साधेपणाचं सोनं भाग -1
राजेश शिकलेला होता, पण त्याला शेती करायला आवडत होती. त्यांची खूप ओळख होती. तो सगळ्यांना मदत करत असायचा.
त्यांच्या घरात त्यांचे आई-बाबा आणि लहान बहीण होती. त्यांचे बाबा आता म्हातारे झाले होते. त्यांच्याकडून काही काम होत नव्हते, ते घरीच राहत होते. त्यांच्या बहिणीचे शिक्षण झाले होते. आता तिच्या लग्नाचे बघत होते.
राजेशचा मित्र अजय तो पण शेती करायचा. तो तर खूप गरीब होता. अजयचे बाबा, राजेशच्या बाबांबरोबर शेतात काम करत होते. आता राजेश आणि अजय तसंच सोबत काम करतात.
राजेश घरात चहा पीत बसला होता.
"दादा, आज शेतातून भाजी घेऊन ये, आईने सांगितलं आहे," रेश्मा म्हणाली.
"दादा, आज शेतातून भाजी घेऊन ये, आईने सांगितलं आहे," रेश्मा म्हणाली.
"हो, घेऊन येईल. मला पोहे घेऊन ये," राजेश म्हणाला.
"हो, घेऊन येते," रेश्मा म्हणाली.
"हो, घेऊन येते," रेश्मा म्हणाली.
"मला पण घेऊन ये," अजय आत येत म्हणाला.
रेश्मा आत गेली. दोन ताट घेऊन आली आणि राजेश व अजयला दिली. दोघंही खाऊन घेतात. नंतर शेतात निघून जातात.
थोड्या वेळाने राजेशचे काका राजेशच्या घरी येतात.
"भाऊजी, तुम्ही या, बसा," राजेशची आई म्हणाली.
"दादा काय करत आहे? विनयला शहरात नोकरी लागली आहे," राजेशचे काका आनंदाने म्हणाले.
"दादा काय करत आहे? विनयला शहरात नोकरी लागली आहे," राजेशचे काका आनंदाने म्हणाले.
"व्वा! छान आहे. मी यांना सांगते," त्या म्हणाल्या.
त्या राजेशच्या बाबांना बोलवायला गेल्या. थोड्याच वेळात ते बाहेर आले.
त्या राजेशच्या बाबांना बोलवायला गेल्या. थोड्याच वेळात ते बाहेर आले.
"दादा, कसा आहेस? राजेश नाही आहे का?" राजेशचे काका म्हणाले.
"मी मस्त आहे. राजेश शेतात गेला आहे. तुला काय काम आहे?" राजेशचे बाबा म्हणाले.
"मी मस्त आहे. राजेश शेतात गेला आहे. तुला काय काम आहे?" राजेशचे बाबा म्हणाले.
"काम होतं, त्याला घरी बोलवतो का?"
"हो," राजेशचे बाबा म्हणाले.
"हो," राजेशचे बाबा म्हणाले.
थोड्याच वेळात राजेश घरी आला. त्याच्या शेताचं काही सामान घरी राहिलं होतं.
"काका, तुम्ही कधी आलात?" राजेश म्हणाला.
"आताच आलो. विनयला शहरात नोकरी लागली आहे. मला थोडे पैसे हवे होते. मला देतोस का? त्याचा पगार आल्यावर मी तुला परत देईन," राजेशचे काका म्हणाले.
"आताच आलो. विनयला शहरात नोकरी लागली आहे. मला थोडे पैसे हवे होते. मला देतोस का? त्याचा पगार आल्यावर मी तुला परत देईन," राजेशचे काका म्हणाले.
राजेशने त्यांच्या आई-बाबांकडे पाहिलं. त्यांनी डोळ्यांनी होकार दिला.
राजेशने लगेच पैसे आणून दिले. थोडा वेळ बोलून राजेश परत शेतात निघून गेला.
राजेशने लगेच पैसे आणून दिले. थोडा वेळ बोलून राजेश परत शेतात निघून गेला.
राजेशचे काका थोडा वेळ तिथे बसले, नंतर त्यांच्या घरी निघून गेले.
राजेश शेतात पोहोचला. त्याने त्याचं सामान ठेवले. अजय त्याच्याकडे आला.
"राजेश, उशीर झाला. घरी काही काम होतं का?" अजय म्हणाला.
"राजेश, उशीर झाला. घरी काही काम होतं का?" अजय म्हणाला.
"काका आले होते. विनयला नोकरी लागली आहे. त्यांना पैसे हवे होते, ते त्यांना दिले. मग शेतात आलो," राजेश म्हणाला.
"तुझे काका लालची आहेत. ते पैसे विसरून जा. तुला ते पैसे काही मिळणार नाहीत," अजय म्हणाला.
"अजय, ते पैसे देतील. तू टेन्शन घेऊ नको," राजेश म्हणाला.
"तू खूप साधा आहेस. तुझे आई-बाबा पण तसंच आहेत. विनय परत गावात येणार नाही, आणि तुझे पैसे पण येणार नाहीत. आपण आपलं काम करू. धरती माता आपल्याला सोनं उगवून देते," अजय म्हणाला.
राजेश काही बोलला नाही. सगळ्यांना तो स्वतःसारखाच समजत होता. सगळ्यांना मदत करत होता. ते तर त्याचे काका होते. राजेशने अजयचं बोलणं डोक्यातून काढलं आणि कामाला लागला.
अजय राजेशकडे बघत राहिला.
"एवढे पण चांगले लोक नको!" अजय म्हणाला आणि तोही त्याचं काम करायला लागला.
"एवढे पण चांगले लोक नको!" अजय म्हणाला आणि तोही त्याचं काम करायला लागला.
दिपाली चौधरी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा