आदित्य आणि स्वप्नालीचा पहिला सण आला, दिवाळी. काकू फराळाची तयारी करत प्रत्येक पदार्थाची सुनेला चव देत होत्या. कसा झालाय विचारत होत्या आणि नकळत तो पदार्थ कसा करायचा हेही समजावून सांगत होत्या.
"सासुबाईंच्या हाताला माझ्या आईपेक्षा छान चव आहे." स्वप्नाली आदित्यला म्हणाली. तिने आपल्या आवडीने वेगवेगळ्या आकाराच्या पणत्या, आकाशकंदील आणला. सणवार म्हंटल की पाहुणे आले. त्यात पहिला सण म्हणून स्वप्नालीच्या माहेरी जोरदार तयारी सुरू होती.

"आई, इतकं सगळं कशाला?" तयारी बघून स्वप्नाली आपल्या आईला म्हणाली.
"ते तुला कळायचं नाही. तू सासरी लवकर रुळलीस. आमच्यासाठी याहून वेगळा आनंद काय असू शकतो? तुझ्या सासुबाई, नवरा ही चांगली माणसं आहेत. त्यांचा योग्य तो मानपान व्हायला हवा ना!" आई म्हणाली. "निदान आज तरी साडी नेस ग. सासुबाई काय म्हणतील?" आई ओरडली.
नाईलाजाने का होईना स्वप्नाली साडी नेसून छान तयार झाली. नवी साडी, कपाळावर चंद्रकोर, गळ्यात मोठं मंगळसूत्र, हातभर बांगड्या, पायात जोडवं..आरशात आपलं रूप बघून ती मस्तपैकी हसली. 'याही कपड्यात कित्ती गोड दिसतो आपण!' तिला आश्चर्य वाटलं.
नुकतेच आलेले मीरा काकू आणि आदित्य तिच्याकडे बघतच राहिले. काकूंनी तर सुनेची दृष्टच काढली. " काय हो, आमची लेक तुम्हाला त्रास तर देत नाही ना?" आई कौतुकाने सासू - सुनेच्या जोडीकडे पाहत म्हणाली.
"अजिबात नाही. आजवर तिने मला कधी त्रास दिला नाही की मी कधी तिच्यावर अपेक्षा लादल्या नाहीत." काकू.
"घरचं सगळं करते ना ती? म्हणजे सगळं येतं तिला. पण करायचा कंटाळा करते." आई.
"आई..काय हे? आत्ता हा विषय कशाला? आमचा पहिला सण आहे. छान एन्जॉय करूया." आदित्य मधेच म्हणाला.
तशी आई पानं वाढायला उठली. मीरा काकू मदत करायला पुढं झाल्या. स्वप्नाली मात्र टंगळ - मंगळ करत तशीच बसून राहिली.
"स्वप्ना, अग तुझ्या सासुबाई मदत करताहेत. तू ये ना. बरं दिसतं का ते? बरीच कामं पडलीत. घासायची भांडी एकत्र करायची आहेत. कट्टा स्वच्छ करायचा आहे, टेबल पुसून घ्यायचं आहे. तांबे भरून, पाण्याचे पेले घे. पानं वाढ."
आई आतून ओरडली.

"असू द्या हो. दोघं बोलत बसले असतील आणि हेच दिवस असतात. त्यांना एन्जॉय करू दे. आपल्याला कुठं अशी प्राईव्हासी मिळायची? सून म्हणून घरात पाऊल टाकलं की कामं सुरू केली आपण. आताही तेच करायचं, शेवटी बाईचा जन्म!" मीरा काकू शेवटचं वाक्य नकळत बोलून गेल्या.
स्वप्नालीने काकूंचं बोलणं ऐकलं होतं. काकू स्वतःचं घर असल्यासारख्या वावरत होत्या. कामं करत होत्या. हे ती बघत होती.
'आपल्या माहेरी आपण काम न करता सासुबाई अगदी सराईतपणे काम करत आहेत हे बघून तिला कसंतरीच वाटलं. सासरीही आई अशीच कामं करत असतात आणि आपण काय करतो? कामाच्या नावाखाली सकाळी उठून निघून जातो ते थेट संध्याकाळी उगवतो. इथं कित्ती कामं पडलीत! अशी सगळी कामं रोज आई करतात. सगळं करून तक्रार म्हणून करत नाहीत की माझ्याकडून कसली अपेक्षा करत नाहीत. उलट आवड - निवड लक्षात घेऊन केलेला ताजा डब्बा आपल्या हातात मिळतो.
वर प्रेम, माया, जिव्हाळा, आपुलकी, विश्वास हे आईंच्या स्वभावातच आहे. मग सून म्हणून माझं काय कर्तव्य नाहीय का? आजवर मी फक्त स्वतःचा विचार केला. आपल्या माणसांचा विचार कधीच केला नाही.

तिने आदित्यकडे एक नजर टाकली. तो तिच्याकडेच बघत होता. 'छान दिसतेस!' त्याने खूण केली. ती हसून आत आली. सासुबाईंनी सगळी ताटं वाढून तयार केली होती.
"तुम्ही दोघं जेवायला बसा. आम्ही दोघी नंतर बसू." स्वप्नाली आत आलेली पाहतच काकू म्हणाल्या.
"असं कसं? आज तुमचा मान महत्त्वाचा. तुम्हीही बसा. मी वाढते." आई पुढं होत म्हणाली.
"आई, आधी तुम्ही दोघी बसा. मी वाढते." स्वप्नाली पदर खोचत म्हणाली.
"आज तुमचा मान आहे ग." स्वप्नालीने मीरा काकूंचं ऐकलं नाही. बळेच तिने दोघींना जेवायला बसवलं.
"आज तुमचा मान आहे ग." स्वप्नालीने मीरा काकूंचं ऐकलं नाही. बळेच तिने दोघींना जेवायला बसवलं.
"आई, खरं सांगायचं तर मी घरात काही काम करत नाही. सगळं काकू बघतात. मी सासरी गेलेय असं वाटतच नाही मला. आदित्यला जशी वागणूक मिळते तशीच मलाही मिळते. पण आत्ता मला कळतंय, सून म्हणून माझंही काही कर्तव्य आहे. कर्तव्य म्हणण्यापेक्षा ते घर माझं आहे अन् ही माणसं माझी आहेत. मग मी त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं ना!" हे ऐकून स्वप्नालीच्या आईने डोळे मोठे केले. "वहिनी, काय सांगते ही?"
"अहो, हे तिचं तिला कळणं गरजेचं होतं. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी सांभाळून घेईन." मीरा काकू.
"हा तुमचा मोठेपणा झाला. पण स्त्री म्हंटलं की थोडं फार घरकाम करायलाच हवं. हल्ली पुरुषही यात मागे राहत नाहीत." आई काकूंना म्हणाली.
"पण तुला तुझी जबाबदारी कळायला हवी. सासू सांभाळून घेते म्हंटल्यावर आपण गैरफायदा घ्यायचा नाही." आईने लेकीचा कान धरला.
स्वप्नालीला आपली चूक कळली. 'मी आदित्यचाही विचार केला नाही. त्याला काय हवं आहे, काय आवडतं हे देखील विचारायची तसदी घेतली नाही. त्याचा स्वभाव जाणून घेण्याचा, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. स्वतःच्या विश्वात इतकं मग्न झालो आपण?'

"माझं चुकलं आदित्य." तिने नवऱ्याची माफी मागितली.
"तुझी चुक तुला लवकर उमगली हे फार बरं झालं." त्याने तिला जवळ घेतलं. काकू दोघांकडे समाधानाने बघत राहिल्या.
"मी सुट्टी घेते. आपण फिरायला जातोय. काकू, चालेल ना?" स्वप्नाली.
"मी सुट्टी घेते. आपण फिरायला जातोय. काकू, चालेल ना?" स्वप्नाली.
"काकू काय म्हणतेस? आई म्हण." आईने लेकीला दरडावलं.
काही वेळाने स्वप्नालीने तिकिटं बुक केली. "आई, तुमचीही तिकिटं बुक केली आहेत."
"वेडी का काय तू? नवरा -बायकोबरोबर हनिमूनला कोण जातं?"
"तुम्ही आमच्यासोबत नव्हे तर दोघी लेडीज स्पेशलकडून जाताय. संध्याकाळी ट्रीपसाठी लागणारी शॉपिंग करू. मग बॅग भरून तयार ठेवा." स्वप्नाली मनापासून म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. आपल्या चुकीची जाणीवही होती अन् वेगळंच समाधान दिसत होतं. घरची स्त्री समाधानी, आनंदी असेल तर कुटुंब हसतं -खेळतं राहतं.
सुखी कुटुंब आणि संसारासाठी आणखी काय हवं असतं? सामंज्यस्य, आपलेपणा, माया अन् भरपूर प्रेम. नाही का?
समाप्त.
सायली डी जोशी.