संघर्ष एक कथा भाग ५

In this part Mangesh and shalini gets married

                                     संघर्ष एक कथा - भाग ५

क्रमश:भाग ४

मंगेश च्या आई वडिलांनी मंगेश च्या  लग्नाचे चांगलेच मनावर घेतले . दीक्षित गुरुजी तर जाम खुश होते . त्यांना जसा जावई हवा होता तसा  मिळणार होता . मंगेश मध्ये एक प्लस पॉईंट होता माहिते का ? तो म्हणजे सरकारी नोकरी . दीक्षित  सर स्वतः एक सरकारी नोकर होते . govt जॉब म्हणजे जॉब सेफ्टी आणि जॉब सेफ्टी म्हणजे लाईफ  में  नो टेन्शन . आणि मुलीच्या आई वडिलांना ह्या व्यतिरिक्त काय हवं असतं . हा  मंगेश ची परिस्थिती थोडी गरीबी ची होती  आणि मुलगी आपल्या डोळ्यासमोर राहील . घर मातीचं आहे पण तिला कुठे इकडे जास्त दिवस राहायचंय . आज ना उद्या मंगेश तिला त्याच्या बरोबर शहरात नेईलच . उलट शालीनि शहरात राहायला सेट होईल कि नाही हाच मोठा प्रश्न होता .

तसेच घर मातीची असो व सिमेंट चे ते बनतं घरातल्या माणसांनी आणि सजतं त्यांच्या एकमेकांच्या प्रेमाने. आणि पुढील महिन्यात दोघांचे लग्न करायचं ठरवले . लग्न मुलीकडच्यांनी लावून द्यायचे असे ठरले मंगेश ची चांगलीच गडबड आणि धांदल उडाली लग्न म्हटलं कि लगीन सराई आलीच . थोडीफार स्वतःची शॉपिंग , मुलीला शालू आणि मंगळसूत्र आणि निदान एक वेळेचं जेवण तरी द्यावेच  लागेल .शिवाय देवा धर्माचा खर्च होईल तो वेगळाच . तसे नोकरी लागून  ५ महिने च झाले होते . सगळं खर्च होऊन असे किती से पैसे साठले होते आणि त्यात स्वतःचे लग्न सुद्धा आयुष्यात एकदाच होते म्हणून मंगेश पैसे कसे उभे करायचे याचा विचार करत होता . तेव्हा त्याला कळले कि ऑफिस मधून त्याला लोन  मिळू शकते आणि त्या बदल्यात त्याला दार महिन्याच्या पगारातून थोडे थोडे कटिंग होणार मंगेश ने लगेच लोन  ला अप्लाय केले .

लोन चे हे असाच असतं एकीकडचा खड्डा भरायला दुसरीकडे खड्डा खणावा लागतो . मंगेश च्या आयुष्यात लोन पासूनच सुरुवात होत होती . काय करणार त्याच्या आयुष्यात ला संघर्ष कधी संपणार होता काय माहित ? नेहमी हि पैशाची विवंचना प्रत्येक गोष्टीसाठी

मंगेश च्या लक्षात आले कि हे ऑफिस लोकेशन त्याला त्याच्या घरापासून खूप लांब आहे आणि आता इथून पुढे जायचा यायचा खर्च वाढण्याची खर्च वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही . म्हणून मंगेश ने  अजून एक हुशारपणाचे काम केले . त्याने ऑफिस मधून बदली मागितली . त्या जिल्ह्यात अजून बरेच तालुके होते त्यातील काही तालुके त्याचा गावाजवळ म्हणजे साधारणतः २०० किमी अंतर असलेले पण होते . कारण जिल्हा अगदीच लांब म्हणजे ५०० किमी इतका होता . मंगेश तास हुशार होता . कारण आई वडील पण  थकलेत शिवाय लग्न ठरलय म्हणजे काही ना काही निमित्ताने घरी जावेच लागेल आणि गाडीभाड्यात खूप पैसे आणि वेळही जात होता . शहरात सगळ आता व्यवस्थित सेट होत तरी पण त्याने नवीन शहरात बदली मागितली . आणि तिकडे जाऊन नवीन खोली बघितली . त्या शहरात पण तो कधी गेला नव्हता पण आता त्याला याच काही टेन्शन  नव्हतं . एकदा हे सगळे उदयोग केलेले त्यामुळे हे काही नवीन नव्हते आणि त्यात घाबरण्यासारखे काहीच नाही .

बोलबोलता लग्न घटिका आली . मंगेश ने बऱ्यापैकी तयारी केली . थोडे लोन थोडे मित्रांकडून पैसे उधार घेतले आणि गावात एका मंदिरात अगदी साधेपणात त्यांचं लग्न लागले . आणि गम्मत अशी कि वरात घरी आल्यावर जेवण पुरले नाही तर मंगेश च्या आई ने आणि गावातल्या बायकांनी मिळून पिठलं भाकरी केली . मला वाटत जगातले हे असे पहिले लग्न असेल  कि वऱ्हाडी मंडळी पिठलं भाकरी जेवले . त्याकाळचा काळच तसा होता . जेवायला मिळाले हे महत्वाचे . कोणी उपाशी नाही राहिले पाहिजे . मेनू काय आहे त्या पेक्षा पोट भरून मन तृप्त होणं महत्वाचं .

लग्नाच्या रात्रीच शालिनी ला कळले कि आपण एका आडगावात आलोय कारण मंगेश च्या घरात लाइट नव्हते संध्याकाळचे ७ वाजले कि दिवे लागले कि सर्वच जण दिवटे , कंदील लावून बसायचे . पलीकडे इलेक्ट्रिसिटी चे खांब पोहोचलेच नव्हते . अख्खा गाव काळोखात असायचा . आणि शालिनीच्या घरात लाइट होते .

शालिनी चा स्वभाव पण आहे त्यात आनंद मानायचा असाच होता . शिवाय सगळे तिला चिडवायचे काय ग चांगला नवरा मिळाला तुला . सरकारी नोकरी वाला मिळालाय , मज्जा आहे एका मुलीची "

हे ऐकून तिला पण जाम भारी वाटायचं . तसं बाकीचं काय कळतंय .वयच लहान होतं . अजून परीक्षा पण द्यायची राहिली होती . दीक्षित गुरुजी , गुरुजी असून सुद्धा मुलीची दहावी पूर्ण होई पर्यंत थांबले नाहीत . मुलगी पसंत आहे म्हटल्या बरोबर लगेच लग्नाची तयारी केली .

असो पण अशा पद्धतीने मंगेश चे दोनाचे  चार हात झाले . मंगेश ने थोडे दिवस तिला गावीच ठेवले . तशी तिची परीक्षा पण राहिली होती . तोपर्यंत त्यालाही वेळ मिळाला असता नवीन शहरात सेटल होयला .

त्यामुळे लग्न झाले तरी शालिनी ना लग्न झाल्या सारखे वाटे ना . शेवटी तेच गाव ना . सकाळी घरातली काम झाली कि शालिनी तिच्या आई च्या घरी जायची . मनात आलं तर संध्याकाळी घरी यायची नाहीतर तिकडेच आईकडे राहायची . सासू बाई कधी कधी वैतागायची पण काय करणार नवीन नवरीला मंगेश इकडेच ठेवून गेला तिला तरी नवरा नाही तर कसं करमणार ?असे म्हणून सोडून द्यायची .

मंगेश च्या गावी  चकरा वाढल्या . साहजिकच नवीन लग्न झालं होतं . तो काही तरी कारणाने गावी यायचा . पण होयला काय लागलं ह्यात पैसे खूप फुकट जायला लागले .

शेवटी बाबाच म्हणाले " मंगेश असा किती वेळा तू येत राहणार ? त्यापेक्ष तू तुझ्या बायकोला तिकडे घेऊन जा "

मंगेश ला पण हे पटले आणि फायनली मंगेश आणि शालिनी चा राजा राणी चा संसार सुरु झाला .

शालिनी पण पहिल्यांदाच गावाच्या बाहेर आली होती . गाव जेव्हा सोडलंन तेव्हा ती खरी सासरी आली . मनात नवीन संसाराची स्वप्न घेऊन शालिनी मंगेश ची सुख दुःखाची पार्टनर बनून आली . त्यांना गावातून बाहेर पडताना यावेळी गुरुजींचे पण डोळे ओले झाले . त्यांची लाडकी लेक आता त्यांना दिसणार नव्हती . भरभरून आशीर्वाद घेऊन आणि  संसाराची स्वप्न मंगेश आणि शालिनी शहरात आले  नवीन जागा , नवीन माणूस तिला सगळंच परकं वाटतं होतं . इकडचं लोकांचं रहाणीमान आणि तिकडंच राहणीमान यात खूप फरक होता . ती अजूनही घरात परकर पोलका घालायची आणि साडी फक्त बाहेर जाताना घालायची . तिकडे गावी नदी होती तर इकडे विहीर होती . मंगेश ने पहिल्यांदा तिला स्वयंपाक करायला सांगितला तेव्हा ती घाबरली आणि म्हणाली " अहो मला सगळं जेवण बनवता येत नाही . नुसता आमटी  भातच येतो . मंगेश ने डोक्यावर हात मारला .

आतापर्यंत मंगेश जेवण  बनवण्यात चांगला तरबेज झाला होता . मनोहर  कडून त्याने छान भाज्या करायला शिकला होता . एक एक करून शेवटी त्यानेच तिला जेवण बनवायला शिकवले . आणि खऱ्या अर्थाने त्यांचा राजा राणीचा  संसार सुरु झाला . शहरात एक बाग होती . खूप छान मंदिरे होती . चित्रपट गृह होते . मंगेश पण तिला आवडीने कधी गजरा आणायचा , कधी बागेत न्यायाचा , कधी मंदिरात न्यायचा . मंगेश ने त्याला ऑफिस ला जायला एक सायकल घेतली त्या सायकल वर बसून तिला बाजारात न्यायाचा . किती छान ना . सायकल वर बसून मस्त फिरायचे दोघे . गावात असते तर असे मुक्तपणे फिरत नसते आले पण शहरात हा सगळे चालायचं .

दार महिन्याला मंगेश न चूकता  घरी मनी ऑर्डर पाठवायचा . दोन चार महिन्यात एकदा जाऊन पण यायचा अशी तारेवरची कसरत चालूच होती . त्यातच कळले कि शालिनी गरोदर आहे . मग काय आनंदी आनंद च . गावी हॉस्पिटल ची सोय म्हणून त्यांनी इकडेच शहरात हॉस्पिटल मध्ये नाव घातलं आणि जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तिचे आई वडील किंवा त्याचे आई वडील त्यांच्या मदतीला यायचे . हळू हळू त्या शहरात मंगेश सेट होऊ लागला . त्या शहरातील लोक त्याला ओळखू लागले .

शालिनीची पाहिलं ओटीभरण पण मोठ्या आनंदात केले . गावावरून दोघांचेही आई बाबा आले . मंगेश च्या ऑफिस मधल्या काही ओळखीचे फॅमिली आल्या , खूप दणक्यात ओटीभरण झाले .

मग दोघी सासू आणि आई पण थोडे दिवस थांबल्या . सासूबाई तर म्हणाली आता नातवाचे तोंड बघूनच गावी जाणार . मंगेश चे बाबा आणि गुरुजी दोघे निघून गेले गावी परत .

सासू  म्हणत होती "गावी सुईणीने चांगली सोडवली असती . पण ह्यांना नकोय ना ते . ते हॉस्पिटल मध्ये कसं करतात काय माहित बुवा आपण आपला देवावर विश्वास ठेवायचा "

आणि तो दिवस उजाडला . शालिनी ने एका गोंडस बाळाला जन्म दिला . मंगेश आणि शालिनी ला पहिला मुलगा झाला होता . शालिनी व्यवस्थित सुटली आणि बाळ पण नीट आहे हे कळल्यावर खूप आनंद झाला सर्वांना .

 बाळंत झाल्यावर मात्र शालिनीची आई ऐकायला तयार नाही ती म्हणाली  "आता मी शालिनी ला थोडे दिवस घरी घेऊन जाणार आहे आपण तिकडेच  बारसे करू ".

बाळाची पाचवी करून सर्व जण st ने गावी परतले.

🎭 Series Post

View all