मनात खूप सार्या इच्छा आणि सुखी संसाराची स्वप्ने उराशी बाळगून मी सासरी आले. नव्या घरात,नव्या नात्यात रुळायला वेळ लागत होता. मी माझ्या स्वभावानुसार आणि आईवडिलांनी केलेल्या संस्कारांप्रमाणे सासरी वागत होती. सर्वांशी प्रेमाने वागत होती,प्रत्येक नात्याचा मान राखत होती. आपल्याकडून जेवढे चांगले करता येईल तेवढे करत होती. आपल्यामुळे कोणाला त्रास
होऊ नये,दु:ख होऊ नये याची काळजी घेत होती;पण माझ्या चांगुलपणाचा मला चांगला प्रतिसाद मिळत नव्हता.माझ्या कामाचे,गुणांचे कौतुक करणे तर दूरच! उलट मुद्दाम माझ्यातील चुका काढणे,टोमणे मारणे सुरू असायचे.सून कितीही चांगली असली तरी, सासूबाईंना सूनेतील चूकाच दिसतात.त्यांना सासूपणाचा अधिकार गाजवायचा असतो ना!सून व मुलगा माझेच ऐकतात,घरात माझाच शब्द खरा! असा त्यांना टेंभा मिरवायचा असतो ना!

माझ्या नशिबात सासुरवास तर होताच पण नणंदवासही होता.
सणावाराला माहेरी येणारी नणंद चांगली वाटते;पण घराजवळ राहणारी,वहिनीविषयी चुकीचे सांगून आईचे कान भरणारी नणंद आवडते का कोणाला?
आईमुलीचे काय सुरू असायचे? हे मला सर्व समजत होते.हे सर्व मी नवर्याला अनेकदा सांगितले;पण तोही त्यांच्याच गटातला!

घरात लक्ष्मी नांदत होती; पण मी गृहलक्ष्मी सुखी, समाधानी नव्हती.मला कोणत्याच गोष्टीचे स्वातंत्र्य नव्हते. माझ्या विचारांचा,भावनांचा कोंडमारा होत होता. मानसिक स्वास्थ्याबरोबर शारिरीक स्वास्थ्यही बिघडत चालले होते.
माझ्या शिक्षणाचा,ज्ञानाचा चांगला उपयोग व्हावा. यासाठी नोकरी करायची माझी इच्छा होती. मी घरात तसे सांगितलेही. पण 'आपल्याला पैशांची काही कमी आहे का? नोकरी वगैरे करण्याची काही गरज नाही.'
असे सांगून माझ्या इच्छेचा,स्वप्नाचा त्याग करण्यास मला भाग पाडले.
लग्नाअगोदर मी किती स्वप्न पाहिली होती;पण आता माझ्या वाटेला काय येत आहे? असा विचार मला जास्त त्रास देवू लागला.
मी माझ्या संसारात खूप सुखी आहे. असे माहेरच्यांना सांगितले;पण त्यांना समजलेच की, मी सासरी सुखी नाही. यातून काहीतरी मार्ग काढावा म्हणून माहेरच्यांनी, माहेरचे काही नातेवाईक व सासरचे काही नातेवाईक यांची एकदोनदा मीटिंग घेतली. त्यांचा हेतू एवढाच होता की,आमच्या मुलीची काही चूक नसताना तिला त्रास दिला जातो. नणंदबाईंनी भावाच्या संसारात जास्त ढवळाढवळ करू नये,सासूबाईंनी मुलाप्रमाणे सुनेलाही समजून घ्यावे. सतीशरावांनी मुलगा आणि भाऊ या नात्याबरोबर नवर्याचेही कर्तव्य पार पाडावे.सर्वांच्या
वागण्यात काही सुधारणा झाली तर ठिक नाहीतर .. मुलीला कायमचे माहेरी घेऊन जाणार. असे मीटिंगमध्ये सांगण्यात आले.

क्रमश:
नलिनी बहाळकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा