Login

समाजाचा दीपस्तंभ

समाजाचा दीपस्तंभ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त कविता
शीर्षक -समाजाचा दीपस्तंभ

समाजाचा दीपस्तंभ बनून तुम्ही
समाजाला दिशा दाखवत गेले
बाबासाहेब म्हणूनच या जगात
तुम्हाला अलौकिकत्व प्राप्त झाले...

१४ आॅक्टोबर १९५६ ला तुम्ही
अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला
पददलित समाजाला 'भीमशक्ती' प्रदान करून
हा आदित्य अस्तंगत झाला...

जन्म १४ एप्रिल १८९१
६ डिसेंबर १९५६ महापरिनिर्वाण
अनेक शैक्षणिक पदव्या मिळवून
परदेशात बॅरिस्टर होण्याचा मिळवला मान...

शिकवा, चेतवा व संघटित करा
बहिष्कृत हितकारणी सभेचे ब्रीदवाक्य ठरले
बुरसटलेल्या रुढींचे पाश तोडून
तुम्ही "मूक समाजाचे नायक" झाले.

सौ. रेखा देशमुख
अमरावती