Login

त्याग. भाग 3

About Sacrifice

आपल्या मुलीचा संसार सुखी रहावा. असेच प्रत्येक आईवडिलांना वाटत असते आणि त्यासाठी ते प्रयत्नही करत असतात. आपल्या मुलींना तर ते चांगले संस्कार देवून सासरी पाठवतात; पण सासरच्या लोकांचे वागणे चांगले नसेल,मुलीला सासरी त्रास असेल तर त्यांना काळजी वाटतेच ना? माझ्याही आईवडिलांना माझी काळजी वाटत होती आणि मला माझ्या आईवडिलांची! आपल्यामुळे त्यांना काही त्रास होऊ नये.असे मी लग्नाअगोदरही वागायचे आणि आता सासरीही.

आईवडील आपल्या मुलांच्या सुखासाठी आपल्या सुखाचा त्याग करतात.मुलांच्या आनंदासाठी स्वतः दु:ख सहन करतात.
माझ्या आईवडिलांनी आमच्या सुखासाठी किती त्याग केला आहे. हे मला समजत होते.
आता त्यांना कोणताही त्रास देवू नये. असे मला वाटत होते. पण सासरच्या लोकांमुळे त्यांना त्रास झालाच. याचे मला वाईट वाटत होते.

माझ्यासारख्या मुली आईवडिलांचा विचार करून सासरी त्रास सहन करत असतात. सुखाचा त्याग करत असतात.

काही स्वतःच हा मार्ग निवडतात तर काहींना सांगितले जाते की, 'प्रत्येक स्त्रीला सासरी थोड्याफार प्रमाणात त्रास असतोच. स्त्री ही सहनशीलतेची,त्यागाची मूर्ती असते.तिच्या सहनशीलतेमुळे व त्यागामुळे संसार सुखाचा होतो.'

सासरी त्रास सहन करण्यापेक्षा माहेरी राहावे किंवा घटस्फोट घेऊन दुसरे लग्न करावे. हा विचार माझ्या मनात अधूनमधून डोकावून जायचा;पण माझ्यामुळे माहेरी त्रास नको,काही टेंशन नको. असेही वाटायचे. दुसरे लग्न केल्यावर तिकडे अजून काही वेगळेच माझ्यासाठी वाढून ठेवले असेल तर.. म्हणजे आगीतून फुफाट्यात जाण्यासारखे होईल आणि रेवाला वडिलांचे प्रेम मिळेल का? आपल्या सुखासाठी तिच्यावर अन्याय तर होणार नाही ना?

आयुष्यात स्वतःचा विचार न करता, इतरांचाही विचार करावा लागतो. याच विचाराने मी माझ्या स्वतःचा विचार न करता माझ्या माहेराचा व रेवाच्या भविष्याचा विचार करुनच सासरी राहण्याचा निर्णय घेतला. मी माझ्या सुखाचा, स्वप्नांचा त्याग केला.
सासूबाई, नणंदबाई माझ्याशी चांगले वागत नव्हत्या; पण रेवाचे लाड करायच्या.आईचे व बहिणीचे ऐकून माझ्याशी चांगले न वागणारा माझा नवरा ..वडील म्हणून रेवाचे लाड पुरवायचा. रेवाचा आनंद पाहून मलाही आनंद व्हायचा.
रेवा दिसायला खूप सुंदर होती आणि खूप हुशारही होती.प्रत्येक गोष्ट पटकन लक्षात ठेवायची आणि मनापासून करायची. शाळेत अभ्यासात तर प्रगती होतीच पण त्याबरोबर प्रत्येक स्पर्धेत,कार्यक्रमात भाग घ्यायची आणि बक्षिसे पटकवायची. तिला मिळणारे यश,तिला मिळणारा आनंद पाहून, मी माझा सर्व त्रास, सर्व टेंशन विसरून जायचे. रेवाचे आयुष्य चांगले घडविणे,तिचे स्वप्न पूर्ण करणे. हेच आता माझ्या आयुष्याचे ध्येय होते,स्वप्न होते. मी रेवाची आई आहे आणि तिच्यासाठी मला जे काही करता येईल ते सर्व करण्याचा प्रयत्न मी करत होती.

क्रमशः
नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all