मुलीचा फोटो आला तशा मालतीताई हरखुनच गेल्या. वेस्टर्न लूकमधील मुलीचा फोटो मालती ताईंना खूपच भावला. होणाऱ्या सूनेबद्दलच्या मालती ताईंच्या अपेक्षा त्यांच्या मैत्रिणीला आधीच ठावूक होत्या. त्यानुसार तीने अगदी मालतीताईंना आवडेल असाच भाचीचा फोटो पाठवला होता. मुलगी तर फोटो पाहताक्षणी नजरेत भरली होती त्यांच्या. श्रीकांतला फोटो दाखवण्याचा मोह मग नाही आवरला मालती ताईंना.
पण, श्रीकांतच्या मनावर, हृदयावर आता शरयूचेच नाव कोरले गेले होते. त्या पहिल्या भेटीतून तो अजूनही बाहेर आला नव्हता. उठता- बसता खाता -पिता त्याला फक्त आणि फक्त शरयुच दिसत होती. तिचे ते लाजणे, चोरून श्रीकांतकडे बघणे, गालावर रुळनारी बट नाजूकशा बोटांनी हलकेच कानामागे सरकवणे, पण तरीही तिचे पुन्हा पुन्हा गालावर येणे सारे काही नजरेत, हृदयात साठवले होते श्री ने. त्यामुळे आता कितीही मॉडर्न मुली समोर आणून उभ्या केल्या मालतीताईंनी, तरी त्याचा श्रीकांतवर काहीही परिमाण होईल असे वाटत नव्हते.
मालती ताईंनी मुलीचा फोटो श्रीच्या समोर धरताच त्याने तो फोटो पाहण्याची तसदी सुध्दा घेतली नाही. स्पष्ट शब्दांत आईला त्याने सांगून टाकले,
"आता लग्न करील तर फक्त शरयू सोबतच. दुसऱ्या मुलीचा विचारही आता डोक्यात येणे नाही, आणि नसेलच तुला ऐकायचे तर आणखी मुली शोधण्याचा अयशस्वी प्रयत्नही बिलकुल करु नकोस. कारण शरयू नाही तर दुसरी कुणीच नाही. पाहताच क्षणी मनाने मी तिला माझी अर्धांगिनी म्हणून तेव्हाच स्वीकारले आहे. तिच्याशिवाय जगण्याचा मी आता स्वप्नातही विचार करु शकत नाही."

"आई, अगं काही व्यक्ती पाहताक्षणी मनाला भावतात, आपल्याशा वाटतात तसेच काहीसे वाटले मी शरयूला पहिल्यांदा पाहिले तेव्हा."
" माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर आई पण मी नाही आता माझा निर्णय बदलू शकणार. आणि दुसऱ्यांदा तुला हे मी सांगतोय. पुन्हा पुन्हा नाही सांगणार. तुला जे योग्य वाटेल ते तू कर आणि मला जे योग्य वाटेल ते मी करतो."
एवढे बोलून श्रीकांत निघून गेला. आप्पांनी माय लेकाचे सारे बोलणे ऐकले होते. मालती ताईंना समजावण्याचा त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केला.
"हे बघ मालती; मुलांच्या भावनांशी खेळण्याचा आपल्याला काही एक अधिकार नाहीये. लहान नाही राहिला आता आपला श्री. अग याआधी कधी तो गेला का तुझ्या शब्दाबाहेर?? आणि अजूनही नाही जात."
"पण आता प्रश्न त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा आहे. त्याचं आयुष्य त्याला कोणासोबत घालवायचं हा सर्वस्वी त्याचा प्रश्न आहे. आणि तसंही तो स्वतः नव्हता गेला शरयूला मागणी घालायला. आपल्याच म्हणण्याचा मान ठेवून तो आला ना आपल्यासोबत. आपणच त्याला या स्वप्नांच्या दुनियेत घेवून गेलो आणि आता पुन्हा आपणच त्याला तिथून खाली खेचायचं.?"
"मला तरी हे मुळीच पटत नाही आणि तसंही शरयू लाखात एक मुलगी आहे. अगं श्री साठी ती अगदीच योग्य आहे. हा, आता तिचे मत तिने स्पष्ट सांगितले तर या एवढ्याशा कारणावरून तू तिला जज नको ग करुस."
"आणि एक गोष्ट तुझ्या लक्षात येतिये का, जेव्हापासून आपण शरयूला पाहून आलोय तेव्हापासून श्री किती बदललाय ते. किती आनंदी आहे तेव्हापासून तो. नको ग त्याचा हा आनंद त्याच्यापासून हिरावून घेवूस."
"श्री आणि शरयूची जोडी अगदी लाखात एक आहे. तूही स्वतःच्या नजरेतून तिची पारख केलीच आहेस ना. अगं खूप हुशार आणि संस्कारी मुलगी आहे ती. पाहिलं ना तू त्याच दिवशी किती बिंदासपणे आणि खरी खरी उत्तरे देत होती ती. आणि असे असतानाही तू जर ह्या लग्नाला नकार दिलास तर श्री पासून तू स्वतःला कायमचं दूर करशील."
आप्पा खूप पोटतिडकिने मालती ताईंना समजावत होते.
आप्पांचे बोलणे मालती ताईंनी शांतपणे ऐकून घेतले.
"खरंच मी श्री चा आनंद हिरावून घेत आहे का?? त्याच्या भावनांशी खेळत आहे का?? खरंच श्री इतका मोठा झाला का?. स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेण्याइतपत तो सक्षम झाला आहे का?"
असे एक ना अनेक प्रश्न मालती ताईंच्या डोक्यात थैमान घालू लागले.
या साऱ्या विचारांनी मालती ताईंचे डोळे पाणावले. आईचे मन ते लेकराच्या बोलण्याने दुखावले गेले.

आप्पांच्या बोलण्याचा देखील मालती ताईंवर परिणाम झाल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. त्याही आता लेकाच्या सुखासाठी योग्य तोच निर्णय घेतील याची खात्री होती आप्पांना.
तिकडे श्रीच्या मनाची घालमेल काही केल्या थांबायचं नाव घेईना.
"काय अशी जादू केली ह्या पोरीने?? इतका कसा बदललो मी चारच दिवसांत?? इतक्या मुली आजूबाजूला असतात पण कधीच कोणाबद्दल असा विचार आला नाही डोक्यात."
"पण,जसं शरयूला भेटून आलोय तेव्हापासून वेगळीच ओढ निर्माण झाली आहे मनात. ती सोडून दुसरा कोणताच विचार डोक्यात येत नाही. कामातही लक्ष लागत नाही. पण नुसत्या तिच्या विचारानेही मन आनंदी होते. स्वप्नांच्या दुनियेत ते हरवते. तिचा चेहरा आठवून वेगळाच उत्साह संचारतो मनात."
"तिच्यासाठी आज पहिल्यांदा मी आईला इतकं तोडून बोललो. काहीतरी हातातून निसटतंय हे ध्यानात येताच मन बेचैन झाले. आणि मनातील भावना शब्दांच्या अधीन झाल्या. नकळतपणे पहिल्यांदा स्वतःसाठी काहीतरी मिळवण्यासाठी मी धडपडलो. चूक काय बरोबर काय हा विचारही केला नाही क्षणभर."
"आईने लग्नाला नकार दिला तसा माझ्या भावनांचा बांध तुटला. अविचाराने आईच्या मताचा मी अनादर केला. कितीही झालं तरी ती माझी आई आहे. खूप दुखावली गेली असेल माझ्या बोलण्याने."
"पण मी तरी काय करु? इतर कोणत्याच मुलीला शरयूच्या जागेवर आता मी पाहूच शकत नाही. तिने माझ्या हृदयाचा, मनाचा कधी ठाव घेतला ते माझे मलाच समजले नाही."
"पण मी तरी काय करु? इतर कोणत्याच मुलीला शरयूच्या जागेवर आता मी पाहूच शकत नाही. तिने माझ्या हृदयाचा, मनाचा कधी ठाव घेतला ते माझे मलाच समजले नाही."
सायंकाळी घरी येताच श्रीने आईची माफी मागितली.
"आई जमलं तर मला माफ कर ग. थोडं अविचाराने वागलो मी सकाळी. खूप तोडून बोललो मी तुला."
"आई जमलं तर मला माफ कर ग. थोडं अविचाराने वागलो मी सकाळी. खूप तोडून बोललो मी तुला."
त्याचे हे बोल ऐकताच मालती ताईंना स्वतःचाच राग आला.
"किती विचार करतो हा माझ्या मनाचा. पण मी मात्र थोडासुद्धा विचार नाही केला त्याच्या मनाचा. अविचाराने श्री नाही तर मी वागते आहे."
याची जाणीव मालती ताईंना झाली.
याची जाणीव मालती ताईंना झाली.
श्री ला जवळ घेत त्या म्हणाल्या,
"शक्य झालं तर तू मला माफ कर बाळा. मी उगीचच ताणायला नको होते. खेड्यातली सून नको हा माझा अट्टाहास मी तुझ्यावर लादायला नाही पाहिजे हे काही काळ मी विसरूनच गेले होते."
"शक्य झालं तर तू मला माफ कर बाळा. मी उगीचच ताणायला नको होते. खेड्यातली सून नको हा माझा अट्टाहास मी तुझ्यावर लादायला नाही पाहिजे हे काही काळ मी विसरूनच गेले होते."
"हे बघ आई, मुलगी खेड्यातील असो किंवा शहरातील फक्त ती संस्कारी, विचारी आणि मोठ्यांचा आदर करणारी असायला हवी. आणि ह्या गोष्टी मुळातच असतील तर नव्याने काही तिला शिकवाव्याच लागणार नाहीत ग."
"शरयूमध्ये मला हे सगळेच गुण दिसतात. जे की तूही नोटीस केले आहेतच. राहिल्या बाकीच्या गोष्टी तर परिस्थितीनुसार आपोआपच ती शिकेल."
"शरयू तर खूप फॉरवर्ड विचारांची आहे. जरी खेड्यात वाढली असली तरी शहरातही ती लवकरच रुळेल."
"विशेष म्हणजे हुशार आहे. स्वत:ची तिची काही मते आहेत. आणि ती ठामपणे मांडण्याची तिची नेहमी तयारी असते. त्यातच तिचा आत्मविश्वास तर मला खूपच भावला. पहिल्याच भेटीत कधी तिच्या प्रेमात पडलो ते समजलेच नाही ग. आता कुठे आम्ही एकमेकांना ओळखू लागलोय. हळूहळू अजून जाणून घेवू एकमेकांना."

"लग्नाआधीच जर आमच्यात छान मैत्री झाली, एकमेकांच्या आवडीनिवडी जर समजल्या तर लग्नानंतर बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. आणि पुढे जावून तिही आपलेपणाची भावना घेवूनच या घरात प्रवेश करील. असं मला तरी वाटतं ग."
"श्री तुझी निवड चुकीची आहे असं माझं कधीच म्हणणं नव्हतं. आणि यापुढेही नसेल. आणि त्यात तीच्याबद्दल माधवरावांनी इतकी माहिती दिली म्हटल्यावर आणि स्वतः आपण सगळं अनुभवल्यावर माझा नाही म्हणण्याचा प्रश्न येतच नाही. फक्त लहानपणी मी ज्या गोष्टी जवळून अनुभवल्या त्या तिच्याही वाट्याला येणार याची मनात कुठेतरी भीती निर्माण झाली होती रे.
म्हणून खेड्यातली मुलगी मला सून म्हणून नको म्हणत होते मी."
म्हणून खेड्यातली मुलगी मला सून म्हणून नको म्हणत होते मी."
"तिचं राहणीमान, वागणं ,बोलणं यावर कोणी नावे ठेवायला नको एवढंच आतापर्यंत मला वाटायचं. कारण कितीही झालं तरी खेड्यात वाढल्यामुळे त्या वातावरणाचा परिणाम होतोच. पण शहरातील मुली याबाबतीत दोन पाऊल पुढे असतात. मीही अनुभवल्यात या गोष्टी. आणि आजूबाजूचा समाज तर थोडं जरी काही वेगळं वाटलं तरी लगेच नावे ठेवून मोकळा होता. मला माझ्या सूनेला असं कुणी नावे ठेवलेली तर बिलकुल नाही आवडणार."
"अगं आई, काहीही विचार करतेस तू. तू बोलतेस ते जरी खरं असलं तरी शरयू शिकलेली आहे ग. शहरात येणं जाणं आहे तिचं. मग तिला या गोष्टी नाही शिकवाव्या लागणार. आणि पुढे जावून तिला नोकरी मिळाली तर सासू म्हणून तुझी कॉलर ताठ नाही होणार का?"
"आणि तसंही आता पूर्वीसारखं काहीच राहिलं नाही ग. खेडीही आता खूप पुढे गेली आहेत. मुलीही खूप शिक्षण घेतात. नोकरी करतात. चूल आणि मूल ही संकल्पना केव्हाच मागे पडली."
"उलट मी तर म्हणेल गावच्या मुली शहरी मुलींपेक्षा थोड्या जास्त ॲक्टिव्ह असतात. एकवेळ शहरी मुलगी गावात adjust करु शकणार नाही पण गावची मुलगी शहराशी अगदी सहज जुळवून घेईल असा विश्वास वाटतो ग.
"उलट मी तर म्हणेल गावच्या मुली शहरी मुलींपेक्षा थोड्या जास्त ॲक्टिव्ह असतात. एकवेळ शहरी मुलगी गावात adjust करु शकणार नाही पण गावची मुलगी शहराशी अगदी सहज जुळवून घेईल असा विश्वास वाटतो ग.
"माझ्या माहितीप्रमाणे गावचे पालक त्यांच्या मुलींना शहरात द्यायला एका पायावर तयार होतात. पण शहरातील पालक त्यांची मुलगी खेड्यात देण्याचा विचारही करत नाहीत."
"हा तुझाच अनुभव आहे ना. मग तरीही लहानपणी तुझ्यासोबत घेडलेले काही प्रसंग शरयू सोबत पण घडतील हा विचार मनातून आता काढून टाक. आणि जरी आलीच तिच्यावर अशी वेळ तरी परिस्थिती कशी हाताळायची हे तिला चांगलेच माहिती आहे. ते मात्र आपल्याला नाही शिकवावे लागणार तिला."
"उलट मलाच तिच्याकडून ही गोष्ट शिकून घ्यायला हवी. असं वाटतं.
"उलट मलाच तिच्याकडून ही गोष्ट शिकून घ्यायला हवी. असं वाटतं.
"फक्त तू सासू म्हणून नाही तर मुलगी म्हणून तिचा स्वीकार कर. सुरुवात का एकदा तुझ्याकडून झाली की मग बघ तीही आई म्हणूनच तुझ्याकडे पाहील."
"काय आई..पटतंय का माझं म्हणणं."
"काय आई..पटतंय का माझं म्हणणं."
आईनेही मग होकारार्थी मान हलवली. मुलाच्या सुखातच आता आईचे सुख सामावले आहे. असा निर्धार आता मालती ताईंच्या मनात पक्का झाला होता.
पण तरीही, मनात कसलीतरी सल अजूनही बोचत होती मालतीताईंना.
एकुलती एक सून पण ती निवडण्याचाही अधिकार नव्हता त्यांना. तरीही उसने अवसान चेहऱ्यावर एकवटून त्याही त्यांच्या लाडक्या श्री च्या आनंदात स्वतःचा आनंद शोधत होत्या.

तितक्यात श्रीकांतचा फोन वाजला. शरयू फोन करणार होती आज. लगेच त्याला आठवले. आणि खरंच तिचाच फोन होता.
"हॅलो..मी पाच मिनिटात फोन करु तुला..?"
"तुला" हा शब्द ऐकून शरयू क्षणभर बावरली. खूप जवळचा वाटला तिला तो शब्द तेही श्री च्या तोंडून ऐकताना छान वाटले तिला.
" हो, हो त्यात विचारायचे काय? चालेल करा नंतर कॉल."
शरयू चा फोन आला तसा श्री चा चेहरा उजळला. "आई मी फ्रेश होतो ग. आणि आता नको जास्त विचार करत बसू."
"श्री शरयू चा फोन होता ना??" मालती ताईंनी विचारले.
"हो आई. तुला कसं समजलं?"
"तुझा चेहरा सांगतोय ना ते. आजकाल खूप आनंदी असतोस तू. असाच नेहमी आनंदी राहा. आणि शरयूला माझ्याकडून खूप मोठ्ठं थँकयु सांग."
" का ग?? ते आणि कशासाठी आता??"
" माझ्या लेकाला इतकं आनंदी ठेवण्यासाठी."
आईची अशी प्रतिक्रिया ऐकून श्रीचा चेहरा पुन्हा एकदा आनंदाने उजळला.
"तिला सांगेल मी. पण त्याआधी तुला माझ्याकडुन खूप मोठ्ठं थँक्यू."
म्हणत श्री ने आईला घट्ट मिठी मारली.
तशा मालती ताई मनातून खूप सुखावल्या. कारण आज कितीतरी दिवसांनी श्रीकडून आईला असं मिठीचं सुख मिळालं होतं. मुलं मोठी झाली की ह्या गोष्टी आपोआपच मागे पडत जातात तसंच श्रीचंही झालं होतं.
पण आज फक्त शरयूमुळे त्यांना हे सुख पुन्हा अनुभवायला मिळालं होतं. मनातून त्या खूप खुश होत्या.

श्री घाईतच मग फ्रेश झाला आणि लगेचच त्याने शरयूला फोन लावला. पण समोरुन काही रिप्लाय येईना.
"काय झालं असेल? फोन करायला उशीर झाला म्हणून रागावली असेल का ती?"
"काय राव सारखी चुकामूक होतीये. काय चाललंय हे?"
"काय राव सारखी चुकामूक होतीये. काय चाललंय हे?"
"आता तरी म्हटलं निवांत बोलता येईल. पण मॅडमने फोनच उचलला नाही."
"काय करु? करु का पुन्हा एकदा ट्राय? पण सारखं फोन करत राहिलं तर अजून चिडायची. मग बोलायचं तरी कधी आता?"
"काय करु? करु का पुन्हा एकदा ट्राय? पण सारखं फोन करत राहिलं तर अजून चिडायची. मग बोलायचं तरी कधी आता?"
श्रीकांत खूप विचारात पडला. पण तितक्यात शरयूचाच फोन आला.
"सॉरी हा कालपासून सारखी चुकामूक होतीये आपली." शरयू म्हणाली.
"हो ना. मला वाटलं तू रागावलीस की काय? वेळ लागला थोडा फोन करायला म्हणून."
"नाही ओ, त्यात रागवायचं काय? प्रत्येकाची काहीतरी अडचण असूच असते."
"बरं एक गोष्ट तू विसरतियेस. मी तुला अरे तुरे करतोय आणि तू मात्र अजूनही तिथेच आहेस."
"थोडा वेळ द्या ना मला. हळूहळू जमेल मलाही. पण माझी एक अट आहे, मी फक्त एकटं असतानाच तुम्हाला "श्री" म्हणेल. सगळ्यांसमोर असं एकेरी नावाने हाक मारणं योग्य नाही वाटत मला. काहींना आवडेल पण काहींना हे पटेलच असं नाही ना."
"अगं जमलं की तुला, कशाला वेळ हवा त्यासाठी, बोलता बोलता चक्क "श्री" म्हणालीस पण तू मला."
"बघ बरं किती सोप्पं आहे. आणि तसंही जवळचे सगळेच मला श्रीच म्हणतात. म्हणजे घरातील, नात्यातील आणि माझे जवळचे मित्र मैत्रिणी अगदी सगळेच. या सर्वांत आता तू एक ॲड झालीस बरं का."
श्रीच्या या बोलण्याने शरयूच्या चेहऱ्यावर लाजेची कळी खुलली. बोलता बोलता अनावधानाने ती कधी श्रीकांतला श्री म्हणाली हे तिचं तिलाही कळलं नाही.
"बरं रागावणार नसशील तर एक विचारु?" हक्काने श्री बोलला.
"तुम्ही दरवेळी अशी परमिशन नका हो मागत जावू, जे आहे ते बिंदास बोला. शरयू खूप आपलेपणाने उत्तरली.
"मला एक खरं खरं सांग, तुला नक्की आवडलोय ना मी? की फक्त मोठ्यांच्या शब्दाचा मान राखतियेस?"
"आयुष्यात पुढे जे होईल ते होईल पण सद्ध्या तरी एक चांगला मित्र म्हणून तुझ्या भावना तू माझ्याशी अगदी मनमोकळेपणाने शेअर कराव्यात असं मला तरी वाटतं."
"आयुष्यात पुढे जे होईल ते होईल पण सद्ध्या तरी एक चांगला मित्र म्हणून तुझ्या भावना तू माझ्याशी अगदी मनमोकळेपणाने शेअर कराव्यात असं मला तरी वाटतं."
"तसं नाही रे श्री..."
\"थांब थांब काय म्हणालीस पुन्हा एकदा बोल"
शरयूचे वाक्य मधेच तोडत आनंदाच्या भरात श्री जवळपास ओरडालाच.
"माझ्या कानांवर माझा विश्वासच बसत नाहीये. अगदी मला जसं अपेक्षित होतं तसंच तू माझं नाव घेतलंस."
"थॅन्क्स यार. खरंच तूझ्या रुपात मला एक गोड अशी मैत्रीण मिळाली."

"आणि मलाही, एक गोड असा मित्र मिळाला तुझ्या रुपात."
"पण खरं सांगू का श्री, जशी पहिल्या नजरेत मी तुला आवडले अगदी तितकाच तूही मला भावलास."
"का कोण जाणे पण त्याच क्षणी तुला मी माझा जोडीदार म्हणून निवडले होते. पण शेवटी मला एकटीला हे वाटून काहीच उपयोग नव्हता. तुझा, तूझ्या घरच्यांचा निर्णय महत्त्वाचा होता."
"अगं हे सगळं असं होतं तर मग लग्नासाठी इतकी लांबड का लावलीस??"
"अरे तुमचा असा एकाच दिवसांत होकार येणं अपेक्षित नव्हतं मला. त्यात तू शहरातला आणि मी पडले खेड्यातली. त्यामुळे थोडी शंका वाटली रे बाकी काही नाही."
"माधव काकांकडून जरी तुझ्याबद्दल सगळं समजलं होतं तरी आजुबाजूला घडणाऱ्या काही घटना ऐकून मन तयारच होइना लगेच होकार द्यायला. म्हणून थोडा वेळ मागितला रे."
आता कुठे दोघांचे सुर जुळायला सुरुवात झाली होती. फोनवरचे त्यांचे हे पहिलेच संभाषण पण नाते मात्र जन्माचे वाटत होते. आपलेपणाची हक्काची भावना निर्माण झाली होती नात्यात. दिवसागणिक ही ओढ वाढणार यात शंकाच नाही.
आता मालती ताईंचा तर या लग्नाला होकार मिळाला, मग तो कसा का असेना. पण शरयू होईल का लगेच लग्नाला तयार.? अजून किती वेळ घेणार ती श्री ची परीक्षा? लग्नाआधी शरयू आणि श्रीकांतचे नाते असेच फुलत जाणार की येणार त्यात काही विघ्न? जाणून घ्या पुढील भागात.
क्रमशः
©® कविता सुयोग वायकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा