Login

साधेपणाचं सोनं भाग -2

आपण चांगले असले की आपल्याला. सगळे चांगलेच वाटतात
साधेपणाचं सोनं भाग -2

राजेश शेतातून घरी जातो. अजय त्यांच्या घरी निघून गेला होता.

राजेश आपल्या खोलीत जातो. हात पाय धुतो. कपडे बदलून बाहेर येतो.

रेश्मा त्याला पाणी आणून देते. चहा ठेवायला जाते.

"राजेश, रेश्माला स्थळ आलं आहे. चांगलं आहे. माझं मन होतं... आपण बघून घेऊ," राजेशची आई म्हणाली.

"मला दाखव, मी बघतो. मग आपण बघण्याचा प्रोग्राम करून घेऊ. शेतात पण खूप काम आहे. आता पिक छान आलं आहे. पंधरा–वीस दिवसांनी काढून घेऊ. ज्वारी, सोयाबीन, कापूस मस्त झाला आहे. ते विकल्यावर रेश्माचं छान लग्न लावून देईन," राजेश म्हणाला.

"आता तुझ्याकडे किती आहे?" राजेशचे बाबा म्हणाले.

"माझ्याकडे जे होते, ते बियाणं आणि फवारे आणायला संपले. काकांना एक लाख दिले आहेत," राजेश म्हणाला.

"तू नको काळजी करू. तो आपल्याला पुढच्या महिन्यात आणून देईल. त्यांच्या पण शेतात चांगलं पिक झालं असेल ना. आपल्याला रेश्माच्या लग्नाला ते पैसे कामी येतील," राजेशचे बाबा म्हणाले.

"राजेश, महिन्याने त्याच्याकडून मागून घेऊ. मुलाचा फोटो बघ. हे बघ, मुलाचं नाव, शिक्षण, काय करतो, सगळं लिहिलं आहे," राजेशची आई म्हणाली.

राजेशने फोटो आणि त्यांचा बायोडाटा वाचला. मुलगा चांगला शिकलेला होता, दिसायलाही चांगला होता, पगार पण चांगला होता. घर होतं, शेतीही होती. राजेश बघत होता.

"राजेश, चांगलं आहे ना? बघायचं का?" राजेशची आई म्हणाली.

"हो, बघून घेऊ. सगळं चांगलं आहे. बघण्याचा प्रोग्राम करून घेऊ. त्यांचा होकार आला तर सगळं तपासून घेऊ," राजेश म्हणाला.

"मी तिला सांगते. बघण्याचा प्रोग्राम करून घेऊ," राजेशची आई म्हणाली.

"हो," राजेश म्हणाला.

असेच दिवस गेले.

अजय मात्र दुःखी होता. राजेशला वेळ नव्हता. अजय एकटाच राहत होता.

बघण्याचा प्रोग्राम झाला. त्यांना रेश्मा आवडली. त्यांनी लग्नाची तारीख पुढच्या महिन्यातील काढली.

राजेश रेश्माच्या लग्नाच्या तयारीला लागला. पैसे बँकेत होते, ते त्याने वापरले. आता त्याच्याकडे पैसे नव्हते. तो आपल्या काकांकडे गेला. त्यांना पैसे मागितले, पण त्यांनी पैसे दिले नाहीत. राजेश तिथून निघून गेला.

अजय आणि राजेश बसले होते.

"राजेश, काय झालं? तू दुःखी का आहेस?" अजय म्हणाला.

"मी काकांकडे गेलो होतो पैसे मागायला. त्यांनी पैसे दिले नाहीत," राजेश म्हणाला.

"मी तुला आधीच सांगितलं होतं, त्यांना तू द्यायला नको होतं," अजय म्हणाला.

"आपलं पीक आपण उद्या तयार करून घेऊ. रेश्माचं लग्न चांगलं झालं पाहिजे," राजेश म्हणाला.

"चालेल," अजय म्हणाला.
दोघे गप्पा मारत बसले.

"तुम्ही हे काय बोलताय? लग्न जमवलं तेव्हा तर काही बोललात नाही. आता एवढे पैसे आम्ही कसे आणणार?" राजेशची आई म्हणाली.

राजेशचे बाबा पण टेन्शनमध्ये आले. आता राजेशला कसं सांगायचं? रेश्मा त्या मुलासोबत संसार करायचं स्वप्न बघत होती.

राजेशचे आई, बाबा दोघेही टेन्शनमध्ये आले होते.

राजेश घरी आला. त्याने आई, बाबांना टेन्शनमध्ये पाहिलं.

"काय झालं? तुम्ही का टेन्शनमध्ये बसले आहात?" राजेश म्हणाला.

राजेशच्या आईने राजेशला सगळं सांगितलं.

"तुम्ही टेन्शन नका घेऊ. उद्या सोयाबीन काढून घेतो, विकायला नेतो," राजेश म्हणाला.