आपल्या आईपासून व बहिणीपासून नाते तोडून वेगळे रहा .असे मी माझ्या नवर्याला कधी सांगितले नाही.फक्त एवढेच म्हणणे होते की, 'माझी चूक असेल तर मी मान्य करेल; पण चुका नसताना का ऐकायचे? त्या चुकता आहेत हे कळून सुद्धा त्यांना का काही सांगत नाही. आई व बहिण नाराज होऊ नये,त्यांना राग येऊ नये म्हणून त्यांना काही बोलायचे नाही आणि बायकोवर अन्याय झाला तरी चालेल.म्हणजे जो काही त्याग करायचा तो फक्त सूनेने,पत्नीनेच का?'
या सर्व गोष्टींचा विचार करून मला खूप त्रास व्हायचा; त्यामुळे या सर्व गोष्टी मी मनातून काढून टाकल्या आणि फक्त रेवाचा विचार करू लागली.ती हुशार होती आणि तितकीच मेहनतीही होती. आपल्यातील गुणांना योग्य मार्गदर्शन व मेहनतीची साथ मिळाली की यश हमखास मिळते.
रेवाच्या बाबतीत हे खरे ठरत होते.
तिच्या गुणांना व मेहनतीला मी माझ्या परीने मदत करत होती.
या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे..
तिने I.I.T. मधून M.Tech. पूर्ण केले व चांगल्या कंपनीत नोकरीलाही लागली.माझे एक स्वप्न तर पूर्ण झाले होते. आता दुसरे स्वप्न राहिले होते, रेवाचे लग्न!
तेही काम रेवाने सोपे करून दिले.
लहानशी रेवा कधी मोठी झाली ते कळालेही नाही.
आई...आई म्हणून माझ्या मागे धावणारी,मला बिलगणारी,माझ्याकडे हट्ट करणारी, प्रत्येक गोष्ट मला सांगणारी,छोट्या छोट्या गोष्टीत माझी मदत घेणारी रेवा कधी मोठी झाली? हे कळाले नाही.इतकी मोठी झाली की तिने तिच्या आयुष्याचा जोडीदार तिने स्वतःच शोधला.तो सर्व गोष्टीत तिला अनुरूप होता म्हणून मलाही तो आवडला. आणि तिच्या वडिलांनाही मुलीची पसंती आवडली.आता थोड्या दिवसात तिचे लग्नही आहे. या सर्व गोष्टींवर माझा अजूनही विश्वास बसत नाही.किती पटकन वर्षे सरली.
रेवा लग्न करून सासरी गेली.तिच्या संसारात सुखी समाधानी राहिली म्हणजे माझे अजून एक स्वप्न पूर्ण होईल.
ती सुखात असली म्हणजे ... मी आतापर्यंत सहन केलेला त्रास,माझ्या इच्छा व स्वप्नांचा केलेला त्याग आणि आई म्हणून पार पाडलेले कर्तव्य... या सर्वांचे चांगले फळ मला मिळाले. असे समजेल.
माझ्या उर्वरित आयुष्यात, सामाजिक कार्य करून आयुष्याचा आनंद घेण्याचे मी ठरवले आहे.
आता स्वतःपेक्षा इतरांचा विचार करण्याची सवय लागली आहे ना?
त्यातही एक वेगळाच आनंद असतो ..

मुलांना लहानाचे मोठे करणे, त्यांना सुखसमाधान देणे,योग्य मार्गदर्शन करून स्वावलंबी बनवणे व त्यांचे चांगले व्यक्तिमत्त्व घडविणे.हे सर्व तर सर्वच आईवडील करत असतात.हे त्यांचे कर्तव्यच असते आणि या कर्तव्यासाठी त्यांना स्वतःच्या सुखांचा,स्वप्नांचा थोड्याफार प्रमाणात त्याग करावाच लागतो. मी वेगळे असे काय केले? हा प्रश्न मी स्वतःलाच विचारत असते.
"अगं, सुनीता....ऐकतेस का?"
सतिशरावांच्या मोठ्या आवाजाने, आपल्या विचारांच्या तंद्रीत असणाऱ्या सुनीताताई भानावर आल्या.
"काय म्हणताय?" सुनीताताईंनी सतिशरावांना विचारले.
"अगं,ताईने तुझी माफी मागितली आहे आणि तुझ्या प्रयत्नांनी तिच्या मुलाला चांगली नोकरी मिळाली म्हणून तुझे आभारही मानले आहे."
सतिशराव आनंदाने सुनीताताईंना सांगत होते.
"अहो,मी फक्त माझे काम केले आहे. त्यात आभार वगैरे मानण्याची काही गरज नाही."
सुनीताताई सतिशरावांना शांतपणे म्हणाल्या.
'नणंदबाईंनी त्यांच्यातील वाईट गुणांचा कधीचा त्याग केला असता तर...मला एवढा त्रास झाला नसता,नणंद - भावजयीचे नाते छान बहरले असते आणि घराला सुखशांती व समाधानही लाभले असते.'
असा मनाशी विचार करत सुनीताताई झोपी गेल्या.
समाप्त
नलिनी बहाळकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा