संघर्ष एक कथा _भाग २

In thsi part how mangesh arranges money for travelling and joining new job

                                                       संघर्ष  एक कथा _भाग २

क्रमश:भाग १

मंगेश " सर मला कॉल तर आलाय पण मी जाऊ शकेन कि नाही . मलाच माहित नाही "

दीक्षित गुरुजी " का रे ? काय झाले ? काही अडचण आहे का ?

मंगेश " सर मला दोन दिवसांनी रुजू होयला सांगितलय . पण  तिकडे जाण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत . "

दीक्षित गुरुजी " अरे असा हिरमुसून नकॊ जाऊ , पैशाची सोय होईल. हि संधी सोडू नकोस . सरकारी नोकरी अशी कोणालापण आणि कधी पण नाही मिळत ."

मंगेश " ठीक आहे सर , निघतो आता .

 दीक्षित सर " मंगेश तुझी काहीच सोय नाही झाली तर तू जायच्या आधी माझ्याकडे ये मी बघतो काही करता येते का ते ?

मंगेश  मान हलवून निघून गेला .

पूर्वी पगार पण फार कमी असायचे . असे अचानक पैसे लागले तर सावकाराकडे घरातील वस्तू गहाण टाकायची आणि व्याजावर पैसे घ्यायचे . हे असेच चालू असायचे . मंगेश पण जड पावलांनो घरी निघाला . वडिलांना सांगून काही पैशाची सोय होते का ते बघायचे होते . निदान प्रवास भाडे तरी मिळाले पाहिजे . कारण पहिला पगार आला कि बाकी देणे करता येईल पण तिकडे पोहचल पाहिजे .

शिवाय ज्या शहरात त्याला बोलावलं होत तिकडे तो  यापूर्वी कधीच गेलेला नाही . तिकडे कोणी ओळखीचं पण नाही . हॉटेल लॉज हा तर प्रश्नच नाही . खूपदा लोक s t ,स्टॅन्ड वरच राहायचे . तिकडे बाथरूम मधेच आंघोळ करायचे . काय करणार ओळखीचे नसेल कोणी तर काय करणार . ? अख्ख्या गावात त्या शहरात राहणारे कोणाचं कोण नव्हतं . या सगळ्या गोष्टीच मंगेशला जरा दडपण आले होत . पण दीक्षित सरांनी सांगितल्या सारखं हि नामी संधी सोडायची नव्हती .

मंगेश ने घरी वडिलांना पैशाची काही सोय करता येईल का ते विचारले ?तर वडील म्हणाले तूच घरातील कोणती वस्तू गहाण ठेवायची ते ठरव. तो घरात गेला आणि पाहू लागला कि आता काय ठेऊ शकतो . मंगेश चा आता पहिल्यांदा घरातील स्वयंपाक लक्ष घरात गेले . चार जर्मन ची पातेली , एक हंडा , एक कळशी आणि एक पितळ्याची बदली . राहून राहून त्या पितळ्याच्या बादलीकडे त्याच लक्ष गेले . मंगेश स्वयंपाक घरातून बाहेर  डोळ्यात पाणी घेऊन आला .

हि अशी भांडी विकून का कोणी पैसे उभे करत ?त्याची स्वतःच्या नशिबावर चिडचिड होयला लागली . या गरिबीतून कसं बाहेर पडणार ? नोकरी ऑफर लेटर हातात आहे पण जायला पैसे नाहीत . गावात सावकार सोडला तर सगळ्यांची अशीच अवस्था .

मंगेश ने खूप प्रयन्त केले पण त्याची पैशाची  सोय काय झाली नाही . शेवटी त्याला असे वाटायला लागलं . जाऊदे नको जायला ? आपण इकडेच शेतात काम करू आई बाबांबरोबर.मेहनत करायला माझी तयारी आहेच .शिवाय आई वडिलांबरोबर राहायला मिळेल . त्यांनाही आधार मिळेल . त्याला आठवले कि शाळेत जाताना तो एकटाच असा मुलगा होता कि त्याच्या खाकी पॅन्ट ला मोठं ठिगळ असायचं .या परीस्थितीला तेव्हा नाही लाजलो तर आत्ता कशाला कोसू ?जशी वेळ येईल तशी मारून न्यायाची या व्यतिरिक्त आपल्या हातात काय असतं ?

मंगेश ने जाण्यासाठी मोठी ट्रंक भरली होती . दोन कपड्यांची जोड,एक गोधडी आणि एक चादर . जर काहीच नाही जमल तर स्टॅन्ड वर तरी रात्र काढता आली पाहिजे या हेतूने . मंगेश ओसरीवर शांत बसला होता

पण हि संधी जाणार याचं  दुःख होत होतं  .

तेवढ्यात दीक्षित सर आले

" येऊ का घरी ? मंगेश झाली का तयारी तुझी ?"

मंगेश दीक्षित सरांना अचानक पाहून चकित झाला . सर एकदम घरी कसे आले .

 मंगेश " सर तुम्ही! या ना या ना ."

असे म्हणत ओसरीवर चटई टाकून दिली . आतून पाण्याचा तांब्या भांडं आणलं त्याच बरोबर थोडा गुळ दिला .

पूर्वी आल्या आल्या पाण्याबरोबर गूळ देत असत . चालून आल्यावर थकलेल्या माणसाला गूळ पाणी द्यायचे म्हणजे ग्लुकोज मिळत असावं बहुदा

दीक्षित सर " झाली कारे तुझी तयारी ? म्हटलं तुला जायच्या आधी भेटून घ्यावं एकदा . "

मंगेश  जरा काच कूच करत " हो झाली  तयारी "

दीक्षित सर " काय हवं नको ते घे हो बरोबर . म्हणजे काही अडचण नको यायला .

दीक्षित सरांना त्याची पैशाची सोय झाली का ते विचारायचे होत पण डायरेक्ट कसे विचारू म्हणून  इकडचं  तिकडचं विचारता होते . आणि मंगेश पण हो ला हो म्हणत होता .

तेवढ्यात मंगेश ची आई चहा घेऊन आली

दीक्षित सर  मंगेश चे आई कडे बघून " नावं काढलंन  हो तुमच्या लेकाने. सरकारी नोकरी लागली म्हणजे आता चांगलं झालं. पुढल्या वर्षी लग्न करून टाका . आणि सर मोठं मोठ्याने हसू लागले .

चहा घेतल्यावर सर आणि मंगेश अशाच गप्पा  मारत बसले . अचानक सरांनी पैशाचे बंडल मंगेश पुढे टाकले

दीक्षित गुरुजी " मंगेश आत्ताच पगार घेऊन आलोय कचेरीतुन . तुला यातील किती हवेत ते काढून घे "

मंगेश ला क्षणभर काही कळेच ना .

दीक्षित गुरजी " अरे बघतोस काय ? घे घे मला माहितेय तुझी पैशाची सोय झाली नाही ते . आणि तू मागायला पण येणार नाहीस हे हि माहितेय . म्हणून मीच आलो . अरे कसला विचार करतोस . उद्या सकाळी जायचंय ना . उचल ते पैसे आणि बिनधास्त जा . पैसे काय आज आहे उद्या नसतील पण हि संधी पुन्हा नाही येणार . "

मंगेश च्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले . काय करावं ते कळेना . सरांच्या रूपाने देवचं आज दर्शनाला आला होता .

देवाच हे असाच असत . भक्ताला कोणाच्या ना कोणाच्या रूपात येऊन मदत करत असतो .

मंगेश ने बंडल उचललं . अंदाजे गाडीभाडे किती आहे तो विचारून आला होता . तेवढे आणि प्रवासात थोडे फार जवळ असावे तेवढेच पैसे त्याने त्या बंडलातून काढून घेतले .

बाकीचे बंडल सरांच्या हातात दिले आणि म्हणाला सर तुम्ही म्हणता तसे हे पैसे मी जेव्हा माझ्याकडे येतील तेव्हा परत करेन .

तेवढ्यात बाबा आले . ओसरीवर  सर बसलेले होते .

बाबा " काय म्हणताय मास्तर ".. आज इकडे कसे आलात ."

दीक्षित गुरुजी " मंगेश ला सरकारी नोकरी लागली ना . म्हटलं माझा आवडीचा विद्यार्थी आहे . जायच्या आधी भेटून घ्यावं .

मंगेश " बाबा , सर पैसे घेऊन आलेत . त्यांचं आजच पगार झालाय तर ते मला जायला मदत होईल म्हणून ते पैसे घेऊन आलेत . "

बाबा " मास्तर , तुम्ही कशाला तसदी घेतलीत . शेवटी सर्वानांच आपला संसार आहे "

दीक्षित गुरुजी " ते तर आहेच , पण अशी संधी परत मिळत नाही , म्हणून म्हटलं . असू दे हो मला मुला सारखाच आहे तो "

बाबा " मंगेश अरे त्या सावकाराकडे आपली जमीन गहान  टाकून थोडे पैसे आणलेत . हे घे .

मंगश " बाबा जमीन कशाला गहाण टाकलीत ? आपलं पोट चालत त्यावर "

बाबा " अरे हो तुझ्या जाण्यातच सर्वांची भलाई आहे . जमीन काय आपण सोडवून आणू"

दीक्षित गुरुजी " मी बोलू का ? काहीतरी ? म्हणजे राग मनू नका . हा तुमच्या घराचा विषय आहे .

बाबा " मास्तर आपण जातभाई आहोत . तुम्ही आम्हाला परके नाहीत . बोला काय म्हणताय “

दीक्षित गुरुजी " हे पैसे तुम्ही सावकाराला आत्ताच्या आत्त्ता परत द्या . मी सध्या त्याला लागणारे पैसे दिलेले आहेत . जमीन उगाच व्याजात अडकायाला नको . "

मंगेश " हो बाबा , सर म्हणतात ते बरोबर आहे . मी पगार झाल्या झाल्या सरांचे पैसे परत करिन . आपण अत्ता जाऊन जमीन सोडवून आणू . "

दीक्षित गुरुजी " हो चल मी पण येतो पाहिजे तर बरोबर .

असे बोलून तिघेही सावकाराकडे गेले . सावकार जरा आढेवेढे घेत होता पण गुरुजी आणि मंगेश बरोबर असल्याने त्याच काही चाललं नाही. नाहीतर हि जमीन त्याने आता त्याच्या घशात गेल्यात जमा होती .

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मंगेश नदीवर एक सूर मारून आला . गावातल्या देवालय जाऊन आला . म्हाताऱ्या आई ने त्याला डब्यात रव्याचे लाडू करून दिले आणि मस्त भाकरी भाजी बांधून दिली . शिवाय प्रवासाला निघायच्या आधी पोट ट भरून जेवला . तो दाखवत नव्हता पण त्याचे अश्रू त्याने लपवले होते . आई च्या डोळ्यात , बाबांच्या हृदयात काळजी दिसत होती . बाबा सारखे सांगत होते ,

बाबा " पैसे सांभाळून ठेव रे बाळा . सामानाकडे नीट लक्ष दे "

मंगेश " हो बाबा "

आई " वेळेवर जेवत जा , तिकडे रुजू झालास कि वेळ काढून पत्र पाठव "

मंगेश " हो आई "

मंगेश ला पण डोळ्यासमोर नवीन शहर कसे असेल कल्पनेतलं शहर तयार केले होते . मुंबई सारखंच असावे .मी तर मुंबईत राहिलोय मग हे शहर काय तसेच असेल . अशा विचारात  मंगेश ची जायची वेळ आली .

मंगेश ने घरातल्या देवाला नमस्कार केला . आई ला आणि बाबांना' नमस्कार केला आणि मागे न बघत ड़ोळे पुसत घरातून बाहेर पडला . त्याला निरोप द्यायला अख्खा गाव गोळा झाला  होता . मंगेश ने गाव डोळ्यात भरून घेतला . मोठ्यांना नमस्कार करून आई बाबांकडे लक्ष राहू द्या असे मित्रांना सांगून मंगेश स्टॅन्ड वर पोहचला .

दीक्षित गुरुजी स्टॅन्ड वर आलेलेच होते . स्टॅन्डवरच गुरुजींच्या प या पडून मंगेश गाडीत बसला . खिडकीतून सरांना त्यांच्या डोळ्याचा ओल्या पापण्या पुसताना त्याने पहिले आणि त्याचा हि बांध सुटला . एक मिनिट खाली मा न करून रडून घेतलं . आणि मग शांत झाला .

नोकरीसाठी का होईना पण आपलं घर सोडून जायची वेळ आली कि दुःख तर होतेच . आपल्या लक्षात येत नाही मुलाच्या आयुष्यात त्यांच्या लग्ना आधी चांगल्या नोकरीसाठी त्यांना पण घर सोडावेच  लागते . मुलींना वाटत आम्ही आमचं घर सोडून सासरी येतो आमच्या भावना तुम्हाला काय कळणार ? पण प्रत्येक परगावी नोकरी करणाऱ्या मुलाला विचारा तो पण त्याच स्थितीतून गेलेला असतो . फक्त मुलींसारखे त्याला ओक्सबोक्शी रडत येत नाही ..

🎭 Series Post

View all