पंधरा वर्षांपूर्वी :-
"आत येऊ का?... अभि आहे का घरात?...", एक आठ्ठावीस एकोणतीस वर्षाची मुलगी दार वाजवत म्हणाली...
"कोण आहे?...", अभिची आई...
"नमस्कार काकू... मी युक्ता... अभिची मैत्रीण अभी आहे का घरी?...",युक्ता घरात प्रवेश करतच बोलते...
"युक्ता... म्हणजे ती कॉलेजमधली मैत्रीण का?...", अभिची आई...
"हो... तुम्ही ओळखता मला?...", युक्ता...
"हो तर... म्हणजे आपली कधी भेट झाली नसली तरी अभी खूप बोलायचा तुझ्याबद्दल... ये ना आत ये...", अभिच्या आई तिला घरात घेतात...
युक्ता घरात प्रवेश करते तेच तीची नजर एका भिंतीवर लावलेल्या फोटोकडे जाते... आणि त्यावर घातलेल्या चंदनाच्या हाराने ती हळहळते...
"आमची सून... तू ओळखत असशील ना?... तुमच्या कॉलेजमध्येच होती...", अभिच्या आई...
"हो... माझी आणि अभिची मैत्रीण होती ती...", युक्ता...
"अगं पण मग तू यांच्या लग्नाला का नव्हतीस ?...",अभिच्या आई...
"ती खूप मोठी स्टोरी आहे काकू जाऊद्या... पण मला आता दोन दिवसांपूर्वीच अंजली बद्दल समजलं... तशी मी अभिला भेटायला आले कुठे आहे अभि?... ", युक्ता...
"आहे ना... आता जरा तो बाहेर गेलाय...", अभिच्या आई बोलतच असतात की तेवढ्यातच दरवाजातून एका लहान मुलगी त्यांना हाक मारते...
"आज्जी मी आले..."
"आली का आमची चिऊताई... मग काय काय आणलं बरं आमच्या चिऊताईने?..."
"अम्म... हे बघ हा फ्रॉक, त्यावर मॅचिंग हेअर बँड, खूप सारे चॉकलेट्स आणि हे बघ नवीन वॉटरबॉटल..."
"अरे व्वा... बापाला चांगलंच लुटलंय पोरीने...", त्या युक्ताकडे पाहतच बोलतात...
"ए... चिऊताई कशी आहेस गं?...", युक्ता...
"मी चिऊताई नाहीये... मी कुमारी ऋचा चा अभिराज देशपांडे... "
"ओगं... किती गोड आहे हे पिल्लू...", युक्ता...
"तू कोण आहेस?... ए तू माझी न्यू आई आहेस का?..."
तिच्या या प्रश्नानंतर दोघीही एकमेकींकडे पाहू लागतात...
"न्यू आई?...", युक्ता प्रश्नार्थक नजरेने अभिच्या आईकडे पाहते...
"अगं... अभिचं दुसरं लग्न करायचा विचार करतोय...त्यासाठीच मुली पाहते...ही सात वर्षांची मुलगी आहे त्याच्या पदरात आणि त्याचं पण तर अजून कितीसं वय झालंय गं?... कोणी सोबत नको का म्हतारपणी?...", अभिच्या आई भावुक होऊनच बोलत असतात...
"मग कोणी मिळाली का?...", युक्ता...
"मिळायला काय लाईन लावेन मी मुलींची... पण हा मुलगा तयार झाला पाहिजे ना...", अभिच्या आई...
"आज्जी ही कोण आहे ते तर सांग...", ऋचा...
"अरे हो की... हॅलो पिल्ल्या मी युक्ता... तुझी युक्ता मावशी...", युक्ता...
"मावशी म्हणजे?...", ऋचा...
"आवशीची बहीण मावशी...", युक्ता...
"आता ही आवशी म्हणजे?...", ऋचा...
"आवशी म्हणजे आई...", युक्ता...
"म्हणजे तू माझ्या आईची बहीण आहेस?...", ऋचा...
"बहीण नाही पण बहिणी सारखीच मैत्रीण...", युक्ता...
"बरं चिऊताई बाबा कुठे आहे तुझा?...एकत्र गेला होतात ना?... येताना तू एकटीच?...", अभिच्या आई...
"हो येतोय गं तो मागून... त्याला शशांक दादा भेटला बाहेर तर त्याच्यासोबत बोलतोय...", ऋचा...
"बरं... तू जा पळ हात पाय धु... मी तुझ्यासाठी काहीतरी खाऊ बनवते तोवर...", अभिच्या आई...
"होsss...", असं ओरडत ऋचा आत पळते...
"मी आलेच गं तू बस...", असं सांगून अभिराजच्या आईही स्वयंपाकखोलीत निघून जातात...
आणि अभि दरवाजातून आत प्रवेश करतो... पांढरा शर्ट निळी जीन्स घातलेला... चेहऱ्यावरील तजेला कुठेतरी गमावूनच बसला होता कदाचित तो... अंजली जाताना कॉलेजमधला तो चॉकलेटबॉय अभिही घेऊन गेली होती... नेहमी टापटीप तयार होणारा अभि आज मात्र पार इस्त्री मोडलेल्या, चूरगळलेल्या शर्टसारखा झाला होता...
"हाय अभि... ओळखलंस?...", युक्ता त्याच्या समोर जात बोलते...
"अम्म... युक्ता... बरोबर युक्ता तू इथे?...", अभिराज...
"विसरलास का मला?...", युक्ता...
"नाही गं... पण खूप वर्षांनी भेटतोय ना तर थोडं... बस ना...", युक्ता आणि अभिराज सोफ्यावर बसतात...
"बोल काय म्हणतेस?... कुठे असतेस सध्या?...", तो शांतपणेच तिला विचारतो...
"कोकणात... कणकवलीला असते... आमचं मुळगाव आहे ना...", युक्ता...
"मुंबई का सोडलीत?... काही कॉन्टॅक्ट नाही काही नाही... ",अभिराज...
"होती काही कारणं...", युक्ता...
"मला न सांगण्यासारखी?...", अभिराज...
"नाही रे... पण आता जुनं उगाळून काय उपयोग ना?...", युक्ता...
"मग आज अचानक इथे कशी आलीस?...", अभिराज...
"अंजली बद्दल समजलं...", युक्ता...
"मला सोडून गेली यार ती...", बोलताना अभिचे डोळे पाणावले होते...
"अभि...", युक्ता त्याला थोडं जवळ घेतच बोलते...
"हे बघ अभि होणाऱ्या गोष्टीला कोणीही टाळू शकत नाही..."
"पण आम्हीच का?... तुला माहितेय ना आमचं एकमेकांवर किती प्रेम होतं..."
"आय नो..."
"आणि तुही मला एकटं सोडलं होतंस... जेव्हा मला तुझी सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा..."
"सॉरी... बघ अजूनही सुधारले नाहीये मी... अजूनही चुकते...", इतकं बोलून युक्ता त्याच्याकडे बघून हसते...
अभिही छोटीशी स्माईल देतो...
"हे घ्या दोघेही कॉफी घेता घेता बोला...", अभिच्या आई टेबलवर कॉफी ठेवतच बोलतात...
दोघेही कॉफी पिऊ लागतात...
"ऍक्चुली... दोन दिवसांपूर्वी समता भेटली होती... तिच्याकडूनच समजलं सगळं मला..."
"हो... समजेलच कसं आपण तर सगळे कॉन्टॅक्टच तोडले होतेत..."
"चिडू नको ना अभि काहीतरी झालं होतं रे..."
"मी चिडत नाहीये गं... मी आता ठरवलंय ज्याला यायचंय त्याला येऊ द्यायचं आणि जायचंय त्याला..."
"जाऊदे अभि..."
"काही हात नाही सोडावेसे वाटत गं..."
"पकडून ठेवलं तर त्रास जास्त होतो अभि..."
"मला नाही बोलायचंय काही..."
"बरं... मी तुला व्हाट्सअप वर मेसेज केलाय काही वाटलं तर मी आहे कधीही मेसेज कर..."
"आता त्याची गरज नाही वाटत... कारण आता तेवढं मोठं काही आयुष्यात घडेल असं वाटतच नाही..."
"अभि... बरं आता निघावं लागेल मला माझी ट्रेन आहे रात्री..."
"अजिबात नाही रात्रीचा प्रवास अजिबात नाही करायचा...", अभिच्या आई स्वयंपाकखोलीतून बाहेर येतंच बोलतात...
"काकू गाडीत मी एकटी असणार आहे का?... आणि गाडी पण मी चालवणार नाहीये...", युक्ता मिश्किलपणेच बोलते...
"तरीही नाही जायचं... आजचा पूर्ण दिवस आणि रात्री सुद्धा इथे राहायचं आहेस आणि उदया सकाळी उठून जा हवं तर अभि सोडेल तुला..."
"अहो पण..."
"थांब ना गं मावशी... प्लीज...", ऋचा युक्ताच्या जवळ येत छोटे डोळे करून बोलते...
"आताही नाही म्हणशील?...", अभिच्या आई...
"म्हणूच शकत नाही... थांबते हा चिऊताई..."
युक्ताचं हे वाक्य ऐकून ऋचा उड्याच मारु लागते...
"मी आलेच घरी फोन करून..."
"हो आणि नंतर आत ये स्वयंपाकघरात तुला बदलायला कपडे देते..."
"कपडे?..."
"तू आणले नसशील ना?..."
"खरंतर हो... एकच दिवसाचा प्रवास करायचा होता म्हणून..."
"मी देते तुला कपडे... तू जा घरी सांगून ये..."
युक्ता तिच्या घरी फोन करते आणि बोलू लागते... अभिराज आईने सांगितलेलं काही सामान आणण्यासाठी म्हणून परत बाहेर जातो... ऋचाही बाहेर तिच्या मैत्रिणीसोबत खेळायला निघून जाते... थोड्याचवेळात युक्ताचं बोलणं पूर्ण होतं... आणि ती स्वयंपाकखोलीत येते...
"काकू..."
"हो ये गं आत ये...झालं का बोलणं आईबाबांशी?...."
"हो काकू..."
"अगं छोटंसंच चाळीतलं घर आहे आपलं... "
"पण खूप टापटीप आहे..."
"आमच्या सुनबाईंची कृपा..."
"म्हणजे?..."
"अगं तिने खूप सुधारणा केल्या या घरात, घरातल्या माणसांत... अगदी सुतासारखं सरळ केलं असं म्हंटलंस तरी चालेल... आमचा अभि एकुलता एक असल्यामुळे खूप लाडाचा इतका पसारा करायचा तिने त्याला नीट केलं, आणि अभिचे बाबा त्याच्या वरचे.... दोन, तीनच वर्षांचा सहवास मिळाला गं आम्हांला तिचा पण आयुष्यभरासाठी खूप काही शिकवून गेलीय..."
"अंजली होतीच हुशार..."
"बरं ते बघ तिथे कपडे ठेवलेत मी काढून... अंजलीचेच आहेत पण तिने घातलेले नाहीयेत ती गेली ना त्याच्या काही दिवस आधीच घेतले होते... तुमची शरीरयष्टी सारखीच दिसते... होतील तुला ते कपडे जा बदलून ये... ते बघ बाथरूम..."
युक्ता कपडे बदलायला म्हणून बाथरूममध्ये निघून जाते...
(आजपुरतं एवढंच भेटू पुढच्या भागात... तोवर काळजी घ्या....)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा