संघर्ष एक कथा भाग ६

In this part Mangesh lost his father and how he is facing sad situation

                                                                संघर्ष एक कथा भाग ६

क्रमश: भाग ५

पुढे थोडे दिवस शालिनी गावाला राहिली , मंगेश एकटाच शहरात आला शालिनी थोडे दिवस माहेरी राहिली आणि थोडे दिवस सासरी राहिली . दोन्ही आज्ज्या , दोन्ही आजोबा आणि नातू याने घराचं  गोकुळ झाले . दोन्ही आजोबा बाळाला खालीच ठेवायचे नाहीत .

बाळाचे नाव माधव ठेवले .माधव च्या लीला बघण्यात सर्वांचे दिवस खूप चांगले चालले होते . मंगेश चे बाबा त्यांचे म्हातारपण विसरून गेले . दिवसभर त्याच्या शी गप्पा मारत बसायचे जसे काय त्याला सगळेच कळते . माधव पण त्यांना ओळखायला लागला होता . त्यांना बघून मस्त हसायचा . गुरुजीं पण रोज मंगेश च्या ओसरीवर येऊन बसायचे . दोघे व्याही गप्पा मारायचे . नातवाला खळवायचे आणि चहाचे कप वर कप  संपवायचे .

जसे बाळाला अंघोळ घालायला यायला लागल्यावर शालिनी पुन्हा मंगेश बरोबर शहरात आली . शहरात त्यांचं छान रुटीन चालू होत .आणि अचानक मंगेश ला एक तार  आली. मंगेश ला ती तर ऑफिस मधेच मिळाली . घरी वडील आजारी आहेत लवकर या अश्या आशयाची हि तार  होती . मंगेश लगेचच गावी जायला निघाला . खर तर तो आत्ताच १५ दिवसांपूर्वी माधव आणि शालिनीला घेऊन आला होता . १५ दिवसांपूर्वी तब्बेत तशी बरी होती . फक्त नातवाचा इतका लळा लागला होता कि ते माधवला सोडतच नव्हते . या सगळ्यात मंगेश कडे जराही पैसे राहिले नव्हते . गावी जा शिवाय  भाडे , जेवण , तिकडचा  खर्च , सगळं सगळं एकदम आले होते . आणि कमवणारा एकटाच किती ठिकाणी पुरा पडणार . सरकारी नोकरी होती म्हणून त्याला आरामात कर्ज मात्र सगळे द्यायला तयार असायचे . आणि कर्ज घेण्याशिवाय त्याच्यापुढे काही मार्ग च उरायचे नाही . आताची वेळ मारून नेण्यासाठी कुठून ना कुठून तरी पैसे हे उभे करावेच लागत असत . एव्हाना ऑफिस मध्ये पण अल्मोस्ट सर्वांकडून थोडे थोडे पैसे घेऊन झाले होते  . पगार झाला  कि जो मागेल त्याचे द्यायचे . त्याच दुःख तो कोणाला सांगूच शकत नव्हता . आता वडिलांची तब्बेत आचनाक बिघडली होती म्हणजे गावी पैसे घेतल्याशिवाय जाऊ शकत नव्हता . शेवटी मित्राकडून जाण्यापुरते पैसे मिळाले . ते घेऊन तो पहिला आधी गावी पोहचला .

घरी आला तर बाबा हांथरुण   धरून बसले होते . काही बोलू पण शकत नव्हते .आई  ने सांगितले कि दोन दिवसात जेवले पण नाही .नुसती भाताची पेज खात आहेत  आणि त रडू लागली .

मंगेश " बाबा , माधव आलाय तुम्हाला भेटायला "

जसे मांधव च नाव ऐकले त्यांनी मोठ्या आशेने डोळे उघडले . आणि त्याला घेण्यासाठी त्याच्या अंगात ताकद नसताना तयारी करु लागले

मंगेश " हळू बाबा हळू बाबा "आणि मंगेश ने त्यांना उठून बसवले .

उठून बसल्यावर म्हणाले " म्हातारे काहीतरी खायला दे कि , काय उपाशी ठेवतेस काय मला "

म्हातारे हि त्यांची बायकोला प्रेमाची हाक

त्यांनी  खायला मागितल्यावर शालिनी ने चुलीवर भात टाकला .

आणि भाकऱ्या करायला घेतल्या .

आई ला पण पोर घरी आल्यावर जरा बरं  वाटले . दोघी मिळून जेवण करायला लागल्या .

बाबा " म्हातारे जरा भरलं वांग आणि सुक्का झुणका कर "

आई ला आज ते जेवणार आहेत म्हटल्यावर खूप आनंद झाला . लगोलग बाहेर जाऊन तिने सुल्या च्या बागेतील ४ ताजी वांगी तोडून आणली आणि भरलं वांग्याची मस्त भाजी केली . झुणका केला आणि सर्व जण एकत्र बसून मस्त जेवले .

बाबांनी पण दोन दिवसांनी जेवले तरी बऱ्यापैकी आज अन्न  पोटात गेले होते .

जेवण  झाल्यावर जरा ताकद  आली आणि मग माधव ला मांडीवर घेऊन बसले .

मंगेश " बाबा थोडयावेळाने आपण तालुक्याला हॉस्पिटल ला जाऊन येऊ "

बाबा " नको रे . आता कितीसं   जगायचंय आणि मला चालवणार पण नाही "

मंगेश " मी दगडू काकाची बैलगाडी दारात बोलावतो आणि मग पलीकडे गेलो कि रिक्षा करू . चालायची वेळच येणार नाही "

बाबा " नको रे .. नको... उगाच पैशाची नासाडी .

मंगेश " अहो ऐका बाबा ,उगाच हट्ट नका करू "

बाबा " बरं मग आज नको .. उद्या जाऊ . तू आजच आलास आज नको .

मंगेश " ठीक आहे . पण उद्याच सकाळी जाऊ ."

बाबा " चालेल .

आज जेवणं झाल्यावर सर्वजण गप्पा मारायला बसले . दिक्षीत  गुरुजींना कोणीतरी बोललं कि मंगेश आलाय . माधव ला भेटायला म्हणून दोघे नवरा बायको आले . संध्याकाळी बाबा खरोखर एकदम फ्रेश वाटत होते . उठून बसले होते . गुरुजीं बरोबर गप्पा मारत होते . शालिनी च्या आई ने माधव ला उचलून घेतले होते . रात्री चे जेवण गुरुजींच्या आई ने आणि मंगेश च्या आईने बनवले . आज आम्ही पण इकडेच राहू . माधव असल्याने कोणाला त्याला सोडून जावेसे वाटायचं नाही .

रात्री उशीर पर्यंत गप्पा मारून , माधव च्या लीला बघत हसत सर्व मंडळी झोपून गेली .

सकाळी बाबांना तालुक्याला दवाखान्यात न्यायाचे होते म्हणून मंगेश ची आई लवकर उठली आणि भाकऱ्या थापायला बसली . म्हणजे काहीतरी खाऊन जातील .

मंगेश पण उठला नदीवर जाऊन आंघोळ करून आला आणि बाबांना हाक मारू लागला " उठा बाबा , बैलगाडी येईल ... उठा अंघोळ करून घ्या "

बाबा " काहीच उत्तर देत नव्हते . "

तेवढ्यात माधव उठला . शालिनी ने  मंगेश ला खुणावले त्याला घ्या मला काम आहे .

मंगेश " माधव ला घेऊन बसला "

तोपर्यंत दीक्षित गुरुजी अंघोळ करून आले . तरी बाबा झोपले च होते .

मंगेश ने माधव ला दीक्षित गुरुजींकडे दिले आणि बाबांना उठवायला गेला तर बाबांचं शरीर एकदम थंड . तो एकदम चरकलाच . बाबा .. बाबा मोठं मोठ्याने त्यांना हलवू लागला . पण काही फरक नाही. बाबा जे रात्री  झोपले ते परत उठलेच नाहीत .

दीक्षित गुरुजींना आणि मंगेश ला कळून  चुकले .

मंगेश " बाबा म्हणून एकदाच ओरडला आणि त्यांच्या छातीवर आडवा पडला . घरात आत मध्ये पण सर्वांना कळले

मंगेश आई :  अहो उठा ना .. उठा ना आणि जोरजोरात रडायला लागली .

शालिनी , ची शालिनी आई सर्वच रडायला लागल्या . मंगेश निपचित शांत अजूनही बाबांच्या  छातीवर पडून राहिला होता . माधव पण दीक्षित गुरुजींच्या हातात रडत होता .

शालिनी ला त्याला घायचे पण सुचत नव्हते .

अचानक होत्याचे नव्हते झाले.  बाबांनी अचानक  एक्सिट घेतली होती .  नातवाला भेटून, त्यांच्या आवडाच्या माणसांना भेटून , आवडीचे पदार्थ खाऊन  शांतपणे गेले होते . हू नाही कि चू नाही . झोपेतल्या झोपेतच मुक्ती मिळाली होती . कोणतीही इच्छा, आकांशा मागे न ठेवता .तृप्त  होऊन त्यांनी शरीर सोडले होते . असे मरण  यायला पुण्य लागतं हो .

बोल बोलता गाव जमा झाला आणि बाबांचे सर्व विधी करण्यात आले .

लोक सांगतील ते आणि तसं मंगेश करत होता . आपल्यावरच बापाचं छत्र अचानक नाहीसे होण्यासारखे दुःख नाही . मुलगा म्हणून त्याने त्याच्या सर्व कर्तव्य , जवाबदाऱ्या अजून पर्यंत तरी पार पडल्या होत्या ..

काल  संध्याकाळी सर्व जण मस्त गप्पा मारत होते , हसत होते आणि आज संध्याकाळी मंगेश नुकताच सर्व विधी करून आला  होता . घरात स्मशान शांतता होती . मंगेश ची एका कोपऱ्यात बसली होती . आणि राहून राहून रडत होती . जोडीदार असा अचानक सोडून गेल्यानंतर आयुष्यातली पोंकळी कोणी कोणीच भरून काढू शकत नाही . आपण का मागे एकटेच राहिलो . त्यांच्या  याआधी देवाने मला का नाही नेलं असे विचार घोंघावत असतात .

आज राहिलो तर दहा दिवस राहायला लागेल म्हणून दीक्षित गुरुजी म्हणाले " मी रात्री झोपायला घरी जातो उद्या  सकाळी येईन परत "

आणि दीक्षित गुरुजी बायकोला घेऊन गेले .

पाहिले दोन दिवस त्यांना बाहेरून जेवण आले . पण माधव ला मऊ भात  लागायचा म्हणून शेवटी शालिनीने चूल पेटवायचे ठरवले .

शालिनी स्वयंपाक घरात गेली . बघते तर घरात ना तांदूळ ना गव्हाचे पीठ , ना तेल .. साखर आणि चहा पावडर पण संपायला आलेली .

आता काय करावं ? गुरुजी पण घरी गेले होते .

मंगेश ला तिने हळूच सांगितले " अहो घरात काहीच सामान नाहीये . "

खरतर मंगेश ने १० दिवस घरातून बाहेर पडायचे नाही . कोणाला तरी पैसे देऊन सामान आणायला सांगू म्हणून बघतो तर त्याच्याकडे पैसे पण नाही .

आल्या पासून तो तो खर्च करतच होता . आता त्यांच्याकडचे पैसे संपले होता .

दुःखाच्या वेळी कोणाच्या दारात पैसे मागायला जायचे . मंगेश पुढे मोठा यक्ष प्रश्न उभा राहिला .

🎭 Series Post

View all