Login

सकीना..भाग ३ ( अंतिम भाग)

एक सामाजिक कथा
सकीना
भाग: ३

इरफानने त्याच्या एका मित्राला, म्हणजेच अरबाजला सकीनाशी निकाह करायला तयार केले. ठरल्याप्रमाणे अरबाज आणि सकीनाचा निकाह झाला. पण या शादीनंतर सकीनाच्या आयुष्यात मात्र वेगळेच वादळ आले.
शादीच्या पहिल्याच दिवशी सकीना अरबाजच्या घरी पलंगावर बसली होती. अरबाज खोलीत आला आणि तिच्या शेजारी बसला. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला, त्याबरोबर तिने त्याचा हात झटकला आणि ती उठून उभी राहिली.

" काय झाले?" अरबाजने तिला विचारले. त्यावर सकीना गप्पच राहिली. तिला त्याच्याशी कोणतेही शारीरिक संबंध ठेवायचे नव्हते. मनाने ती त्यासाठी तयारच नव्हती.

" ये ना इकडे. अशी दूर दूर का जात आहेस?"

" ऐका ना, आपण असे काही करू नये. खरंच मला दुसऱ्या कुठल्याही पुरुषाबरोबर हे संबंध ठेवावेसे वाटत नाहीत. प्लीज, मला समजून घ्या. तुम्ही उद्याच मला तलाक द्या." सकीनाने विनंती करत म्हटले.

तिच्या या बोलण्यावर अरबाज हसला.

"अगं पण हे सगळे पूर्ण झाल्याशिवाय मला तलाक देता येणार नाही आणि आमचा तलाक झाल्याशिवाय तुला दुसरी शादी करता येणार नाही, तेव्हा हे सगळे महत्त्वाचे आहे. आता ये चुपचाप." असे म्हणत त्याने सकीनाला जोरात पलंगावर खेचले आणि जबरदस्तीने तिच्याशी संभोग केला.

त्यानंतर रोज हे असेच होत राहिले आणि दिवसेंदिवस त्या संबंधांची तीव्रता सुद्धा वाढत राहिली. अरबाज खूपच विकृत माणूस होता. शरीरसंबंधादरम्यान त्याला सकीनाला वेदना द्यायला फार आवडत असे. तिच्या शरीरावर सिगरेटचे चटके देणे, तिचे हात पाय बांधणे, कधी कधी हंटरने तिच्या उघड्या अंगावर वळ काढणे, तिच्या केसांना धरुन जोरात ओढणे असे प्रकार त्याला उत्तेजित करत होते.

सकीना मात्र त्याच्या या अत्याचाराला कंटाळली होती. तिला हे सगळे एकदाचे कधी संपते असे झाले होते.

"बस करा ना, तुम्ही मला किती त्रास देणार आहात? मला आता हे सहन होत नाही. मै आपसे गुजारीश करती हू, तुम्ही मला एकदाचा तलाक द्या आणि मला माझ्या नवऱ्यासोबत जाऊ द्या." सकीना रडत रडत म्हणाली, यावर अरबाज मोठ्याने हसला.

"कोणत्या नवऱ्यासोबत? इरफान सोबत? अगं त्यानेच तर तुला मला विकली आहे. तुझे मी त्याला पाच लाख दिले आहेत. हे सगळे 'निकाह हलाला' वगैरे नाटक होते. मला तू आधीपासूनच आवडायची. इरफान मला पाच लाख द्यायचा होता. काही दिवसापूर्वी जेव्हा मी इरफानला पैशांबद्दल विचारले, तेव्हा तो मला म्हणाला की, त्याने त्याच्या बायकोला तलाक दिला आहे. तो पाहिजे तर या पैशांच्या बदल्यात त्याच्या बायकोचा सौदा करु शकतो." अरबाज विचित्रपणे हसत म्हणाला.

" काय? सौदा?" सकीनाच्या डोळ्यात अश्रू भरले.

" हो, सौदा. आम्ही हे सगळे नाटक रचले आणि तू आमच्या जाळ्यात बरोबर फसली. तुझा आणि इरफानचा आता काहीही संबंध उरलेला नाही. आता तू फक्त माझी बीवी आहेस. तुझ्या शरीरावर फक्त माझा अधिकार आहे. मी मला पाहिजे तशी तुझे जिस्म उपभोगू शकतो." अरबाज आपल्या ओठांवर जीभ फिरवत हसला.

सकीनाला आपण जे काही ऐकतो यावर विश्वासच बसत नव्हता, पण हे सत्य होते.

तिच्या नशिबाने तिच्या जीवनाचा खूप मोठा खेळ केला होता. या खेळातून बाहेर येणे तिच्यासाठी तरी शक्य नव्हते.

तिला अनाथाश्रमात जाऊन आपल्या मुलीला भेटावेसे वाटत होते. दोन वेळा तिने पळण्याचाही प्रयत्न केला, पण दोन्ही वेळा ती अरबाजच्या तावडीत सापडली. जेव्हा जेव्हा ती पळण्याचा प्रयत्न करत असताना सापडत होती, तेव्हा तेव्हा अरबाज तिला अधिक शारीरिक यातना देत होता.


शेवटी एक दिवस अरबाज बाहेर गेलेला असताना तिला पळण्यात यश आले. तिने तिथून अनाथाश्रमात जायचे टाळले, कारण अरबाज किंवा इरफान तिथे सरळ पोहचू शकत होता.

' आता जायचे तरी कुठे?' हा प्रश्न तिच्या मनाला सतावत होता.

तेव्हाच तिला काहीतरी आठवले. जीवाच्या आकांताने ती वेड्यासारखी धावत सुटली. तिच्या पावलांना ती कुठे जात आहे हे माहीत होते आणि शेवटी तिचे पाय थांबले.

समोर एक तुळशी वृंदावन दिसत होते. ती धावत त्या वृंदावना समोर असलेल्या घराकडे गेली आणि तिने त्या खिडकीतून डोकावले.

" शुssक... शुsssक." तिने आवाज दिला.

मुकूंद तिथेच गीतापठन करत होता. त्याने आवाजाच्या दिशेने पाहिले.

"सकीना, तू इथे? आणि स्वतःचे काय हाल करून घेतले आहेस?" मुकूंदने खिडकीपाशी येत विचारले.

"मुकुंद, मला वाचव. ते मला शोधत आहेत. मला कुठेतरी लपव."

मुकूंद धावत बाहेर आला.

" सकीना, अगं पण झाले तरी काय?" सकीनाची परिस्थिती पाहून मुकूंदला काय बोलावे तेच कळत नव्हते.

"ते सगळे मी तुला नंतर सांगते. या क्षणी तू मला फक्त आसरा दे."

"माझ्या घरात येशील?"

"हो, मी कुठेही यायला तयार आहे. फक्त मला त्या नरकातून दूर जायचं आहे."

" माझे घर तुझ्यासाठी सदैव उघडेच होते, आताही आहे. चल आत ये." असे म्हणत मुकुंदने सकीनाचा हात आपल्या हातात घेतला.

पलीकडच्या मशिदीतून येणारे अजानचे बोल तिच्या कानावर पडत होते, कितीतरी वर्षांनी सकीनाला अल्लाह तिच्या मदतीला धावून आला आहे असे वाटत होते.

समाप्त
0

🎭 Series Post

View all