सहज सुचलं म्हणून ! पार्ट 2

.
यत्न करतो तुला विसरायचा
गतकाळ सारा तो मिटवायचा
पण मन माझे सोडेना अट्टहास
त्याला आहे फक्त तुझाच ध्यास

मला तुझ्या आठवणी छळतात
तुला कुठे माझ्या भावना कळतात ?
भेटुनी छळते रोज तू मला स्वप्नात
मग का नाही दिसतेस प्रत्यक्षात ?

आवड नाही तुला त्रास देण्याची
हिंमत नसे मनाला समजवण्याची
कधीतरी भेटशील का भविष्यात
की येईल मृत्यू या क्रूर विरहात

दुरूनच तुला पाहायचे आहे
दुरुनच तुला ऐकायचे आहे
नको प्रेम , नको मैत्री तुझी
फक्त एकदाच तुला भेटायचे आहे !

©® पार्थ धवन



🎭 Series Post

View all