साबुदाणा खिचडी उपवासाला आवर्जून खातात. साबुदाणा पासून आपण अनेक प्रकार बनवू शकतो. जसं कि साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी, साबुदाणा पेज असे अनेक प्रकार आपण उपवासाला खातो. आणि पटकन बनणारी गोष्ट ही साबुदाणा आहे.
लहान मुलांना पण साबुदाणा खूप आवडतो, पचण्यास जड असतो पण चवीला उत्तम.
चला तर मग आज आपण साबुदाणा खिचडी पाहूया
साहित्य आणि कृती.
साहित्य आणि कृती.
साहित्य -
1 वाटी साबुदाणा ( रात्री भिजवलेला )
शेंगदाणे.
कडीपत्ता.
4-5 हिरव्या मिरच्या.
बटाटी.
जिरं.
तेल.
मीठ ( उपवासाचे पण चालेल )
शेंगदाणे.
कडीपत्ता.
4-5 हिरव्या मिरच्या.
बटाटी.
जिरं.
तेल.
मीठ ( उपवासाचे पण चालेल )
कृती -
सर्वात आधी बटाटी कुकरला उकडवून घ्या, बटाटी शिजली कि त्याची साल काढून घ्या. आणि बाजूला ठेवा
आता एक कढई घ्या, कढई तापली कि त्यात शेंगदाणे घाला आणि चांगले भाजून घ्या. शेंगदाणे भाजले कि थंड करून त्याची साले काढून घ्या.
आता मिक्सरला शेंगदाणे, जिरं, आणि हिरवी मिरची चांगली बारीक वाटून घ्या.
आता एका पसरट भांड्यात भिजलेले साबुदाणे घ्या त्यातले पाणी पूर्ण काढून घ्या, आता ह्यात शेंगदाण्याचे केलेलं बारीक कूट ( हिरवी मिरची, जिरं ) त्या साबुदाण्यात घाला.
बटाटा कुस्करून घ्या आणि त्या साबुदाण्यात चांगल मिक्स करा.
बटाटा कुस्करून घ्या आणि त्या साबुदाण्यात चांगल मिक्स करा.
आता एक कढई घ्या, त्यात तेल घाला. तेल तापल कि त्यात जिरं नावाला कडीपत्ता घाला आणि फोडणी तडतडू द्या.
फोडणी तडतडली कि त्यात मिक्स केलेलं साबुदाण्याचं मिश्रण घाला आणि चांगल मिक्स करा. आता वरून मीठ घाला आणि झाकण मारा. आणि 10 मिनिटासाठी वाफवून घ्या.
वाफवून झालं कि झाकण काढा जरा मिक्स करा आणि गरमा गरम सर्व्ह करा.
******************************************
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा