चॅम्पीयन ट्राॅफी २०२५
जलद कथा
समांतर जग भाग १
"यातल्या वैज्ञानिक संज्ञा खरी असल्या तरी परिणाम व प्रसंग हे लेखकाच्या कल्पनेतून निर्माण झालेले आहेत.”
सिद्धार्थ आपल्या कथेचा नायक आहे .इतक्यात त्याला एक वेगळीच जाणीव व्हायला लागली होती. कोणती जाणीव? जशी जशी संध्याकाळ व्हायला लागली तसं त्याचं मन असं बावरल्यासारखं होत असे. रात्र झाली की झोप यायला लागल्यावर त्याला कशाची ओढ लागायची.
कशाची ओढ हे त्याला कळायचं नाही. तो झोपल्यावर त्याला नेहमी स्वप्नात दिसायचं की तो एका वेगळ्या जगात गेला आहे. ते जग त्याला पूर्णपणे अनोळखी असायचं.
ते शहर त्यातील घर, घराचं बांधकाम, तिथले लोक हे सगळं त्यांनी कधीही न बघितलेला असायचं पण ती लोकं मात्र सिद्धार्थला ओळखायचे.
एक दिवस त्याला हे स्वप्न पडलं तेव्हा तो त्या शहरातल्या रस्त्यावरूनं एकटाच फिरत होता. गुळगुळीत रस्त्यावरून भन्नाट वेगाने गाड्या जाताना त्याला दिसल्या. त्याला नवल वाटलं. ह्या अशा प्रकारच्या गाड्या आपल्या शहरात नाहीत. रस्त्याच्या आजूबाजूला बांधकाम केलेल्या इमारती सुद्धा फार वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या. त्या इमारतींचे डिझाईन वेगळंच होतं. त्याला कळत नव्हतं आपण कुठे आलो? त्याच वेळी त्याच्या बाजूने जाणारी एक कार थांबली आणि त्या कारमध्ये बसलेली व्यक्ती म्हणाली,
“ गुड मॉर्निंग सिद्धार्थ साहेब.”
सिद्धार्थने त्यांच्याकडे बघितलं.
“ मी तुम्हाला ओळखतो का?”
सिद्धार्थने विचारलं.
“अरेच्चा ! म्हणजे काय? आपण कितीतरी वर्षांपूर्वीपासूनचे मित्र आहोत. विसरलात का सिद्धार्थ साहेब ?अरे काय झालंय खूप दिवस झाले तुझी माझी भेट नाही झाली मी मनात म्हणतच होतो की तुझी भेट व्हावी आणि अचानक तू दिसलास.”
सिद्धार्थ गोंधळला. या माणसाचे आपण काही वर्षापासूनचे मित्र कसे आहोत कारण याला तर आपण आजच पाहिलं. त्याचा चेहरा इतका कावरा बावरा झाला की त्या व्यक्तीच्या ते लक्षात आलं. तो म्हणाला,
“ सिद्धार्थ बस गाडीत. आपण कुठेतरी कॉफीशॉप मध्ये बसूया आणि बोलूया.”
सिद्धार्थला मनातून भीती वाटली. अनोळखी माणसाबरोबर जावं का? उगीच आपलं जीवन संकटात पडायचं. पण ती व्यक्ती खूपच आग्रह करायला लागली. त्यानी गाडीचा दार सुद्धा उघडलं. शेवटी सिद्धार्थ आत जाऊन बसला.

ती व्यक्ती खूप गप्पा करत होती. तो जे जे सांगत होता, जे जे बोलत होता, त्यातलं एक शब्द ही सिद्धार्थला आठवत नव्हता. ती व्यक्ती म्हणाली,
“ सिद्धार्थ तू काहीच का बोलत नाहीयेस?”
तेव्हा सिद्धार्थ म्हणाला,
“ सिद्धार्थ तू काहीच का बोलत नाहीयेस?”
तेव्हा सिद्धार्थ म्हणाला,
“ अरे मी जरा आठवण्याचा प्रयत्न करतोय. मला काहीच कसं आठवत नाहीये?”
यावर ती व्यक्ती हसायला लागली. म्हणाली,
“ नक्कीच तुला काही आठवत नाहीये. नाहीतर तू मला अहो जाहो केलं नसतं. अक्षरशः गळ्यात गळे टाकून फिरणारे आपण लहानपणापासूनचे मित्र आहोत.
आता सिद्धार्थ जागच्या जागी उडायचाच बाकी राहिला होता. लहानपणापासूनचे मित्र ही व्यक्ती आणि मी ? सिद्धार्थ ला काही कळेना.
अरे मी आतापर्यंत तर वेगळ्या जगात राहत होतो. तिथे मी वेगळ्या कंपनीत नोकरीला होतो. माझी बायको आहे, मुलं आहेत. हे काय होतय? त्याला कळेचना काय बोलावं ? तो गपचूप राहिला. सिद्धार्थ म्हणाला,
“ मित्रा मला ना जोपर्यंत काही आठवत नाही तोपर्यंत तू मला काही प्रश्न विचारूच नको. उलट जितकं मला काही सांगता येईल तेवढे सांग. कदाचित केव्हातरी मला आठवेल.”
असं सांगून सिद्धार्थ नि आपली सोडवणूक करून घेतली.
सिद्धार्थ त्या माणसाबरोबर कॉफी शॉप मध्ये गेला तेव्हा सिद्धार्थला आश्चर्य वाटलं. हे कॉफी शॉप आहे ? आपल्या जगापेक्षा वेगळंच आहे. कॉफी शॉपच्या गेट पासून त्या व्यक्तीने गाडी सरळ आत घातली .
हॉटेलमध्ये तिथे वेगवेगळ्या लाईन बनवलेल्या होत्या. तिथे प्रत्येकाने आपापल्या गाड्या उभ्या करायच्या आणि तिथेच तुम्हाला काय हवं ते सर्व दिलं जायचं. ज्यांची गाडी तुमच्या आधी उभी आहे त्यांना निघायला किती वेळ आहे हे काॅफीशाॅपच्या बाहेर असलेल्या घड्याळावर सांगितल्या जायचं. ते बघून आपण आपली गाडी आत घ्यायची किंवा बाहेरच थांबवायची हे लोक ठरवत.
हे वेगळंच काहीतरी वाटलं सिद्धार्थला. अचानक सिद्धार्थने त्याला विचारलं,
“हे असं कधीपासून झालं या हॉटेलमध्ये?”
तर ती व्यक्ती आश्चर्याने सिद्धार्थकडे बघायला लागली.
“ अरे सिद्धार्थ तुला झालं काय? आपण या हॉटेलच्या ऊद्घाटनाला आलो होतो. आपल्याला इन्व्हिटेशन होतं.”

“कमाल आहे !मला काहीच कसं आठवत नाही.”
“ तेच मला आश्चर्य वाटतंय. सिद्धार्थ तू काय खाल्लं होतंस रे काल रात्री ? की ज्यामुळे तुला आज काहीच आठवत नाहीये. या हॉटेलला पण कितीदा तरी येऊन गेलोय आणि आपण दोघेच नाही बरं आपल्याबरोबर गायत्री सुद्धा होती.”
“कोण गायत्री?”

सिद्धार्थने आश्चर्याने विचारलं.
“ घ्या. आता गायत्री कोण हे तू विचारायला लागलास म्हणजे नक्कीच तुझ्या डोक्यात काहीतरी फरक पडला आहे. अरे गायत्री आपली.”
“आपली गायत्री?”
“ जो तुझपे मरती है रे बाबा.”
असं म्हणून ती व्यक्ती जोरजोरात हसायला लागली. सिद्धार्थला आता कापरं भरलं. या वेगळ्या जगात माझ्या नावासकट मला सगळे ओळखतात आणि मी मात्र त्यांना ओळखत नाहीये. त्याच्यात एक मुलगी माझ्या प्रेमातही पडलेली आहे ! आता कसं करू? त्याला कळेना. तो काहीच बोलला नाही. चूप बसला. तेवढ्यात ती व्यक्ती म्हणाली ,
“बघ ती गाडी आता बाहेर पडतेय. ती बाहेर पडली की आपण आत जायचं”
सिद्धार्थने होकारार्थी मान हलवली. त्याला काही कळलंच नाही काय उत्तर द्यावं. दोघही ती गाडी बाहेर आल्यावर आत मध्ये गेले. तिथे गेल्या गेल्या तिथल्या वेटरने त्यांना मेनू कार्ड आणून दिलं. ते मेनू कार्ड पण वेगळं होतं. सिद्धार्थ म्हणाला,
“ अरे इथे काही पुस्तकासारखं मेनू कार्ड नसतं का?”
ती व्यक्ती बघायलाच लागली,
“ सिद्धार्थ काय झालं तुला? की तू माझी फिरकी घेतोयस? इथे कसं मेनू कार्ड मिळतं हे तुला माहिती नाही? हे बघ हे जे आहे ना हे मेनू कार्डच आहे.”
“ अरे पण हे तर स्वाईप मशीन दिसतंय. कार्ड स्वाईप करायला.”
“ हो मग ?त्याच्याखाली मेनू लिहिलेला आहे. या मेनूवर आपल्याला काय हवं तिथे आपण टिक करायचं आणि त्याचं जे बिल होईल त्याचं कॅल्क्युलेशन करून इथे वरती बिल येत. लगेच आपण कार्ड स्वाईप करून टाकायचं की तुमचं पेमेंट होऊन जातं. तिकडे कॉम्प्युटरवर सगळं लिहिलेलं असतं. ते बघून ऑर्डर आपल्याला येते.”

“ हे तर काहीतरी वेगळंच आहे बर का! मला हे कळत नाहीये काय आहे ?”
“मला काय वाटतं सिद्धार्थ थोडे दिवस जरा विश्रांतीसाठी तू कुठेतरी बाहेरगावी जा आणि बरोबर गायत्रीला घेऊन जा.”
“सोबत गायत्रीला? हे काय बोलतोस वेड्यासारखा.”
सिद्धार्थ अचानक ओरडला. यावर ती व्यक्ती म्हणाली,
“ अरे एवढा ओरडतोस कशाला? तुमच्या दोघांच्या वागण्यातून कळतं की तुम्ही दोघे एकमेकांना लाईक करता. जा की मस्त फिरून या. काल नाही तरी आपलं फारच उशिरापर्यंत काम चाललं होतं. “
“काल काय काम केलं आपण?”
सिद्धार्थने आश्चर्याने विचारलं.
“ घ्या आता हे पण मीच तुला सांगायचं? तू आमच्या टीमचा लीडर आहेस ना भावा. रात्री किती वाजेपर्यंत आपण काम करत होतो त्यानंतर तू तुझ्या कारने गायत्रीला तिच्या घरी सोडायला गेला. नंतर तुझ्या घरी गेलास. मला मेसेजही केलास की मी पोहोचलो म्हणून. हा आणखीन आत्ता माझ्या लक्षात आलं की तू रस्त्यावरून पायी का चालला होतास? तुझी गाडी कुठे गेली?”
सिद्धार्थ गोंधळलेल्या चेहऱ्याने त्याच्याकडे बघत होता. मनातच सिद्धार्थला वाटलं माझ्यावर काही जादूटोणा तर नाही झालेला? मला काही केल्या हा माणूस ओळखायला येत नाहीये. यावर ती व्यक्ती म्हणाली,
“ओके ठीक आहे तुला गायत्री आठवत नाही. मी आठवत नाही म्हणजे माझं नाव पण आठवत नसेल ना?”
सिद्धार्थने अगदी सहजपणे नकारार्थी मान हलवली. त्यावर त्या व्यक्तिने कपाळाला हात मारला.
“ तू नावाने पण मला हाक मारणार नाहीस? नेहमी प्रमाणे माझ्याशी बोलणार नाहीस? हे मला कठीणच वाटतय.”

सिद्धार्थ काहीच बोलला नाही. चुपचाप राहिला.
—-
अचानकपणे सिद्धार्थला जाग आली तर तो त्याच्याच खोलीत होता. त्याला कळलच नाही मग तो आतापर्यंत कुठे फिरत होता? ते रस्ते, ते कॉफी शॉप, मला ओळखणारी ती व्यक्ती. हे म्हणजे काहीतरी वेगळंच दिसतंय. सिद्धार्थ उठून बसला पाणी प्यायला. त्याच्या बाजूला त्याची बायको झोपली होती. तिला जाग आली. तिने उठून सिद्धार्थला विचारलं,
“ सिद्धार्थ इतक्या लवकर का उठलास? वेळ आहे अजून तुला ऑफिसला जायला. मीच अजून उठली नाही बघ टिफिन करायला.” त्यावेळेस सिद्धार्थ म्हणाला,
“नको आज मी जाणार नाही ऑफिसला.”
“का रे बरं वाटत नाहीये का??”
“ हो.”
तिने सिद्धार्थच्या कपाळावर हात लावून ताप आहे का बघीतलं. ताप नव्हता.
सिद्धार्थला आत्ता अजिबात बोलायची इच्छा नव्हती. तो डोळे मिटून पडून राहिला. त्याची बायको ही त्याला डिस्टर्ब न करता स्वयंपाक घरात गेली.
नेमकं काय घडलं माझ्या बरोबर? सिद्धार्थ मनात म्हणाला.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा