कवितेचे नाव -सहजीवन
कवितेचा विषय -दोन ध्रुवांवर दोघे आपण
राज्यस्तरीय कविता स्पर्धा फेरी -2
कवितेचा विषय -दोन ध्रुवांवर दोघे आपण
राज्यस्तरीय कविता स्पर्धा फेरी -2
विश्वासाने धरला होता हात
सप्तपदी चालताना,
तो विश्वास टिकवणं
सांग तुला जमलं का?
सप्तपदी चालताना,
तो विश्वास टिकवणं
सांग तुला जमलं का?
तडजोड केली अनेकदा
संसार आपला पेलताना
पण भावना जुळवून घेणं
खरंच तुला जमलं ना?
संसार आपला पेलताना
पण भावना जुळवून घेणं
खरंच तुला जमलं ना?
उभी राहिले पाठीशी
यशस्वी तू होताना
पण मला प्रोत्साहन देणं
नक्की तुला जमलं का?
यशस्वी तू होताना
पण मला प्रोत्साहन देणं
नक्की तुला जमलं का?
भक्कम आधार दिला
नाव तुझी डगमगताना
पण मला पैलतीरा नेणं
खरंच तुला जमलं का?
नाव तुझी डगमगताना
पण मला पैलतीरा नेणं
खरंच तुला जमलं का?
आई ही बनले तुझी मी
पत्नी धर्म निभावताना
पण कधी माझा बाप होणं
सांग ना तुला जमलं का?
पत्नी धर्म निभावताना
पण कधी माझा बाप होणं
सांग ना तुला जमलं का?
दोन ध्रुवांवर दोघे आपण
जीवन वाट चालताना
अर्धे अंतर चालले मी
अर्धेतरी तुला जमेल ना?
जीवन वाट चालताना
अर्धे अंतर चालले मी
अर्धेतरी तुला जमेल ना?
©®खुशी कांबळे
पालघर जिल्हा
पालघर जिल्हा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा