समांतर रेखा : भाग 4
ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025.
दोघींमध्ये कडाक्याचं भांडण झालं की अर्चनाची बाजू कमजोर पडायची. दिराला आपल्या बायकोची बाजू योग्य वाटायची. मग दिवस दिवस घरात नकोशी शांतता आणि अबोला असायचा. शेवटी नं राहून अर्चना राधिकेला कळवळून म्हणायची,
"राधिके दे ना गं बाळाला माझ्याजवळ. आज संपूर्ण दिवसभरात मी त्याला मांडीवरसुद्धा घेतलं नाही."
यावर राधिकाची उत्तरं ठरलेली असायची.
"वहिनी असं काय करताय, आता नको झोपलाय तो."
किंवा
"आत्ता त्याची दुधाची किंवा बाळगुटीची वेळ आहे."
किंवा
"आत्ता त्याची दुधाची किंवा बाळगुटीची वेळ आहे."
अशी अनेक वेगवेगळी कारणं सांगून राधिका बाळाला अर्चनापाशी जाऊ द्यायची नाही. बाळाच्या विरहामुळे अर्चनाला कुठलंच काम सुचायचं नाही. इतकं की तिला त्या चिमुकल्या दोन लाघवी मुलींचा सहवास सुद्धा नको वाटायचा. तिच्या मनानं घेतलं होतं, की तिचा नवराचं ह्या बाळाच्या रूपाने घरात आलाय. त्यामुळे पत्नीच्या नात्यानं बाळावर फक्त आणि फक्त तिचाचं हक्क आहे. ते बाळ तिचं आहे.
बाळाबद्दल प्रेम वाटणं वेगळं आणि ही शर्यत वेगळी होती. मानसिक विकृतीने अर्जनाला जणू घेरलं होतं. एक दिवस अचानक अर्चनाच्या मनात होतं ते घडू लागलं. बाळाची आई राधिका अचानक आजारी पडली. तापाने फणफणली. इतका ताप चढला की तिला शुद्ध राहिली नाही. सगळ्या अंगावर ज्वराचे फोड उठले. साहजिकचं तिला बाळाला घेत येईना. मग बाळाचा सांभाळ करण्यासाठी त्याला अर्चनाच्या ताब्यात देण्यात आलं. त्या दिवशी अर्चनाला जणू आसमान ठेंगणं झालं होतं. बाळ तिच्याजवळ होतं. तिच्या कुशीत झोपलं. तिच्या मांडीवर खेळू लागलं. त्या क्षणी अर्चनाला वाटलं, आता आपल्या धाकट्या जावेनी ह्या दुखण्यातून कधी उठूच नये.
इकडे राधिकाला वाटायचं, बाळाचे जरा हाल झाले तरी चालतील पण बाळाला संपूर्णपणे जाऊबाईंच्या स्वाधीन करू नये पण आजारपणापुढे तिचं काही चाललं नाही. पूर्णपणे बरं वाटेपर्यंत काहीचं इलाज नव्हता. आजारपणामुळे बाळ तिच्या अंगावरच्या दुधाला तुटलं. पर्याय नाही म्हणून मग बाटलीने वरचं दूध पिऊ लागलं. बाळाला मांडीवर घेऊन बाटलीने दूध पाजताना अर्चना तृप्त होऊन जायची. तिला वाटायचं जणू बाळ आपल्या अंगावर पीत आहे. एवढा आनंद तिला व्हायचा.
बाळाची अंघोळ, त्याचं औषधपाणी, त्याच्या दुधाच्या वेळा सांभाळणं, बाळ जागलं कि त्याच्यासोबत ही आपणही जगायची. बाळासोबत तिचे रात्रंदिवस कसे सरत होते पत्ता लागत नव्हता. क्षणोक्षणी आपला नवरा आपल्या सानिध्यात पुन्हा आला आहे असं अर्चनाला वाटायचं. तिच्या चेहऱ्यावरून नाहीसं झालेलं हसू पुन्हा परतलं होतं. ती बाळासोबत आता पुन्हा त्या दोन्ही लेकींचे लाडही करू लागली होती.
राधिकाच्या आजारपणात घरात कोणाला कशाची कमी पडली नाही. किंबहुना अर्चनाने ती पडूचं दिली नाही. तिच्या उपकारांखाली धाकटा दीर दबून गेला. कारण त्याच्या बायकोच्या अनुपस्थितीमधेही अर्चनाने त्याच्या संसाराची घडी जराही विस्कटून दिली नव्हती. वहिनीच्या कष्टाचं मोल दिराला वाटू लागलं होतं.
'हि होती म्हणूनचं आपलं घरदार तरलं, मुलाबाळांचे हाल झाले नाहीत,'
ह्या विचारांनी त्याचा अर्चनाबद्दलचा आदर दुपटीनं दुणावला. पण ह्याचं सगळ्यामुळे राधिका मात्र चिडली. हतबल झाली. जे व्हायला नको होतं नेमकं तेच घडलं होतं त्यामुळे ती खंतावली. आपल्या संसाराचा ताबा वहिनींनी घेतलाय हे पहिल्यावर ती अर्चनाचा राग राग करू लागली. पण आजारपणामुळे तिला अशक्तपणा होता आराम करणं गरजेचं होतं त्यामुळे काही दिवस राधिका शांत राहिली. आपल्या आणि बाळाच्याही छोट्या मोठ्या आजारपणात अर्चनाने बाळासाठी काढलेल्या खस्ता तिला नजरेआड कारणंही शक्यचं नव्हतं. नवऱ्यानं केलेली वहिनीची स्तुती, मुलींनी काकू काकू म्हणून तिच्या मागे लाडीकपणे फिरलेलं पाहिलं कि तिची तळपायाची आग मस्तकात जात असे.
चौथा भाग क्रमशः........
©️®️सायली पराड कुलकर्णी

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा