"मी उद्याच माझ्या आईबाबांकडे परत जातेय...", ती भरल्या मनाने आणि भरल्या डोळ्याने बोलते...
"का?... आता काय झालं असं अचानक?... आज तर किती आनंदाचा क्षण आहे ना?... आपल्या ऋचाचं लग्न झालंय... आणि तू हे असं घर वगैरे सोडायची गोष्ट करत आहेस...", तो तिला समजावण्याच्या स्वरात बोलतो...
"तेच तर... आज एका जबाबदारीतून मुक्त झाले... ऋचाचं लग्न झालं... मोठी झाली माझी ऋचा... आता तिला आईची गरज नाही... तिच्याकडे तू आहेस... तिच्यावर प्रेम करणारा तिचा नवरा आहे तिचे आजी आजोबा, तिचे सासू सासरे सगळेच आहेत... तुम्हां सगळ्यांच्या प्रेमात मी अन माझं प्रेम होऊ शकतं अड्जस्ट... तिला यापुढे आता माझी, मी सोबत असण्याची गरजही पडणार नाही कदाचित...", ती...
"अगं पण आता असं अचानक झालंय काय?...", तो...
"कुठे काय?... काहीच नाही... पण आता असं वाटतंय खरंच आजवर ज्या नात्यासाठी आपण एकमेकांना बांधून ठेवलं होतं तिथून आता मुक्त होऊया...", ती...
"लग्नाच्या पंधरा वर्षांनंतर तुला आता डिवोर्स हवाय?...", तो...
"डिवोर्स बायकोला दिला जातो रे... फक्त आपल्या मुलीची आई असलेल्या बाईला तू डिवोर्स देणार आहेस?... खरंतर चालेल जगासाठी तरी आपण नवरा बायकोच आहोत ना...", ती...
"अगं पण असं झालंय तरी काय आज अचानक की तू असं बोलतेयस?... आपल्यात असं कधीच ठरलं नव्हतं... आणि माझं काही चुकलंय का?... बरं मी आजवर तुझ्या मतांचा आदर करत आलोय आजही करेन... तू तुझा निर्णय घेऊ शकतेस..."
त्याच्या या बोलण्याने मात्र... आतापर्यंत तिने डोळ्यात बांध घातल्याप्रमाणे अडवून ठेवलेले अश्रू तो बांध फोडून वाहू लागले... तसा तो तिच्या जवळ आला... आणि त्याने तिचा हात हातात घेत तिला त्याने खोलीत आणले व बेडवर बसवले...
"काय झालंय सांगशील प्लीज?... आपण इतक्या वर्षात नवरा बायको होऊ शकलो नसलो तरीही त्याआधीपासून मित्र आहोत... सांग मला काय होतंय?...", तो तिला शांतपणेच विचारतो...
"असहय झालंय...", ती...
"काय?...", तो...
"माझं तुझ्यावर असलेलं प्रेम...", ती...
"तुझं माझ्यावर प्रेम आहे?...", तो...
"तुला हा प्रश्न पडूच कसा शकतो बायको आहे ना मी तुझी... आणि किती शुष्क पणे विचारलंस तू हेही... आणि हेच मला आता सहन होत नाहीये...", ती...
"अगं पण आपलं ठरलं होतं ना?...", तो...
"ते ठरलं वगैरे नव्हतं ते तू मला सांगितलं होतंस स्पष्ट... मीही ते मान्य केलं तुझ्या त्या अवस्थेत म्हंटल होशील ठीक... आणि त्यावेळी मला ऋचा महत्वाची होती पण...", ती बोलता बोलताच मध्येच थांबते...
"पण काय?...", तो...
"पण या पंधरा वर्षात मी ऋचाची आई झाले, आई बाबांची लेक झाले तुझ्या बाजूची सगळी नाती सांभाळलीत आजवर मी... पण तुझी बायको होणं जमलंच नाही... मी खूप प्रयत्न केला पण नाहीच...", ती...
"मी तुला आधीच क्लिअर केलं होतं...", तो...
"लग्नाच्या पहिल्या दिवशी?... हे सांगायला तुला उशीर झाला असं नाही वाटत तुला अजूनही?... खरंतर त्यावेळी माझ्याकडे ना पर्याय होता ना इच्छा... इच्छा सुद्धा मरून गेली होती माझी त्या नकारांनी लग्न करायची... पण त्याचवेळी तू माझ्या आयुष्यात आलास... माझा सगळ्यात जवळचा मित्र... ज्याच्याशी माझी ओळख होती... जो मला खूप चांगलंच ओळखत होता... आणि ज्याने मला मातृत्व दिलं... पण आपण नवरा बायकोसुद्धा होतो ना...", ती...
"तू आता पूर्णपणे माझीच चूक काढत आहेस हा... ", तो...
"मला चुका काढायच्याच नाही आहेत आता कोणाच्या... मी उद्याच कणकवलीला परत जातेय बसsss...",ती...
"आपल्या आईवडिलांचा... नातेवाईकांचा तरी विचार कर या वयात असं निघून जाताना...", तो...
"त्यांचं काय आहे... ते बोलतातच असेही अन तसेही... आणि आईबाबा तुला वाटतंय का? त्यांना आजवर आपल्या नात्याबद्दल कळलं नसेल?... आईबाबा आहेत रे ते त्यांनी फक्त आपल्याला समजून घेतलं... तुला माहितेय माझी आई नेहमी नातेवाईकांशी भांडत आली आहे माझ्यासाठी, तुझ्यासाठी...", ती...
"का?...", तो...
"मी आजवर आई का होऊ शकले नाही अभी?... माझ्यात दोष होता म्हणून?...",ती...
तिच्या या प्रश्नावर मात्र तो निरुत्तर झाला होता...
"मला घरात एक मुलगी आधीच आई बोलत असताना... तीची मी आई झाले असताना... तिच्यावर नितांत प्रेम, संस्कार करूनही मी आजवर वांझच होते अभी... तुला माहितेय मी आणि आई जेव्हा एखाद्या बारशाच्या किंवा डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमाला जायचो... तेव्हा दूर ठेवायचे रे लोक मला... त्याहूनही वाईट काय माहितेय इतक्या वर्षात ना मी प्रेमाने कोणाच्या मिठीत शिरू शकलेय ना त्रास होत असताना कोणाला ती घट्ट मिठी मारून रडू शकलेय... माझ्या कपाळावर आजही कोणी किस नाही केलाय, असा चेहरा ओंजळीत धरून माझ्या डोळ्यात बघून आजवर कोणीच मला आय लव्ह यु नाही म्हंटलंय... आणि या एका गोष्टीमुळे मी अजूनही प्रेमापासून वंचित आहे रे... मला अजूनही वाटतं माझ्यावर कोणीही प्रेम करत नाही... किंवा माझी तितकी योग्यताच नाही आहे... पण अजून किती वर्ष?... हा प्रश्न उरतोच... आपली फ्रेंडशीप एनिवर्सरी साजरी करणारे आपण गेले पंधरा वर्ष आपला लग्नाचा वाढदिवस मात्र विसरतोय... तुला माहित आहे आज फक्त आपल्या ऋचाचं लग्न झालेलं नाहीये आज आपलंही लग्न झालं होतं पंधरा वर्षांपूर्वी... आणि तुझ्या तेही लक्षात नाही आहे...", ती...
"सॉरी...", तो...
"यु शुड बी...", ती...
"खरंतर मला तुला सॉरी फील नाही करवायचंय खरंच... बट यु शुड बी सॉरी... कारण मला खरंच त्रास होतोय या परकेपणाचा, या एकटेपणाचा, या सगळ्याचाच... सगळं जिंकून हरल्यासारखं वाटतंय... खरंच आज ना सगळंच सोडून... माझं तुझ्यावर, तुझ्या घरावर, ऋचावर, माझ्या आईबाबांवर असलेलं प्रेम सगळं सगळं विसरून स्वतःसाठी निघून जावंसं वाटतंय... आणि तसंही तू परवानगी दिलीच आहेस... त्यामुळे उद्याच निघेन... कणकवलीचं घर माझं आहे... तिथे नाही विचारणार कोणी मला आणि कोणी विचारलंच तरी मी नाही सांगणार तुझ्याबद्दल काही वाईट डोन्ट वरी... कारण काहीच वाईट केलं नाहीये तू माझ्या बाबतीत मला सहन न होणारी गोष्ट माझी आहे तीच सांभाळेन, विसरायचा प्रयत्न करेन जमलंच तर...", इतकं बोलून ती डोळे पुसतच तिथून निघून जाते...
ती म्हणजेच आपल्या कथेची नायिका युक्ता आणि तो अभिराज... युक्ता सुंदर, हुशार अन लाघवी... अन अभिराजही काही कमी नव्हता... तोही देखणा, हुशार पण थोडा शुष्क... त्याच्या परिस्थितीमुळे झालेला... खूप वाईट घडलं होतं दोघांच्याही आयुष्यात... पण त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली ती ऋचामुळे... ऋचा खरतर अभिराजची मुलगी... अभिराज अन त्याच्या पहिल्या बायकोची... तिच्यासाठी म्हणून हे दोघे बेस्ट फ्रेंड्स लग्नबंधनात अडकले होते... लग्नानंतर प्रत्येक मुलीची काही स्वप्न असतात तीच स्वप्न घेऊन अभिराजच्या संसारात युक्ताने प्रवेश केला होता पण तो मात्र अजूनही त्याच्या पहिल्या बायकोच्या प्रेमात, आठवणीत गुंतलेला... काय होईल पुढे... खरंतर मागे काय घडलंय?... युक्ता अशी निघून जायची भाषा का करतेय?... तिला तिचं प्रेम इतकं सोडून जाण्या इतपत असहय का झालंय?...ही कहाणी सुरु कुठून झाली?...आणि ती नेमकी संपेल कुठे?.. युक्ता आणि अभी नेमके आहेत कसे?... आणि उदया अभी युक्ताला जाण्यापासून अडवेल का?... हे तर कथा पूर्ण वाचल्यावर समजेल...
त्यामुळे कथा वाचत रहा...
ती म्हणजेच आपल्या कथेची नायिका युक्ता आणि तो अभिराज... युक्ता सुंदर, हुशार अन लाघवी... अन अभिराजही काही कमी नव्हता... तोही देखणा, हुशार पण थोडा शुष्क... त्याच्या परिस्थितीमुळे झालेला... खूप वाईट घडलं होतं दोघांच्याही आयुष्यात... पण त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली ती ऋचामुळे... ऋचा खरतर अभिराजची मुलगी... अभिराज अन त्याच्या पहिल्या बायकोची... तिच्यासाठी म्हणून हे दोघे बेस्ट फ्रेंड्स लग्नबंधनात अडकले होते... लग्नानंतर प्रत्येक मुलीची काही स्वप्न असतात तीच स्वप्न घेऊन अभिराजच्या संसारात युक्ताने प्रवेश केला होता पण तो मात्र अजूनही त्याच्या पहिल्या बायकोच्या प्रेमात, आठवणीत गुंतलेला... काय होईल पुढे... खरंतर मागे काय घडलंय?... युक्ता अशी निघून जायची भाषा का करतेय?... तिला तिचं प्रेम इतकं सोडून जाण्या इतपत असहय का झालंय?...ही कहाणी सुरु कुठून झाली?...आणि ती नेमकी संपेल कुठे?.. युक्ता आणि अभी नेमके आहेत कसे?... आणि उदया अभी युक्ताला जाण्यापासून अडवेल का?... हे तर कथा पूर्ण वाचल्यावर समजेल...
त्यामुळे कथा वाचत रहा...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा