नावडतीचे मीठ अळणी भाग -1

कौटुंबिक कथा
" राधा माझा टिफिन पॅक कर लवकर, उशीर होतोय ऑफिसला जायला . " विशाल राधा म्हणजे त्याच्या बायकोला बोलतं होता.

" हो हो.. झालं, किती घाई रे तुला..? " राधा त्याच्या हातात टिफिन देत.

" वाह,, सुगंध फार छान येतो आहे.. बरं काय दिलं आहेस आज टिफिनला ..? " विशाल हळूच राधाला विचारतो.

" भरली वांगी आणि तांदळाची भाकरी... " राधा बोलते. हे ऐकताच विशाल च्या तोंडाला पाणी सुटत..

" काय.. खरचं, वाह आज टिफिन खायला मजा येणार आहे.. " विशाल प्रेमाने बोलतो..

त्या दोघांचं चालेल संभाषण पाहुन राधा ची सासु म्हणजे विशाल ची आई जरा कुस्क्यानेच बोलते.
" वाह छान,, आता नाही का होतं उशीर विशाल तुला..? "

" अगं आई ते, टिफिनला इतकं छान जेवण दिलंय म्हणुन जरा तिची तारीफ करत होतो.. " विशाल मस्करीतचं उत्तर देतो.

" अरे... शु... काय.. " ती विशाल ला हळूच खुणावते..

" असूदे गं.. चल बाय.. निघतो मि.. " विशाल तिच्या हातावर हात ठेवत..

विशाल ची आई विशाल चं लग्न झाल्या पासुन राधाशी जरा तुटकतेनेच वागत असते.

विशाल ने प्रेमविवाह केला होता, तेही त्याच्या आईच्या मना विरुद्ध जाऊन..

त्याच्या आईला शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहणारे माने च्या मुलीशी विशाल चं लग्न लावुन द्यायचं होतं..

पण विशाल ने राधाला लग्न करुन आणली आणि त्याच्या आईने काढता पाय घेतला.

तशी राधा अतिशय हुशार आणि पंधरावी झालेली होती, लग्न होऊन तिला एक मुलगा ही होता. पण त्याचा काय उपयोग नातु होऊन सुद्धा विशाल ची आई परक्याने वागत होती.

विशाल च्या आईने काढता पाय घेतल्यामुळे घराची पुर्ण जबाबदारी राधावर येऊन पडली होती.

पण राधा ही तितक्याच आपुलकीने घर सांभाळुन होती.

आणि हे विशाल ला चांगलंच माहित होतं, पण आई कधी तरी राधाशी नीट वागेल ह्या आशेवर विशाल होता.

राधाने काहीही चांगल केलं तरी, त्याच्या आईला ते खुपत होतं.

सकाळचे नऊ वाजलेले असतात, राधा नाश्ता आणि चहा घेऊन विशाल च्या आईच्या पुढ्यात ठेवते..

" आई गोळ्यांची वेळ झाली आहे, छान पोहे केले आहेत खाऊन घ्या म्हणजे गोळ्या घेता येतील. " राधा बोलते.

पुढ्यात आलेल्या नाश्त्याची डिश त्याची आई बाजूला करते, " आता ह्या वेळेला मि पोहे खाऊ, गॅस नाही का भरणार मला.. " त्याची आई कठोर शब्दांत राधाला बोलते.

" बरं मग, चपाती देऊ का करुन..? त्याने नाही होणार गॅस.. " राधा बोलते.

" बघ बाई द्यायची असेल तर दे, रोज रोज सांगत बसायला मला नाही आवडतं.. " राधाची सासु बोलते.

राधा पुढ्यातला नाश्ता उचलते, किचन मध्ये जाऊन भराभर चपातीच पीठ मळते. आणि काही वेळातच चपाती करुन, त्यांच्या पुढ्यात ठेवते.

" आई अहो छान तूप लावलंय, खाऊन घ्या.. " राधा बोलते.

नाक मुरडत विशाल ची आई चपाती आणि चहा खाते.

दुपार होते, राधा सारं काही आवरून बेडरूममध्ये पडलेली असते, तेवढ्यात तिला विशाल च्या आईचं फोन वरील बोलणं ऐकू येतं..

ती बाहेर हळूच डोकावते...

" काय सांगणार गं बाई तुला, इतकी वर्ष झाली लग्नाला हिच्या. पण सासुला नाष्टाला काय लागत काय नाही हे सुद्धा तिला माहित नाही. " सासु म्हणजे विशाल ची आई बहुदा तिच्या लेकीला म्हणजेचं विना ताईला सांगत असाव्या.

हे ऐकताच राधाला फार वाईट वाटतं, नवऱ्याची पण ती जितकी काळजी घेत नव्हती तितकी काळजी ती सासु ची घेत होती..

बराच वेळ सासु चं फोन वरील संभाषण ऐकुन ती बाहेर येते.

" काय झालं आई, माझं काही चुकलं का..? आणि तसं ही तुम्हाला सकाळची चपाती लागते म्हणुन मि ती न चुकता करुन देते, तेही चांगल तुप लावुन.. " राधा मुद्दाम मोठ्याने बोलते.

म्हणजे जो कोणी सामोर फोन वर असेल त्याला ऐकू जावं..

" बरं बरं विना मि ठेवते.. " सासु पटकन फोन खाली ठेवते..

" चोरून ऐकत होतीस का..? " राधाची सासु बोलते.


क्रमश...

🎭 Series Post

View all