Login

साबुदाणा चकली Recipe In Marathi

उन्हाळा स्पेशल वाळवणाचे पदार्थ अचूक प्रमाणासहित
साबुदाणा चकली


साहित्य - साबुदाणा एक किलो, बटाटा दोन किलो, चिली फ्लेक्स घरात तयार केलेले किंवा मग मिरची पावडर दोन चमचे, धने जिरे पावडर प्रत्येकी दोन चमचे आणि चवीनुसार मीठ.


कृती -
१) साबुदाणा रात्रभर भिजवून घेणे.

२) सकाळी साबुदाणा छान फुलून आलेला असतो तो फोडून घेणे.

३) एका पातेल्यात अगदी थोडेसे पाणी घेऊन त्यात वरील सर्व जिन्नस घालून घेणे.

४) त्या मिश्रणात साबुदाणा घालून शिजवून घेणे. साधारण पाच दहा मिनिटे लागतात.

५) आता एका बाजूला शिजवलेले बटाटे किसणीने किसून घ्यायचे.

६) किसलेले बटाटे पण त्यात घालून चांगले एकत्र करणे आणि आता गॅस बंद करणे.

७) हे मिश्रण थोडे थंड झाल्यावर साच्यात भरून चकल्या पाडून घेणे.

८) प्लास्टिकच्या कागदावर चकल्या करणे.

९) ह्या चकल्या गोल आल्या नाही तरी चालते, पण तरी सुद्धा प्रयत्न करावा.

१०) चकल्या दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेणे आणि नंतर डब्यात भरून ठेवणे. गरम तेलात तळून बघा.. छान खुसखशीत होतात ह्या चकल्या.


🎭 Series Post

View all