Login

सगळी जबाबदारी तिचीच कशी...भाग 3

Tinech ka sagal karaych


सगळी जबाबदारी तिचीच कशी...भाग 3

कधी कधी रीमाला खूप रडायला यायचं. त्या घरात आल्यापासून तिचं अस्तित्व संपलं होतं. तिचं शिक्षण, तिची हुशारी काहीच कामी नव्हतं. त्यातून सावरून तिने मुलीला वेळ द्यायचा ठरवलं. घरातलं सगळं करून दुपारचा वेळ ती तिच्या मुलीला द्यायची. सहा महिन्यानंतर रीमाने ऑफिस जॉईन केलं. ती काही तासच ऑफिसमध्ये काम करायची, बाकी काम घरी येऊन करायची.

पण तेवढा वेळही रीमाचे सासू सासरे मुलीचा सांभाळ करत नसत. रीमाने तिच्या मुलीला पाळणा घरात ठेवले, प्रशांतने खूप विरोध केला. त्याला सत्य परिस्थिती कळत नव्हती किंवा कळूनही त्याला ती समजून घ्यायची नव्हती. एकदा का त्याने रीमाची बाजू समजून घेतली असती तर त्यालाही तिचा त्रास जाणवला असता तर त्याने तसं कधीच केलं नव्हतं.

एक दिवस रीमाला ऑफिसमधून यायला उशीर झाला, येताना ती अनयाला घेऊन आली.


घरी आली तर सासुबाई टीव्ही बघत बसल्या होत्या.


अनया भुकेने रडत होती, रीमा किचन मध्ये गेली आणि अनया साठी खायला बनवलं.


तिने विचार केला की अनयाला सासुबाई जवळ देते त्या खाऊ घालतील तोपर्यंत माझा स्वयंपाक तयार होतो.
ती अनयाला घेऊन हॉल मध्ये गेली.

“आई अनयाला भूक लागली आहे तुम्ही तिला भरवून द्याल का? तोपर्यंत मी स्वयंपाकाच बघते.”

“नाही ग बाई मला काय ते काम जमत नाही, एकतर ती जेवताना रडेल. धड जेवणारही नाही आणि धड मला टीव्ही बघू देणार नाही. तूच काय ते तिला भरवं आणि मग कर स्वयंपाक.”

“आई आधीच उशीर झालाय.”

“मग मी काय करू उशीर झाला तर? कर तू तुझं उगीच माझ्या मागे लागू नकोस. माझी सिरीयल मला बघू दे. जा तू तिला घेऊन किचनमध्ये, तिच्या आवाजाने बाकीचं काही आवाज येत नाही.” असं बोलून सासूने मान फिरवली.

रीमा अनायाला घेऊन तिच्या खोलीत गेली आणि तिला भरवलं, त्यानंतर स्वयंपाकाला लागली स्वयंपाक होत पर्यंत रात्रीचे नऊ वाजले. रीमाच्या सासूची बडबड सुरू झाली.

“नऊ वाजले तरी जेवायला मिळेल की नाही कुणास ठाऊक? बघा हो काय ती तुमची लाडकी सून नऊ-साडेनऊ झाले तरी जेवायला देत नाहीये. काय ग स्वयंपाक झाला नाही का तुझा?”

“आई होतच आलेला आहे आणि मी वाढून देते तुम्हाला.” असं म्हणून रीमाने त्या दोघांना वाढलं. तोवर प्रशांत घरी आला.

“सॉरी रिमा मला जरा जास्तच उशीर झाला.”

“इट्स ओके.”
रीमाचे डोळे पाणवलेले होते पण तिला ते प्रशांतला दिसू द्यायचे नव्हते.

क्रमशः

0

🎭 Series Post

View all