Login

सडके पौरुष

समाजात होत असलेल्या अन्याय अत्याचार बलात्कार या घटनांवर प्रकाश टाकण्याचा एक प्रयत्न...
सडके पौरूष

भाग - १

भय इथले संपत नाही...

ही ओळ प्रत्येक मुलीच्या जन्माबरोबरच येते. भारतीय संस्कृती मध्ये "विवाह" हा एक संस्कार मानला जातो. त्यानंतरच शारीरिक संबंध मान्यताप्राप्त होतो. माणसाचा जन्मच काम वासनेतून होतो ही सत्य परिस्थिती आहे जी कोणीही नाकारू शकत नाही.

किशोरवयात येण्याआधीच मुलांचे मन "कामवासने" कडे झेप घेऊ लागते. शिक्षणाच्या, करीयरच्या उंबरठ्यावर मुलांचे मन विचलित झाले की अध पतन होण्यास वेळ लागत नाही.

मित्रांच्या आग्रहाला बळी पडून "एकदा पहावे करून" असे वाटते. मित्र सांगतात की "लग्नाआधी हत्यार व्यवस्थित चालते की नाही ते तपासून घे. लग्नाच्या पहिल्या रात्री व्यवस्थित जमले नाही तर बायको कायमची निघुन जाईल". या मानसिकतेमुळे "विवाहपूर्व सबंध" ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. पौगंडावस्थेत होणारी शारीरिक मानसिक स्थित्यंतरे, भावनिक बदल, समवयस्क मित्रांचा प्रभाव, घरातील आणि समाजातील असलेला धाकाचा अभाव, आर्थिक स्वातंत्र्य यामुळे अविवाहित तरुण शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना शास्त्रीय माहिती मिळण्याची शक्यता तशी कमीच ती जर पूर्ण मिळाली नाही तर मुलांवर "अर्ध्या हळकुंडाने पिवळे" होण्याची वेळ येते याचाच नकारात्मक परिणाम मुलांच्या वर्तनात होतो आणि बलात्कारासारख्या घटना घडतात.

प्रेम आणि आकर्षण यातील फरक ओळखण्याचे हे वयच नसते. आकर्षणालाच प्रेम असे समजले की लैंगिक संबंध ठेवले जातात. परिस्थिती हाताबाहेर गेली तर, झालेली चूक लक्षात आल्यावर, समाजात नाचक्की होईल म्हणून, शिक्षा भोगावी लागणार नाही म्हणून हे नराधम डास मारल्याप्रमाणे मुलींची हत्या करतात.

सडके पौरुष म्हणजे जसे आंब्याच्या पेटीतील एका सडक्या आंब्यामुळे बाकीचे आंबे पण सडतात त्याप्रमाणे समाजात काही पुरुष आहेत ज्यांच्यामुळे मुली आणि महिलांचा सुरक्षिततेचा मुद्दा जगभरात एैरणी वर आलेला आहे.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all