साधेपणाचं सोनं – भाग 3 (अंतिम भाग)
जलद लेखन स्पर्धा – नोव्हेंबर 2005
राजेशने सोयाबीन काढून घेतली. तिला विकायलाही घेऊन गेला, पण पाहिजे तसा भाव सोयाबीनला मिळाला नाही.
“उद्या ज्वारी काढतो,” असा त्याने विचार केला.
“उद्या ज्वारी काढतो,” असा त्याने विचार केला.
आता लग्नाला जास्त दिवस नव्हते. त्याने ज्वारीही काढली. आता चांगले पैसे जमा झाले.
रेश्माला साड्या घ्यायच्या होत्या.
रेश्माला साड्या घ्यायच्या होत्या.
राजेश त्यांच्या काकाकडे गेला, पण घराला कुलूप होतं.
आजूबाजूला विचारल्यावर त्यांनी सांगितलं, “ते विनायकडे गेले आहेत.”
राजेश तिथून निघून गेला.
आजूबाजूला विचारल्यावर त्यांनी सांगितलं, “ते विनायकडे गेले आहेत.”
राजेश तिथून निघून गेला.
दुसऱ्या दिवशी राजेश रेश्माला शॉपिंगला घेऊन गेला.
रेश्माने जास्त महाग काही घेतलं नाही. ते दोघे घरी आले.
रेश्माने जास्त महाग काही घेतलं नाही. ते दोघे घरी आले.
“राजेश! राजेश!” अजय हाक मारत होता.
“अजय, काय झालं? असं काय हाक मारत आहेस?” राजेश म्हणाला.
“तुझे काका–काकूंना विनयने घरातून काढून टाकलं! त्यांना परत गावाला पाठवून दिलं,” अजय म्हणाला.
“चल, आपण भेटून येऊ,” राजेश म्हणाला.
राजेश आणि अजय राजेशच्या काकांकडे जायला निघाले.
ते दोघे काकांच्या घरी पोहोचले.
ते दोघे काकांच्या घरी पोहोचले.
“काका, कसे आहात? विनयने खरंच तुम्हाला घरातून काढून दिलं का?” राजेश म्हणाला.
“आम्हीच आलो, आम्हाला तिथे आवडलं नाही,” काका म्हणाले.
“माझे पैसे आणले का? रेश्माचं लग्न आहे, मला काम होतं,” राजेश म्हणाला.
“कोणते पैसे? मला काही माहिती नाही,” काका म्हणाले.
“काका, हे तुम्ही चांगलं करत नाही आहात,” राजेश म्हणाला.
राजेश आणि अजय घरी निघून गेले.
अजय आपल्या घरी गेला.
अजय आपल्या घरी गेला.
राजेश घरी आला आणि आई–बाबांना सगळं सांगितलं.
थोड्याच दिवसांत रेश्माचं लग्न झालं.
काका–काकू लग्नाला आले. त्यांची तब्येत खराब दिसत होती.
दोन–तीन दिवस त्यांनी नीट जेवलं नव्हतं असं वाटत होतं.
काका–काकू लग्नाला आले. त्यांची तब्येत खराब दिसत होती.
दोन–तीन दिवस त्यांनी नीट जेवलं नव्हतं असं वाटत होतं.
लग्नात त्यांनी चांगलं जेवण केलं.
रेश्माचं लग्न छान पार पडलं. पाठवणीही झाली.
रेश्माचं लग्न छान पार पडलं. पाठवणीही झाली.
“काका–काकू, घरी चला,” राजेश म्हणाला.
“मी का तुझ्या घरी येणार? आम्ही आमच्या घरी जाऊ,” काका म्हणाले आणि निघून गेले.
किती महिने त्यांनी विनयची वाट पाहिली, पण विनय आला नाही.
त्याने तिथेच लग्नही करून घेतलं.
काका–काकू दुसऱ्याच्या शेतात जाऊन काम करू लागले.
त्याने तिथेच लग्नही करून घेतलं.
काका–काकू दुसऱ्याच्या शेतात जाऊन काम करू लागले.
राजेश आणि अजय त्यांना तिथं काम करताना पाहतात.
“ज्याचं करावं भलं, तो म्हणतो माझंच खरं...” राजेश म्हणाला.
तो त्यांचं काम करायला लागला.
त्यांचा कापूस चांगल्या भावात गेला.
राजेशचं सगळं चांगलं झालं.
रेश्माचंही संसार सुखात चाललं होतं.
रेश्माच्या नवऱ्याने लग्नावेळी जे पैसे मागितले होते, ते परत करून दिले.
त्यांचा कापूस चांगल्या भावात गेला.
राजेशचं सगळं चांगलं झालं.
रेश्माचंही संसार सुखात चाललं होतं.
रेश्माच्या नवऱ्याने लग्नावेळी जे पैसे मागितले होते, ते परत करून दिले.
काळ पुढे सरकत होता.
राजेश आपल्या शेतात काम करत होता.
मातीवर पाऊस पडत होता, आणि आभाळाकडे पाहत तो म्हणाला
“धरतीमातेसारखं दान करायला शिकलं पाहिजे...
ती देत राहते, परत काही मागत नाही.”
राजेश आपल्या शेतात काम करत होता.
मातीवर पाऊस पडत होता, आणि आभाळाकडे पाहत तो म्हणाला
“धरतीमातेसारखं दान करायला शिकलं पाहिजे...
ती देत राहते, परत काही मागत नाही.”
आईने मागून हाक मारली, “राजेश, चहा ठेवला आहे रे!”
राजेश हसला, कपाळावरचा घाम पुसला आणि म्हणाला
“हो आई, आलोच...”
राजेश हसला, कपाळावरचा घाम पुसला आणि म्हणाला
“हो आई, आलोच...”
त्या क्षणी सूर्यकिरण ढगातून उमटले
जणू निसर्गही त्याच्या साधेपणाचं सोनं ओळखत होता.
जणू निसर्गही त्याच्या साधेपणाचं सोनं ओळखत होता.
---
समाप्त
दिपाली चौधरी
दिपाली चौधरी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा