Login

सक्तीची भाषा भाग २(अंतिम भाग)

सक्तीची भाषा भाग २(अंतिम भाग)
मला समजेना आई असं म्हणत आहे. माझ्या सासू बाई गावाला राहिल्या आहेत. त्यांना हिंदी बोलता येत. ते पण काम चालवू. कामवाल्या मावशींना हिंदी शिवाय अजून काहीही समजतं नाही. सध्या तरी त्या दोघींच्या मधील बोलण्याचा दुवा म्हणजे नव्या.

नव्याला देखील हिंदी बोलता येत ते पण जुजबी. यू ट्यूब व्हिडिओ आणि कार्टून चॅनेल बघून जमेल इतकं. शाळेत हिंदी विषय आहे शिकायला म्हणून थोडी फार ओळख झाली आहे या भाषेची.

मला हे सगळं प्रकरण समजतं नव्हत. कामवाली बाई उदया पासून येणारं नाही म्हणतात म्हणजे ? नुसत्या विचाराने गरगरल ! अस काय झालं की मावशी उदया पासुन येणारं नाही म्हणतात ? हे सगळं काय चालु आहे ते समजत नव्हत.विचार करण्याची शक्ती संपली होती.

आधीच सकाळी मॅनेजर ने डोकं उठवल होत.त्यात ही भर.दिवस भर काय फक्त मराठी इंग्लिश आणि हिंदी भाषांतर करत बसायचं का !

आता समोरचं प्रकरणं समजुन घेऊ म्हणून मी आशेने नव्या कडे बघितलं. तर ती म्हणाली

" आई मीच सांगितलं की आटा ढीला आहे." नव्या शांत आवाजात म्हणाली.

आता तर माझं डोकं दुखायला लागलं. शेवटचा प्रयत्न म्हणून कामवाल्या मावशींना विचारलं,

" क्या हुआ, शुरू से बताओ "

" आईए मॅडम, आपही इधर आईए."
असं म्हणत तिने मला किचन मध्ये नेलं.

किचन मध्ये गेलं तर परातीत कणीक मळून ठेवली होती. आज घरी सांजोरी करायची होती. तर त्यासाठी कणकेचा गोळा थोडा सैलसर भिजवावा लागतो. पण मावशींनी तो जास्त सैल भिजवला होता. तो कणकेचा गोळा बघून सासू बाई मावशींना म्हणाल्या,

" अग कणीक सैल आहे."

" क्या कहे रही हो माजी ?"

" कणीक सैल आहे."

सासूबाईंनी कणकेच्या गोळ्यावर बोट दाबून समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना तिला सांगता येईना. तिला त्या काय सांगत आहेत ते समजेना . मग त्यांच्या मदतीला नव्या आली.

" आई आऊ नी सांगितलं कणीक सैल आहे अस मावशींना हिंदीत सांग."

" मग तू काय सांगितलं ? "

" तुम्हारा आटा ढीला है " नव्या निरागस पणे म्हणली. मला समजेना काय करावं. मी कस बस हसू आवरलं. कारण नव्याच्या चेहऱ्यावर निरागस भाव आणि कामवाल्या मावशींच्या चेहऱ्यावरचे रागीट भाव !

" तु अस का सांगितलं ?"

हसू आवरत आणि परिस्थितीच भान राखत प्राची ने नव्याला विचारलं.

" आई काल तु सांगितलं ना, हिंदी वर्डला मराठी वर्ड लक्षात ठेवायचा. मग सेंटेन्स बनवयचा. मी तसचं केलं,"

" म्हणजे ?"

" तुम्हारा म्हणजे तुमची, आटा म्हणजे कणीक सैल म्हणजे ढीला , हे वर्ड लक्षात घेऊन मी सेंटेन्स तयार केला, तुम्हारा आटा ढीला हैं, यात माझं काय चुकलं ? मी ऑल ग्रामर रूल्स फॉलो केले. मग मिस्टेक कूठे झाली ?" नव्या ने स्पष्टीकरण दिलं.

आता मात्र प्राचीला हसणं कंट्रोल झालं नाही. ती खो खो हसत सुटली. इतकी की डोळ्यातून पाणी येऊ लागले. तिला हसताना बघून त्या तिघी तिच्या कडे बघत होत्या. पण प्रत्येकीची कारण वेगवेगळी होती.

थोड्यावेळाने ती सावरली. तिने मावशींना कणीक थोडी कडक भिजवायला सांगितली. मग स्वतः संजोऱ्या केल्या. मावशी त्यांचं काम करून निघून गेल्या. तिने त्यांना कसं बसं समजावलं होतं. रात्री जेवताना सासू बाई आणि नव्या तिच्या कडे रागाने बघत होत्या. नवऱ्याला देखील वातावरणातील ताण समजला. पण नंतर बोलू म्हणून तो पण गुपचूप जेवत होता.

" प्राची काय ग काय झालं आज आई आणि नव्या का चिडल्या आहेत ?"

" अमोल, अस म्हणत तिने मागचा किस्सा सांगितला.

आता तो ही तिच्या सारखाच पोट धरून हासत होता. की नव्या तिच्या हातातला टेडी सांभाळत आली.

" बाबा आई बघ मला आणि आऊला हासत आहे. मी काय चुकीचं ट्रान्सलेट केलं का, तुम्हारा आटा ढीला है" नव्या अमोलला विचारत होती. त्याने बिचाऱ्याने तिच्या प्रश्नाचं उत्तर देण्यापेक्षा तिचं लक्ष मोबाईल मधे वेधून घेतल. थोडक्यात स्वतःची सुटका करून घेतली.

ते दोघं नवरा बायको याचं विचारात होते की बोली भाषा आणि प्राकृत भाषा या मध्ये फरक असतो.
मुलांना भाषा शिकण्याची सक्ती करणं कितपत योग्य आहे ?

समाप्त

© ® वेदा

कथा आवडल्यास कॉमेंट मध्ये सांगा.

या कथेचा वापर यू ट्यूब किंवा इतर कुठेही आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.