बाहेर गावी तर सोडाच पण गावाच्या वेशी बाहेर पण कधी जाण्याचा योग आला नव्हता .

मंगेश ला दीक्षित गुरुजींनी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्ये नाव नोंदवायला सांगितलं म्हणून मंगेश ने त्यात नाव नोंदवून ठेवलं होतं . त्याच दरम्यान त्यांच्या ओळखीचे एक गृहस्थ त्यांच्याकडून कळले कि मुंबईला मोठं मोट्या मिल आहेत तिथे त्यांना मिल मध्ये काम करायला कामगार हवे असता . जर शिक्षण झालाय असे त्यांना कळले तर स्टाफ मध्ये क्लर्क चे काम पण मिळते .

मंगेश ने बरेच दिवस एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मधून काही कॉल येतो का म्हणून वाट बघितली . पण काहीच होत नाही हे बघितयलवर मुंबई ला मिल मध्ये कमला जायचे ठरवले . गावात कोणाचा मामा , कोणाचा काका मुंबईत आहे का याची चौकशी सुरु झाली ? पूर्वी अशी गाववाले म्हणून बऱ्याच लोकांना मुंबई करांना मदत करावी लागत असे . आणि तो काळच असा होता कि हे काम लोक आवडीने करत . हॉटेल, लॉज या गोष्टी काय असतात हे माहीतच नव्हतं . अशीच ओळख काढायची आणि जायचं अशीच सर्व काम व्हायची.

अशीच ओळख जातभाई काढत मंगेश मुंबईला गेला . मुंबई मध्ये थोडे दिवस मिल मध्ये काम केलं . पण आई वडील  गावी एकटेच आहेत या विचाराने मंगेश चे मन मुंबई काही रमेना . पण करणार काय ?आता पैसे कमविणे हे एकच आयुष्याचे ध्येय होते , थोडे दिवस कड काढला तर परिस्थिती सुधारेल अशा आशेवर मंगेश ने ४ महिने मुबंईत काढले . थोडे फार पैसे साठल्यावर घरी आई वडिलनां भेटायला मंगेश गावी आला खरा पण पुन्हा मुंबईला जायला त्याचा पायाच निघेना . म्हणावा तसा कामावर जम नाही म्हणत घरी राहिला . वडील थोडे वैतागायचे पण करणार काय ?

अशातच पोस्टमन दारात आला . पूर्वी पोस्टमन दारात आला म्हणजे कोणाची तरी गेल्याचीच बातमी असायची . कोणाला एवढा वेळ आहे पत्र पाठवून चौकशी करायला ? आणि खरं सांगते हल्ली कसा आपल्याला फोन कोणी केला नाही तर राग येतो तास पूर्वी पत्र  नाही पाठवले म्हणून कोणी रागवायचे नाही .

मंगेश घरीच होता नुकताच नदीवरून एक सूर मारून आला  होता . तर पोस्टमन पत्र  देऊन गेला .

ते पत्र एकदम खास होतं . एम्प्लोमेन्ट एक्सचेंज तर्फे सरकारी नोकरी चा कॉल आला होता . ते पत्र पाहून मंगेश इतका खुश झाला कि ओसरीवर उड्या  मारू लागला .गत  जन्मीचे पुण्य म्हणावे कि काय नोकरी चा कॉल तेही सरकारी नोकरीचा कॉल .

मंगेश ने घरी सांगितले . आई बाबा  पण खूप खुश झाले . सर्वांनी देवाचे मनोमन आभार मानले . आणि ते लेटर घेऊन मंगेश त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकान कडे गेला . त्यांना हे लेटर दाखवले . ते पण खुश झाले म्हणाले " गावाचे नावं काढलेस हो पोरा "

🎭 Series Post

View all