Login

समांतर जगाचा प्रवासी भाग २

एक काल्पनिक विज्ञान कथा
चॅम्पीयन ट्राॅफी २०२५

जलद कथा

"या कथेतल्या वैज्ञानिक संज्ञा खरी असल्या तरी परिणाम व प्रसंग हे लेखकाच्या कल्पनेतून निर्माण झालेले आहेत.”

समांतर जग भाग २

आजही सिद्धार्थ सकाळी खडबडून उठला. अंथरुणावर बसला.त्याच्या अंगाला घाम सुटला होता. त्याला काही कळेना. मी असं रोज रात्री झोपेत वेगळ्या जगात का जातो? कसा जातो? काहीच कळत नव्हतं. तो इतका गोंधळलेला होता की त्याला काय करावे याच्यापुढे हे कळेना. कोणाला सांगावं? कुणालाही सांगितलं तरी हे स्वप्न खरं तरी वाटणार आहे का? स्वप्नातलं सगळंच खरं नसतं हे सिद्धार्थला कळत होतं. त्या स्वप्नात मला माझ्या खऱ्या नावाने कसे सगळे ओळखत होते? याचा त्याला आश्चर्य वाटलं.


तो आपला नुसता खोलीत फे-या मारत बसला होता. त्याच वेळेला त्याची बायको मनू, मनीषा तिचं नाव. तिला तो म्हणू म्हणत असे. ती खोलीत आली. तिने बघितलं सिद्धार्थ फारच अस्वस्थपणे फेऱ्या मारतोय. तिने विचारलं,

“ सिद्धार्थ कसलं ताण आहे का?”
तो काहीच बोलला नाही.

“ऑफिसमधले टार्गेट पूर्ण झालं नाहीये का?”

तरीही तो काही बोलला नाही. यावर तिने त्याचा हात धरून आपल्याकडे वळवून उभं केलं आणि म्हटलं,

“ अरे मी तुला विचारते की ऑफिसमध्ये काही ताण आहे का? असं का तू वागतोय कालपासून? तुझ्या वागण्यामधून मला काहीच कळत नाहीये.”

तेव्हा सिद्धार्थ म्हणाला,

“ मला तर कळू दे आधी की मी असा का वागतो आहे ? मला रोज रात्री कुठल्या जगात घेऊन जातात हेच कळत नाही. कालपासून हे काहीतरी सुरू झालाय .अगं सकाळी उठतो तेव्हा ह्या जगात असतो रात्री भलत्याच जगात असतो. मनू गंमत ही आहे की त्या जगात सुद्धां मला सिद्धार्थ म्हणूनच ओळखतात. मी कुठल्या वेगळ्या जगात होतो परवा. कुठला वेगळ्या जगात होतो माहिती नाही. तिथली भाषा वेगळी, इथली भाषा वेगळी पण माझ्याशी बोलताना सगळे बरोबर मराठीत बोलत होते. हेही मला आश्चर्यकारक वाटलं.”

तेव्हा मनू म्हणाली,

“ सिद्धार्थ एवढे टेन्शन घेऊ नको. आपण आज संध्याकाळी आपल्या डॉक्टरांची वेळ घेऊया जाऊन भेटूया. त्यांना सांगूया.”


सिद्धार्थने लहान मुलांसारखे होकारार्थी मान हलवली आणि पुन्हा पलंगावर जाऊन बसला.

“ अरे तुला आज ऑफिस नाही का? “
मनूनं विचारलं.


“ अग मी काय करू ऑफिसमध्ये जाऊन? काल मी ऑफिसमध्ये गेलो ना तर माझ्या डोक्यात सगळं स्वप्नातलंच होतं. इथलं तिथलं मिक्स होऊन काय बोलत होतो मी काल ऑफिसमध्ये मलाच कळत नव्हतं. शेवटी काल अनिकेत म्हणाला सिद्धार्थ तुला बरं नाही का रे ? हाफ डे घेऊन घरी जा. आम्ही काय बोलतो अन तू काय बोलतो कसलाच संदर्भ लागत नाही. एवढं काय झालं रे सिद्धार्थ?”


“ तू त्यांना बोललास काही ?”


“अगं मी त्यांना त्या परवाच्या जगात पाहिलं त्या कॉफी शॉप बद्दल सांगितलं. असं कॉफी शॉप असलं पाहिजे. यावर सगळेजण माझ्याकडे इतक्या गोंधळलेल्या नजरेने बघत होते आणि त्यांना वाटलं हा काय वेड्यासारखा बोलतोय ! असं कधी कॉफी शॉप असतं का? पण मी त्या जगात बघितलं ना ते कॉफी शॉप. मी स्वतः तिथे कॉफी प्यायली.”


मनूने शांतपणे त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हटलं,


“ सिद्धार्थ हव असेल तर आज सुट्टी घे कारण मागच्या पंधरा दिवसापासून तू त्या नवीन प्रोजेक्टच्या वर एवढं काम करतोयस की तुला नीट झोप मिळालेली नाहीये म्हणून असं होत असेल का? असू शकतं ना आपण विचारू डॉक्टरांना.”


सिद्धार्थ काहीच बोलला नाही.

थोड्यावेळाने मनु म्हणाली


“ सिद्धार्थ मी डबा करते तुझा. तुला नसेल जावसं वाटत तर नको जाऊ. आराम कर “


असं म्हणून त्याच्या कपाळावरनं हात फिरवून ती स्वयंपाक घरात निघून गेली. सिद्धार्थ पुन्हा आपल्या विचारात पडला. काय करावं?

अचानक त्याला आठवलं पेपर मध्ये जाहिरात आली होती त्याच्यात लिहिलं होतं मानसशास्त्रज्ञ डॉक्टर राव यांनी काय काम केलय. भरकन सिद्धार्थने आपला मोबाईल उचलला कारण त्या दिवशी त्याने तो नंबर का सेव्ह केला होता हे त्यालाच आता आठवत नव्हतं. त्याने त्या नंबर वर फोन लावला. फोनची रिंग जात होती पण फोन कोणीच उचलत नव्हतं. कंटाळून त्यांनी फोन बंद केला आणि मग त्याच्या लक्षात आलं.


“अरे सकाळी साडेसात वाजता कोण असणार क्लिनिकमध्ये मी सुद्धा वेडाच आहे.”
सिद्धार्थ स्वतःशीच पुटपुटला. त्यांनी ठरवलं की आज त्यांना कसेही करून भेटायचं असा विचार करून त्याने ऑफिसला जायचची तयारी करायला लागला.

0

🎭 Series Post

View all