जुन्या काळातील स्त्री.... कपाळावर भल मोठ कुंकू.... डोक्यावर पदर..... सर्वांग साडीने झाकलेल.... डोक्यावरचा पदर तर कसा, डोळ्यांच्या पापण्यांपर्यंत ओढलेला. शरीराचा एकही भाग उघडा दिसायचा नाही. तो केवळ पदर नव्हता, तर तिची लाज वाचवणारी, रक्षा करणारी ढाल होती. लेकराबाळांची माया होती. तान्ह्या बाळाला कुशीत घेऊन दूध पाजताना तो पदर आपोआपच त्या पिल्लाला ऊब द्यायचा. मोठे झालेल्या बाळाचे नाकेडोळे पुसण्यासाठी तोच पदर पुढे यायचा.
कलियुगाची नार ही साडी घालतेच की, पण भलत्याच प्रकारे. आतातर या फॅशनच्या जमान्यातली साडी सांगायलाच नको. पाठ तर पूर्णच उघडी, पोट ही उघडे, दोन बोटांच्या मापाची साइटपिन म्हणजे पदर. आता त्या जुन्या काळच्या स्त्रीचा पदर आणि कलियुगाच्या नारीचा पदर एकसारखाच तरीही जमीन अस्मानाचा फरक. कुठे त्या जुन्या काळच्या स्त्रीचा पोटावरुन, छातीवरुन, डोक्यावरून, खांद्यावरून ओढलेला पदर आणि कुठे आजच्या नारीचा खांद्यावर लटकलेला अन जमिनीवर लोळणारा पदर.
आता तुम्ही म्हणाल, काळ बदलला, समाज बदलला, स्त्री सुशिक्षित झाली, फॅशन नावाचा फंडा आला. पण एका स्त्रीच स्त्रीत्व तेच आहे ना?... हो तुम्ही घाला साडी पण ती साडी स्त्रीच्या शरीराच, सौंदर्याच रक्षण करण्यासाठी असते हे मात्र लक्षात असुद्या.. ना की अंगप्रदर्शनासाठी. आणि कोण म्हणत अस अंगप्रदर्शन केल्याने सुशिक्षित म्हंटल जात. फोरेन संस्कृतीचा वसा न घेता भारतीय संस्कृतीप्रमाणे राहिलात तर नक्कीच तुम्ही एक आदर्श भारतीय नारी म्हणून गणला जाल........
धन्यवाद!
~प्रणाली चंदनशिवे.
धन्यवाद!
~प्रणाली चंदनशिवे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा