समांतर रेखा : भाग 2
ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025.
अर्चनाच्या नवऱ्याला जाऊन महिना उलटला आणि एक दिवस तिचा धाकटा दीर घरी आला. जाताना अर्चनाला आपल्यासोबत शहरात घरी घेऊन गेला. तिच्या धाकट्या जाऊबाईने राधिकानेसुद्धा अर्चनाचं मनापासून स्वागत केलं. तिच्या धाकट्या जावेला आत्ता अर्चनाची सगळ्यात जास्त गरज होती. त्याला कारण पण तसंच होतं. राधिका तब्बल तिसऱ्या वेळी गरोदर होती. नऊ महिने पूर्ण होऊन आता तिचे दिवस भरले होते. तिला पहिल्या दोन मुली होत्या, आईच्या बाळंतपणात त्यांच्याकडे पाहायला कोणीतरी जबाबदार व्यक्ती हवी होती. अनायासे आता राधिकेच्या संसाराची उठबस करायला अर्चना देवासारखी धावून आली होती. अर्चना घरात आल्या आल्या राधिकेने तिला डोळ्यांत आसवे आणत वाकून नमस्कार केला. तिच्या दुःखात आपण सामील आहोत हे सर्वतोपरी दाखवण्यात ती किंचितही कमी पडली नाही. अर्चना मनातून दुःखी होती पण धाकट्या जावेच्या मुलींना आता आईप्रमाणे माया मात्र लावणार होती.
अर्चनाने डोळे पुसले मनातला कढ काळजात आवळून धरला आणि धाकट्या जावेच्या संसाराचे कष्ट उपसायला कंबर कसून उभी राहिली. राधिकेची धाकटी मुलगी शर्वरी तिला मायेने येऊन बिलगली. आई आपल्याला करणार नाही एवढे जास्त लाड ही आपली काकू करते हे त्या बाळ जीवाला लगेच कळलं. अर्चनाची मुलींची हौस आपल्या जावेच्या मुलींच्या खस्ता काढण्यात फिटत होती. त्या दोन लेकरांसाठी कपडे शिवण, त्यांचा अभ्यास घेणं, दोघींसाठी चांगले चांगले पदार्थ करणे याt तिचा सगळा दिवस निघून जाई. सगळी निजानीज झाल्यावर रात्री गादीला पाठ टेकली की मात्र तो एकांत तिला खायला उठे. तिच्या नकळत तिचे डोळे पाझरू लागत. आपल्या नवऱ्याच्या आठवणीने अर्चनाचा जीव भरून येई.
'कितीही झालं तरी हा आपल्या धाकट्या जावेचा संसार आहे. मुली लहान आहे तोवर ठीक नंतर काय? एकटेच पडू आपण.'
असं वाटून रात्र रात्र तिच्या डोळ्याला डोळा लागत नसे.
विचारांच्या भोवऱ्यात अडकलेली असताना झोपेत असलेल्या मुली आपले कोवळे कोवळे पाय काकूच्या अंगावर टाकून झोपत. त्यांचे गोंडस हात गळ्यात पडत. मग तिचा जीव भरून येई, तिची वांझ कुस मायेने भरून जाई.
'कितीही झालं तरी हा आपल्या धाकट्या जावेचा संसार आहे. मुली लहान आहे तोवर ठीक नंतर काय? एकटेच पडू आपण.'
असं वाटून रात्र रात्र तिच्या डोळ्याला डोळा लागत नसे.
विचारांच्या भोवऱ्यात अडकलेली असताना झोपेत असलेल्या मुली आपले कोवळे कोवळे पाय काकूच्या अंगावर टाकून झोपत. त्यांचे गोंडस हात गळ्यात पडत. मग तिचा जीव भरून येई, तिची वांझ कुस मायेने भरून जाई.
दिवस सरत होते आणि एका रात्री राधिकेने एका गोड गोबऱ्या गालांच्या सुंदर मुलाला जन्म दिला. मुलगा व्हावा म्हणून कित्येक नवस केलेली धाकटी जाऊ उमलून आली. आनंदात राहून निघाली. अर्चनाच्या दिराला सुद्धा पूर्णत्व मिळाल्यासारखं वाटलं. नर्सने त्या नवजात बाळाला दुपट्यात गुंडाळून अर्चनाच्या हातात दिलं. त्या कोवळ्या गोंडस बाळाचा स्पर्श होताचं अर्चनाच्या काळजात धडधडू लागलं. हातपाय थंड पडले एका क्षणी तिला वाटलं, तीच आई झाली आहे. आपल्या मायेपायी आपल्याला पान्हा फुटतो का काय असंही तिला वाटलं. तिने त्या दुपट्यात गुंडाळलेल्या कोवळ्या जीवाला आपल्या काळजाशी घट्ट आवळून धरलं. डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्याने त्या बाळाला न्हाऊ घातलं. ते चिमुकलं बाळ रडलं. त्यालाही गलबलून आलं असावं. त्याच भरात त्या बाळाने मानेला एक झटका दिला आणि टोपड्यातून बाळाच्या उजव्या गालावरचा ठसठशीत "काळा तीळ" पाहून अर्चनाला वेड लागायची वेळ आली.
"अं हो अगदी असाच! एवढाचं आणि डाव्या गालावरचं ह्यांच्या सुद्धा असाच तीळ होता." अर्चना तोंडातल्या तोंडात पुटपुटली. रडता रडता अचानक हसू लागली. हसता हसता नवऱ्याचं नावही घेऊ लागली. तिला वाटलं, ह्या बाळाच्या रूपानं तिचाच नवरा तिच्या जावेच्या पोटी जन्माला आला होता आणि आता ती त्याचं सगळं करणार होती. बाळाकडे पाहून नवऱ्याचा विरह सहन करणार होती.
दिवस पालटले. कौतुकाचं लाडकं बाळ दिवसेंदिवस चंद्राच्या कलेप्रमाणे मोठे होऊ लागलं. त्याच्या बाललीलांनी साऱ्यांना वेड लावलं.
दुसरा भाग क्रमशः........
©️®️सायली पराड कुलकर्णी
©️®️सायली पराड कुलकर्णी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा