Login

सगळी जबाबदारी तिचीच कशी..? भाग 2

Sagali Jababdari Tichich Kashi
सगळी जबाबदारी तिचीच कशी..?भाग 2

सहा महिन्यानंतर रीमाने ऑफिस जॉईन केलं. ती काही तासच ऑफिसमध्ये काम करायची, बाकी काम घरी येऊन करायची.

पण तेवढा वेळही रीमाचे सासू सासरे मुलीचा सांभाळ करत नसत.

"आमच्याने काही ही जमायचं नाही." असं म्हणून हात वर करायचे.

काही दिवसांनी रीमाने तिच्या मुलीला पाळणा घरात ठेवले, प्रशांतने खूप विरोध केला. त्याला सत्य परिस्थिती कळत नव्हती किंवा कळूनही त्याला ती समजून घ्यायची नव्हती. एकदा का त्याने रीमाची बाजू समजून घेतली असती तर त्यालाही तिचा त्रास जाणवला असता पण त्याने तसं कधीच केलं नव्हतं. तिने त्याला खुपदा सांगायचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही.

एक दिवस रीमाला ऑफिसमधून यायला उशीर झाला, येताना ती अनयाला घेऊन आली.
घरी आली तर सासुबाई टीव्ही बघत बसल्या होत्या.
अनया भुकेने रडत होती, रीमा किचन मध्ये गेली आणि अनया साठी खायला बनवलं.
तिने विचार केला की अनयाला सासुबाई जवळ देते त्या खाऊ घालतील तोपर्यंत माझा स्वयंपाक तयार होतो.
ती अनयाला घेऊन हॉल मध्ये गेली.

“आई अनयाला भूक लागली आहे तुम्ही तिला भरवून द्याल का? तोपर्यंत मी स्वयंपाकाच बघते.”

“नाही ग बाई मला काय ते काम जमत नाही, एकतर ती जेवताना रडेल. धड जेवणारही नाही आणि धड मला टीव्ही बघू देणार नाही. तूच काय ते तिला भरवं आणि मग कर स्वयंपाक.”

“आई आधीच उशीर झालाय.”

“मग मी काय करू उशीर झाला तर? कर तू तुझं उगीच माझ्या मागे लागू नकोस. माझी सिरीयल मला बघू दे. जा तू तिला घेऊन किचनमध्ये, तिच्या आवाजाने बाकीचं काही आवाज येत नाही.” असं बोलून सासूने मान फिरवली.

रीमा अनायाला घेऊन तिच्या खोलीत गेली आणि तिला भरवलं, त्यानंतर स्वयंपाकाला लागली स्वयंपाक होत पर्यंत रात्रीचे नऊ वाजले. रीमाच्या सासूची बडबड सुरू झाली.

“नऊ वाजले तरी जेवायला मिळालेल नाही आहे, आज  जेवण मिळेल की नाही कुणास ठाऊक?"

सासुबाई जोरात बोलायला लागल्या.

सासर्‍यांकडे  बघत,

"बघा हो काय ती तुमची लाडकी सून नऊ-साडेनऊ झाले तरी जेवायला देत नाहीये."

पुन्हा किचनच्या दिशेने बघून ओरडायला लागली.

"काय ग स्वयंपाक झाला नाही का तुझा?”

“आई होतच आलेला आहे आणि  मी वाढून देते तुम्हाला.” असं म्हणून रीमाने त्या दोघांना वाढलं. तोवर प्रशांत घरी आला.

“सॉरी रिमा मला जरा जास्तच उशीर झाला.”

“इट्स ओके.”


रीमाचे डोळे पाणवलेले होते पण तिला ते प्रशांतला दिसू द्यायचे नव्हते.

जेवण करून सगळे झोपले.


रोज हे असं चालायचं कधी कधी रीमाला खूप रडायला यायचं. इतका सगळं करूनही कुणाचे दोन शब्द प्रेमाचे तिला मिळत नसत. प्रशांतही त्याला काम असलं तेव्हाच गोड गोड बोलायचा नाही तर तोही तिच्यावर ओरडायचा.

बघता बघता दिवस सरकत गेले आणि रिमा पुन्हा प्रेग्नेंट झाली. यावेळी रीमाला अजिबात इच्छा नव्हती, तिला बाळ ठेवायचं नव्हतं पण प्रशांतच्या हट्टा पायी तिने बाळ स्वीकारलं, पुन्हा सगळं ते तसंच घडलं.

रीमाला दुसरा मुलगा झाला, याही वेळी रीमाच्या सासूने कुठलीच मदत केली नव्हती, त्यांनी तिला त्रास देणं सुरू केलं.


आता रीमाने ठरवलं की सगळ्या कामाला बाई लावायची. कारण रीमाच्याने तेवढी दगदग होत नसे. घर, ऑफिस, दोन दोन मुलांचं सगळं करून रीमाला एकटीलाच सगळं करायला लागायचं.

तिला कुणाचीच मदत होत नव्हती, उलट तिचा त्रास वाढत जात होता. सासूबाईची टोमणे वाढत होते, हळूहळू मुलं मोठी व्हायला लागली शाळेत जायला लागली. आता तर रीमाचे आणखी काम वाढले. त्यांचा अभ्यास घेणे, वेळच्या वेळी त्यांच्या स्कूलशी संपर्क ठेवणे. अपडेट राहणे सगळ्या गोष्टी वाढत गेल्या.

रीमाने कामाला बाई ठेवली. त्यातही सासूची कुजबुज सुरू होती पण रीमाने त्यांच्याकडे लक्ष दिले नव्हते. तिने घरच्या प्रत्येक कामाला बाई ठेवली, बाई येऊन सगळं काम करून जायची, संध्याकाळचा स्वयंपाक पण बाई करून जायची.

घरी आल्यानंतर रीमा तिच्या मुलांचं करून बाकीच्यांना जेवण वाढायची.

बघता बघता मुलं मोठी व्हायला लागली आणि शिक्षणासाठी ती बाहेर शिकायला गेले, आता घरात फक्त रिमा, प्रशांत आणि सासू-सासरे राहायचे, मुलं सुट्ट्या मध्ये भेटायला यायचे, कधी रीमा त्यांना भेटायला जायची.


एक दिवस अचानक,

"रिमा उठ ग. हे बघ अशी गंमत मला अजिबात आवडत नाही."
तिच्या कडून काहीच प्रतिसाद मिळत नाही आहे बघून तो घाबरला,  लगेच तिला हॉस्पिटलला घेऊन गेला.