विषय - सांग कधी कळणार तुला ?
मनिषा नरेंद्र परब.
कथा - सखी गं... माझी होशील का ..?
भाग -3
प्रतिक तिथून पाहतो, " हे काय ? हा गुलदस्ता कोणी दिला ? " तो स्वतःशीच बोलतो. आणि सायली ला खूणवतो.
सायली त्याला खूणवत, " माहित नाही रे, मी सुद्धा तेच पाहतेय..!"
सायली त्या गुलदस्त्यावर असलेलं कार्ड पाहते त्यात लिहलेलं असतं, " अभिनंदन सायली तु डिल क्रॅक केलेल्याच तुझ्या घरून कळालं. म्हणून हा गुलदस्ता. शुभचिंतक आरव." हा कोण ? ती स्वतःशीच बोलते.
प्रतिक ची नजर तिच्यावर असते, तो पुन्हा खूणवतो, " काय झालं ? मी येऊ का? "
सायली त्याला खूणवत, " नाही नको ? " ती प्रतिक ला सध्या काहीच सांगत नाही. प्रतिक ला ही कळतं की सायली काही तरी लपवत आहे..
सायली फोन घेऊन ऑफिस बाहेर जाते आणि आईला फोन लावते, " अगं आई माझ्या कामाबद्दल तु अजून कोणाला सांगितलं आहेस ? "
सायलीची आई, " अगं बाळा कोलते काकूंच्या मुलाला सांगितलं आहे ! त्यांचं स्थळ आलय तुझ्यासाठी !"
आई आनंदाने तिला सांगते.
आईच बोलणं ऐकून सायली वैतागते, " तु मला न विचारता कशाला सांगितलंस ? आणि आता स्थळ वगरे इतक्यात कशाला ? "
आई, " अगं आत्ताच तरं वय आहे लग्नाचं, उद्या म्हातारी झाल्यावर करणार आहेस का ? आणि चांगल स्थळ आहे, मुलगा ही शिकलेला आहे. अजून काय हवं ? "
सायली आईला समजावत, " अगं पण आई !"
आई, " तुझ्या मनात कोणी आहे का ? नाही ना मग ? पण बिन काही नाही घरी आलीस की बोलू..!" आणि आई कॉल कट करते.
प्रतिक, " इतका वेळ झाला, गेली कुठे ही ?"
सायली स्वतःशीच बोलत , " आई ऐकून ऐकणार नाही, जाऊदे बघू काय ते. " सायली आत ऑफिस मध्ये येते.
प्रतिक तिला मॅसेज करतो, " काही प्रॉब्लेम? इतकी वैतागली का आहेस ? "
सायली त्याला रिप्लाय देत, " नाही काही नाही, आईचा कॉल होता..!"
प्रतिक मॅसेज पाहून रिप्लाय देत नाही, त्याला वाटतं की सायली काही तरी लपवत आहे.
सायलीचा पुन्हा मॅसेज येतो, " ऑफिस सुटायची वेळ झाली आहे, लंच ला जायचं आहे ना ? "
प्रतिक मॅसेज पाहतो, " अरे वाह ! लक्षात आहे म्हणजे." तो स्वतःशीच बोलतो मॅसेज पाहून खूश होतो.
प्रतिक आणि सायली ऑफिसमधून निघतात. प्रतिक छान असं हॉटेल पाहतो. आणि दोघेही हॉटेल मध्ये आत जातात, तो तिला चेर वर बसायला सांगतो, " आवडलं का हॉटेल ? " प्रतिक बोलतो.
सायलीचा मुड खूप खराब असतो, पण प्रतिक साठी ती सार काही विसरून हो ला हो करते.
प्रतिक, " काय खाणार आहेस ?"
सायली, "मागव काहीही..!"
प्रतिक, " असं कसं, तु सांग ? तुला जे आवडेल ते मागवू..!"
सायली, " अरे वाह ! इतकं का बरं ? आणि आज काय स्पेशल? "
प्रतिक, " स्पेशल? हो आहे ना!"
सायली खूश होऊन, " अरे वाह ! लग्न वगरे जमलं की काय तुझं ? "
प्रतिक हसतो, " लग्न जमलं तरं तु खूश होशील ? "
सायली प्रतिक चा प्रश्न ऐकून गोंधळते, "असं का विचारलंस ?"
प्रतिक, " काही नाही. " तो वेटर ला आवाज देतो आणि सायलीच्या आवडीचं मागवायला लागतो.
सायलीच अचानक लक्ष जातं, " हे काय ? आज नवीन शर्ट का बरं ? म्हणजे नक्कीच काही तरी स्पेशल आहे ?"
प्रतिक, " नशीब माझं ! आता तरी तुझं लक्ष गेलं. मला वाटलं तुझ्या हेही लक्षात नाही."
सायली, "अरे असं का बोलतोयस ? ते ऑफिस च्या कामाच इतकं लोड असतो की कुठेच लक्ष द्यायला जमत नाही ."
प्रतिक, " सायली तुला एक विचारू का ? " बराच वेळ गेल्यानंतर प्रतिक तिला विचारायला जातो.
सायली, " हा बोल की !"
प्रतिक, " तुला लग्नानंतर घर कसं हवं गं ?"
सायली, " अरे बापरे ! तुला माझी आई येऊन भेटली का? " आणि ती हसायला लागते.
प्रतिक, " नाही, का गं ? मी तुला फक्त प्रश्न केला."
सायली, " अरे वेड्या मी मस्करी करतेय..! बघ मला घर व्यवस्थित ऐसपैस हवं. "
प्रतिक, " हे काय उत्तरं झालं ? कळेल अशा शब्दांत सांग ना ? " प्रतिक सायलीच उत्तरं ऐकून गोंधळतो.
सायली, " बरोबर आहे, माझं उत्तरं हे असंच असणार. जसं तुझा प्रश्न होता."
प्रतिक, " सांग की? " प्रतिक पुन्हा तिला विचारतो.
सायली, "जसं प्रत्येक मुलीला हवं असतं तसं..!"
प्रतिक, " आणि आयुष्यभराचा जोडीदार ? तो कसा हवा ? "
सायली, " तु असं विचारतोस जसं काय तूच लग्न करणार आहेस..!" आणि ती हसायला लागते.
प्रतिक, " तुला चालेल तरं मी करायला तयार आहे, काय बोलतेस ? " पण तिचं प्रतिक च्या बोलण्याकडे लक्ष नसतं. ती मोबाईल मध्ये आलेला मॅसेज पाहते.
सायली, " ऐक ना ! मी बॉस ला कॉल करून आले, तु थांब..!" असं बोलून ती फोन घेऊन बाहेर जाते.
काही वेळाने ती आत येते, " हा मग काय बोलत होतास ? सॉरी ते बॉस चा मॅसेज होता. उद्या मिस्टर शाह येणार आहेत !" पण प्रतिक तिचं काही ऐकत नाही. निमूटपणे जेवत असतो खाली मान घालून.
सायली पुन्हा त्याला विचारते, " अरे काय झालं ? तुला मी काही तरी म्हटलं."
प्रतिक, " तु काही म्हटलं का ? अगं खूप भूक लागली ना ! चल आवर लवकर, उशीर होतोय. "
सायली त्याच्या वागण्याकडे पाहतंच राहते," बरं बरं" सायली आणि प्रतिक आवरून हॉटेल मधून निघतात..
... क्रमश...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा