सहावी माळ: देवी कात्यायनी
“या देवी सर्वभूतेषु मां कात्यायनी रूपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।“
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।“
शारदीय नवरात्रीत ललितपंचमीनंतर दुर्गादेवीच्या सहाव्या रूपाचें पूजन केले जाते. दुर्गादेवीचे सहावे रूप म्हणजेच कात्यायनी देवीची पूजा केली जाते.
तेजस्वी, लाघवी व चार भुजा असलेल्या देवीच्या वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे. दोन हात अभय मुद्रा आणि वरमुद्रेत आशीर्वादरुपी आहे.
तेजस्वी, लाघवी व चार भुजा असलेल्या देवीच्या वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे. दोन हात अभय मुद्रा आणि वरमुद्रेत आशीर्वादरुपी आहे.
२०२४ मध्ये पार पडलेल्या पॅरालिम्पिक्स स्पर्धेत आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीने पॅरिस गाजविणारी युवा धावपटू म्हणजेच प्रीथी पाल. तिच्या कामगिरीची तेजस्विता, उद्दिष्टांपर्यंत धावण्याच्या खटाटोप व अडचणींच्या डोंगरावर आरुढ होऊन जगाला गवसणी घालण्याचे स्वप्न हे देवी कात्यायनीची अनुभूती देणारेच आहे.
सेरेब्रल पाल्सीने जरी जीवनातला ताळमेळ गमवला तरी धावण्याच्या लयबद्धतेला थोडा धक्का देखील देण्याची हिम्मत या आजाराकडे नव्हती.
देवी कात्यायनीप्रमाणे प्रीथीच्या एका हातात कमकुवत स्थितीला मारून टाकणारी तलवार,दुसर्या हातात यशरुपी कमळ, तिसर्या हातात पामर मनोवृत्तीच्या लोकांना माफ करण्याची शक्ती व चौथ्या हातात नकारात्मक परिस्थितीला सकारात्मक बनवण्याच्या शिकवणुकीचा आशीर्वाद धारण करून असते.
“अंथरुण पाहून पाय पसरावे” या वाक्प्रचाराला छेद देत प्रीथीने एकाच पॅरालिम्पिक्समध्ये दोन कांस्य पदके मिळवून अंथरुणाला कसे मोठे करावे हे सर्व जगाला दाखवून दिले व असा विक्रम करणारी ती दुसरी भारतीय खेळाडू ठरली.
तर या युवा धावपटू प्रीथीला तिच्या कामगिरीच्या धावपट्टीवर अनेक पदके मिळून वेगवेगळे विक्रम नोंदविण्याचे यश लाभो हिच देवी कात्यायनी चरणी प्रार्थना.
“सेरेब्रल पाल्सी आजारा कडे फिरविली पाठ,
प्रयत्न व ध्येयपूर्तीचा लागला ध्यास,
देशवासियांना दिला कांस्य पदकाचा आहेर.”
“सेरेब्रल पाल्सी आजारा कडे फिरविली पाठ,
प्रयत्न व ध्येयपूर्तीचा लागला ध्यास,
देशवासियांना दिला कांस्य पदकाचा आहेर.”
प्राजक्ता जोशी सुपेकर
०८|१०|२०२४
०८|१०|२०२४
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा