Login

सखी गं.. माझी होशील का? भाग -2

सायली आणि प्रतिक ची मैत्रीतील प्रेम गोष्ट...

विषय - सांग कधी कळणार तुला ?

मनिषा नरेंद्र परब.

कथा - सखी गं... माझी होशील का ..?


भाग -2 



प्रतिक, " हो तरं, खूप खूश ! " प्रतिक खूश होऊन बोलतो.


प्रतिकला सायलीची मैत्री खूप आवडत असते, आणि मैत्री पलीकडेही त्याला सायली एक प्रेयसी, आणि आयुष्यभरासाठी बायको म्हणून हवी असते. त्या दोघांनमध्ये तिसरं कोणीही आलेलं प्रतिक ला पटत नसतं.


प्रतिक घरी येतो, उद्याच्या भेटीची त्याला खूप उत्सुकता असते. प्रतिक हा आईसोबत एकटा राहत असतो. त्याला वडील नसतात. एकुलता एक मुलगा असतो आईचा.


आई, " प्रतिक बाळा आज खूप खूश दिसतं आहेस तु ?" प्रतिकला खूश पाहुन आई विचारते.


प्रतिक, " नाही गं आई, ते सायली ..!" आईला प्रतिक प्रत्येक गोष्ट न गोष्ट शेर करत असतो.


आई, " अच्छा, सायली बाई काही बोलली का ? "

आई खूश होऊन विचारते.


प्रतिक, " नाही गं आई, अजून तरी तिला मी काही बोललो नाही."


आई, " का बरं ? तिचा मुड ठीक होता ना ? " आई सायलीला बऱ्याचदा भेटली होती. आणि सायलीचा स्वभाव हा आईला चांगलाच माहित होता आणि प्रतिक च्या तोंडून ऐकलं ही होता.


प्रतिक, " नाही गं तसं काही नाही, मलाच वेळ नव्हता ऑफिसच्या कामात !"


आई प्रतिकला जेवायला वाढते, प्रतिक रात्रीचं जेवण उरकून बाल्कनीत उभा असतो. शांत आकाशात पाहत, त्या आकाशात त्याला चंदण्यांच्या मैफैलीत सायलीचा चेहरा दिसतं असतो.


तेवढ्यात त्याला सायलीचा कॉल येतो, " हेय,, झालं का जेवण ? "


प्रतिक, " हो झालं, बाल्कनीत उभा होतो. तुझाच विचार करत तेवढ्यात तुझा कॉल आला !"


सायली, " माझा विचार ? का रे ? "


प्रतिक, " काही नाही वेळ आली की सांगेन !" प्रतिक विषय बदलतो.


सायली आणि प्रतिकच्या बराच वेळ इकडं तिकडच्या गोष्टी होतात.


****सकाळ होते.*****


प्रतिक नेहमी प्रमाणे उठतो. फ्रेश होतो आणि बाहेर हॉलमध्ये नाश्ता करायला येतो, " आई गं उशीर होतोय लवकर कर जरा !" आज प्रतिक खूप घाईत असतो.


आई त्याला पाहतंच राहते, " अरे वाह ! आज नवीन शर्ट नवीन पॅन्ट क्या बात है !" आई त्याच्यासमोर नाश्ता ठेवत बोलते.


प्रतिक, " हा म्हणजे, आज विचारणार आहे मी तिला. तिच्या मनात काय असेल माहित नाही पण नकार देणार नाही असं मला वाटतं. " प्रतिकचा स्वतःवरचा विश्वास खूप जास्त असतो.


आई, " यशस्वी भवं ! " आई त्याला आशीर्वाद देत.


तो घरातून निघतो. सायली ची वाट पाहत तो तिच्या आधी बसस्टॉप वर पोहचतो.

काही वेळाने सायली येते, ती प्रतिक ला स्टॉपवर पाहून सरप्राईज होते, " हे काय ? आज चक्क माझ्या आधी ?"


प्रतिक, " हा म्हणजे तु नेहमी वाट पाहतेस, आज म्हटलं तुला सरप्राईज देऊयात..!"


सायली, " बरं चल, बस आली का ? " तिचं लक्ष प्रतिक कडे नसतं. प्रतिक ने घातलेले नवीन कपडे तिच्या लक्षातच येत नव्हते.


प्रतिक, " काय गं, काही टेन्शन मध्ये आहेस का ? "


सायली, " नाही रे, का असं विचारतोस ? टेन्शन आहे नि तुला सांगणार नाही असं काही नाही.!"


प्रतिक, " ओके " नाराजीच्या स्वरात " बरं आजच लक्षात आहे ना तुझ्या ? " प्रतिक तिला आठवण करून देत बोलतो.


सायली, " कशाबद्दल रे ? आज काही मीटिंग वगरे आहे का महत्वाची ? "


प्रतिकला तिच्यावर खुलं राग येतो पण तो खूप स्वतःवर ताबा ठेवत, " अगं आपल्याला आज लंच ला जायचं आहे बाहेर माहित आहे ना ? की विसरलीस ? "


सायली, " अरे ते होय, आहे की लक्षात. विसरली नाही मी. "


प्रतिक, " नाही लंच म्हटलं की खूश व्हायचं सोडून तु काहीच रिऍक्ट केलंस नाही म्हणून म्हटलं ? "


सायली, " नाही नाही, त्यात काय खुश व्हायचं ? बरं ती बघ बस आली.!"

ते दोघ ही बसमध्ये बसतात. आणि ऑफिसमध्ये पोहचतात.


ऑफिस पोहचताच प्रतिक आणि सायली सरप्राईज होतात.

ऑफिस स्टाफ, " वेलकम सायली, अभिनंदन सायली मॅम." सायली ते सर्व पाहून खूप खूश होते.


सायली, " थँक्स टु ऑल, पण हे सर्व कशासाठी ? बॉस हे सरप्राईज ? मी समजली नाही. "


बॉस पुढे येतात सायली ला हात मिळवतात, " काल तु सर्वात मोठी जी डिल क्रॅक केलीस त्याबद्दल आहे हे सर्व !" बॉस तिचे कौतुक करतात.


प्रतिक हे सर्व पाहून नर्वस होतो, सायली त्याला सोडून स्टाफच्या घोळक्यात जाते, " थँक यू सो मच ! पण हे बॉसमुळे ही शक्य झालं. नाही तरं इतकी मोठी डिल मी एकटीने क्रॅक नसती करू शकली !"


बॉस, " अरे प्रतिक, तिथे लांब का उभा आहेस ? सायली मॅम ला अभिनंदन नाही करणार का तु ? " सायली जरी प्रतिकची खास मैत्रीण असली तरी ती ऑफिसमध्ये प्रतिक ची मॅडम होती.


प्रतिक, " हो बॉस ! "


प्रतिक सायली जवळ जातो आणि तिला हात मिळवत, " अभिनंदन मॅम ! " आणि तो स्वतःच्या डेस्कवर जातो आणि कामाला लागतो. सायली त्याच्याकडे पाहतच राहते.


सायली ला बॉस कॅबिनमध्ये बोलावतो, " येस बॉस ? " सायली आत जाते.


बॉस, " सायली, पाहिलं म्हणजे अभिनंदन ह्या डिलसाठी ! आणि दुसरं म्हणजे तुझी इन्क्रिमेंट केली आहे मी !"


सायली बॉसचं बोलणं ऐकून खूश होते, " थँक्स बॉस ! मी खूप खूश आहे. "


बॉस, " बरं मिस्टर शाह चे काही अपडेट आले आहेत का ? पुढच्या प्रोसेस साठी."


सायली, " नाही मी जाऊन चेक करते, आणि तुम्हाला कळवते. "


आणि ती कॅबिनमधून निघते. ती प्रतिक जवळ जाते," हेय कॉफी मागवू का तुझ्यासाठी ? "


प्रतिक, "चक्क कॉफी का बरं ?"


सायली, " यार मला हवी होती, म्हटलं तुला ही मागवते."

असं बोलून ती कॉफी च्या दोन ऑर्डर देते. काही वेळात कॉफी येते. प्रतिक आणि ती मिळून कॉफी घेतात.

" बरं मी कामं आटपते, मग आपण लंचसाठी बाहेर जाऊ आणि तिथूनच घरी जाऊ. काय बोलतोस ? "


प्रतिकचा लंच चा मुडचं गेलेला असतो, पण आता हिला अचानक नाही म्हणणं ?, " हो चालेल !"


सायली, " ओके " ती डेस्कवर जाते. कामाचे अपडेट ती बॉस ला देते. आणि पुन्हा येऊन ती जाग्यावर बसते.


प्रतिक च्या डोक्यात येत की आपण हिला फुलांचा गुलदस्ता दिला तरं ? मनातलं गुपित ही हिला सांगता येईल आणि कामाबद्दल अभिनंदन ही बोलता येईल. म्हणून तो गुलदस्ता मागवायचा ठरवतो.


काही वेळातच ऑफिसच्या वॉटचमन येऊन तिच्या पुढ्यात एक गुलदस्ता ठेवतो, सायली ते पाहून, " हे काय कोणी दिला आहे हा ? " ती वॉटचमन ला विचारते.


वॉटचमन, " नाही माहित मॅडम, कुरिअर ने आलेलं. त्यात तुमचं नाव लिहलं होतं.!"


सायली, " बरं बरं.."



.... क्रमश...

0

🎭 Series Post

View all