देवाने मला छान असे रूप दिले होते आणि चांगली बुद्धीही दिली होती;पण मी कधी रूपाचाही नाही व बुद्धीचाही कधी गर्व केला नाही. मी सर्वांशी छान बोलायची,वागायची.मला देवाने सर्वकाही चांगले दिले होते;त्यामुळे नात्यात काहीजण असे होते की, जे माझा द्वेष करायचे.जेव्हा मला चांगले स्थळ मिळाल्याचे त्यांना कळाले, तेव्हा त्यांना वाईट वाटले आणि सासरी मला त्रास होतो आहे असे जेव्हा कळाले,तेव्हा त्यांना आनंद झाला. सासरीही नणंदबाईंना माझा चांगुलपणा खटकत होता; त्यामुळेच त्यांनी मला त्रास देण्यासाठी सासूबाई व माझ्या नवर्याला माझ्या विरोधात केले.
त्या माझा मत्सर तर करतच होत्या;पण माझ्या रेवाची होणारी प्रगती पाहून त्यांच्या पोटात दुखत होते.कारण त्यांची मुले रेवासारखी सुंदर व हुशार नव्हती.
नणंदबाईच्या वागण्याबोलण्यातून मला हे सर्व जाणवत होते; पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होती आणि रेवाकडे सर्व लक्ष केंद्रित करत होती. मला नणंदबाईंच्या वागण्याचा खूप राग यायचा; पण त्यांना समजावून सांगणे म्हणजे कठीण काम! आणि त्यांच्याशी वाद करणे म्हणजे स्वतःला त्रास करून घेणे. मला त्रास झाला म्हणजे माझ्यामुळे
रेवालाही त्रास ! म्हणून मी शांत राहून आपले काम करत राहिले.
माझा नवरा माझे काही ऐकत नसला तरी, रेवाचे वडील म्हणून तिच्यासाठी सर्वकाही मनापासून करत होता.रेवाचे लाड,कौतुक सर्वकाही होत होते. मला यातच समाधान वाटत होते.
रेवा मुळातच खूप हुशार होती. तिच्या हुशारीचा,बुद्धिमत्तेचा चांगलाच उपयोग व्हावा,तिची प्रगती व्हावी यासाठी मी नेहमीच तिच्या पाठीशी उभी राहिली,तिला चांगले मार्गदर्शन करत राहिली.तिला कोणत्याही गोष्टीचा त्रास होऊ दिला नाही. मला खूप टेंशन असते किंवा मला खूप त्रास आहे. हे तिला कधी जाणवू दिले नाही.तिला प्रत्येक चांगल्या गोष्टींसाठी प्रोत्साहित करत राहिली. मी स्वतःचा कधी विचार केला नाही.तिच्यासाठी जगत राहिली.
सासूबाईही रेवाचे कौतुक करायच्या; पण रेवाचे अजून पुढचे यश पाहण्यासाठी,तिचे कौतुक करण्यासाठी त्या राहिल्या नाहीत.आजारी पडल्या आणि पुन्हा चांगल्या झाल्याच नाही.
मुलाने,मुलीने व मी पण ,आम्ही सर्वांनी त्यांची सेवा केली;पण आमच्या सेवेला यश आले नाही.सासूबाई गेल्यानंतर, नणंदबाईंचे माहेरी येणे थोडे कमी झाले होते; पण भावावर कंट्रोल अगोदरसारखाच होता.सल्लामसलत, विचारविनिमय, देवाणघेवाण हे सर्व दोघांमध्ये सुरू होते. अगोदरही मला काही विचारात घेत नव्हते आणि आताही नाही.

क्रमश:
नलिनी बहाळकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा