#जलद लेखन स्पर्धा:- ऑक्टोबर-२०२५
विषय :- थोरलेपणा
शीर्षक :- समजूतदार
भाग :- ३ (अंतिम)
दिवसेंदिवस कांचन अजूनच रेखा आणि हरी विषयी अनिलच्या मनात विष कालवू लागली. तिचा मनमानी कारभार चालू होता.
रेखा कितीही आजारी पडली तरी ती उठून काम करायची. कांचनला तिची थोडीही दया किंवा माया येत नव्हती.
एके दिवशी रेखाची तब्येत जास्तच बिघडल्याने ती काहीच न करता झोपली होती. हरीने तिला आधीच दवाखान्यात नेऊन आणले होते, पण ती अजूनही खूप अशक्त होती. म्हणून तो तिला आराम करायला सांगून कामाला निघून गेला.
भूक लागल्याने कांचन किचनमध्ये आली, तर स्वयंपाक झालेला नव्हता. कामाचा ढिगारा पाहून ती चिडली. पाय आपटत ती रेखाच्या रूममध्ये गेली.
रेखाला झोपलेलं पाहून तिचा पारा आणखीनच चढला.
“काय हे, ताई? अजून झोपला आहात! मला भूक लागली आहे. स्वयंपाक अजून केला नाही. आणि बाकी सगळी कामं तशीच पडली आहेत!” ती चिडत म्हणाली.
ती का झोपली, तिला काय झालंय, हे विचारायचं तिला सुचलं नाही.
रेखाच्या डोळ्यांत पाणी आलं. ती हळू आवाजात म्हणाली, “अगं, कांचन.. मला बरं वाटतं नाही गं. म्हणून थोडा वेळ झोपले. आज तू करशील सगळं.”
“नाही हं, मी सगळं काम करणार नाही. मला अभ्यास आहे. तुम्हाला बरं वाटलं की करा तुम्हीच. मी आता पुरती खिचडी बनवते, तुम्हीही खा.” एवढं बोलून ती निघून गेली.
रेखाला खूप वाईट वाटलं. नंतरही कांचनने तिची विचारपूस केली नाही.
उलट अनिलला फोनवर सांगितलं,“रेखाताई आजारी असल्याचं सोंग करतायत. स्वयंपाक नाही केला, सगळं मलाच करावं लागलं!”
उलट अनिलला फोनवर सांगितलं,“रेखाताई आजारी असल्याचं सोंग करतायत. स्वयंपाक नाही केला, सगळं मलाच करावं लागलं!”
त्या वेळी अनिलनेही रेखाला फोन करून खूप सुनावलं. पण ती नेहमीप्रमाणे शांत राहिली.
कांचनला मात्र तिचं शांत राहणं वेगळंच वाटायचं. तिचा दिवस मोबाईलवरील रिल्स बघणे, आईशी गप्पा मारणे आणि तेलकट पदार्थ खाण्यामध्ये जात असे.
अनिल कामानिमित्त बाहेर असे, त्यामुळे कामाला हात लावायचा नाही हे तिने ठरवलं होतं. तरीही रेखा कधी काही बोलली नाही.
एकदा कांचनची तब्येत खूपच बिघडली. अतिप्रमाणात मसालेदार अन्न खाल्ल्याने तिच्या पोटात दुखू लागलं, उलट्या सुरू झाल्या. ती पोटात पाय घेऊन पडली होती. चेहरा सुकून गेला होता.
सकाळपासून ती बाहेर आली नाही म्हणून रेखा काळजीने तिच्या रूममध्ये गेली. तिला तसे पाहून ती घाबरली.
तिच्या कपाळावर हात ठेवत म्हणाली, “कांचन! अगं काय झालं गं तुला?”
ती तिला दवाखान्यात घेऊन गेली, औषधं आणली, आणि तिची मनापासून देखभाल केली. रात्रभर तिच्या जवळ बसून ती तिला पाणी, औषध, प्रेमाने देत राहिली.
कांचनला रेखाचा समजूतदारपणा आणि शांतपणा आता मनापासून जाणवू लागला.
ती किती वाईट वागली, किती चुकीचा गैरसमज करून घेतला — याची तिला खोल जाणीव झाली.
अपराधीपणाने तिचे डोळे ओले झाले. ती रडतच रेखाच्या पायांशी झुकली.
“ताई, मला माफ करा. मी तुमच्याशी खूप चुकीचे वागले. आईकडून, मैत्रिणींकडून थोरल्या जावांबद्दल जे ऐकलं, तेच खरं मानलं. म्हणून तुमच्याबद्दल गैरसमज झाला. पण तुम्ही मात्र इतकं सगळं झालं तरी आमच्यावर प्रेमच केलंत. खरंच, तुम्ही खूप मोठ्या मनाच्या आहात,” ती ओक्साबोक्शी रडत म्हणाली.
रेखाने तिला हलकेच खांद्याला धरून उठवले आणि गळ्यात घेत मायेने म्हणाली,
“अगं बाळा, चुका सगळ्यांकडून होतात. पण ती मान्य करणं, हीच मोठी गोष्ट असते. तू ती केलीस, एवढंच पुरेसं आहे. आम्ही तुमच्यावर रागवणार नाही. तुम्ही आमचीच मुलं आहात. झाले गेले गंगेत गेलं.”
“अगं बाळा, चुका सगळ्यांकडून होतात. पण ती मान्य करणं, हीच मोठी गोष्ट असते. तू ती केलीस, एवढंच पुरेसं आहे. आम्ही तुमच्यावर रागवणार नाही. तुम्ही आमचीच मुलं आहात. झाले गेले गंगेत गेलं.”
अनिलही अपराधी चेहऱ्याने त्यांच्या समोर आला. त्याने हात जोडले, डोळ्यांतून अश्रू ओघळले.
“दादा, वहिनी, खरंच माफ करा. तुमच्यासारखे समजूतदार आणि मोठ्या मनाचे लोक आमच्या आयुष्यात आहेत, हीच आमची भाग्याची गोष्ट आहे,” तो त्यांना बिलगून म्हणाला.
हरीने पुढे जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला, आणि म्हणाला,“आता झाले गेले विसरूया. नवे दिवस सुखाचे जगूया.”
सगळे एकमेकांना बिलगले. घरभर पुन्हा आनंद, माया आणि आपुलकीचं वातावरण पसरलं. जिथं राग, गैरसमज आणि कटुता होती, तिथं आता समजूतदारपणाचा सुगंध दरवळू लागला.
समाप्त –
समजूतदारपणा आणि शांत राहणं ही नाती टिकवण्याची खरी ताकद आहे.
थोरलेपण म्हणजे रागावणं नव्हे, तर समजून घेऊन क्षमा करणं. यातूनच घराचं पुन्हा नंदनवन होतं.
थोरलेपण म्हणजे रागावणं नव्हे, तर समजून घेऊन क्षमा करणं. यातूनच घराचं पुन्हा नंदनवन होतं.
जयश्री शिंदे
प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा