चॅम्पीयन ट्राॅफी २०२५
जलद कथा
“या कथेतल्या वैज्ञानिक संज्ञा खरी असल्या तरी परिणाम व प्रसंग हे लेखकाच्या कल्पनेतून निर्माण झालेले आहेत.”
समांतर जग भाग ३
सिद्धार्थने ऑफिसमध्ये गेल्या गेल्या डॉक्टर राव यांची अपॉइंटमेंट घेतली संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर सिद्धार्थ सरळ त्यांच्या दवाखान्यात गेला दवाखान्यात बरीच लोकं होती. त्याचा नंबर येईपर्यंत तो खूपच अस्वस्थ होत होता. कधी एकदा माझ्या स्वप्नांवर उपाय सापडतो असं त्याला झालं होतं. थोड्या वेळाने त्याचा नंबर आला तो आत गेला
“बोला काय होते तुम्हाला?”
डॉक्टर रावांनी विचारलं,
बराच वेळ सिद्धार्थला बोलायला शब्दच सापडले नाही नंतर जेव्हा डॉक्टरांनी पुन्हा एकदा विचारलं तेव्हा तो म्हणाला,
डॉक्टर रावांनी विचारलं,
बराच वेळ सिद्धार्थला बोलायला शब्दच सापडले नाही नंतर जेव्हा डॉक्टरांनी पुन्हा एकदा विचारलं तेव्हा तो म्हणाला,
“ डॉक्टर रोज मला स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नात मी वेगळ्या जगात जातो तिथली सगळ्यांची भाषा वेगळी असते. तिथले कपडे वेगळे असतात. माझ्याशी बोलताना सगळे मराठीत बोलतात.
माझं नाव सुद्धा घेतात. मला ओळखतात. सकाळी जाग येते तेव्हा मी वर्तमानात असतो. मला काहीच कळत नाही. दोनच दिवस झाले हे स्वप्न पडतय. दोन दिवस मी वेगवेगळ्या जगात होतो. यावर मला उपाय हवाय डॉक्टर. दिवसभरात मी काही बोललो की ते नेमकं त्या स्वप्नात पाहिलेल असतं आणि इथल्या लोकांना काहीच कळत नाही. माझं डोकं बधिर झाल्यासारखं झालंय.”
माझं नाव सुद्धा घेतात. मला ओळखतात. सकाळी जाग येते तेव्हा मी वर्तमानात असतो. मला काहीच कळत नाही. दोनच दिवस झाले हे स्वप्न पडतय. दोन दिवस मी वेगवेगळ्या जगात होतो. यावर मला उपाय हवाय डॉक्टर. दिवसभरात मी काही बोललो की ते नेमकं त्या स्वप्नात पाहिलेल असतं आणि इथल्या लोकांना काहीच कळत नाही. माझं डोकं बधिर झाल्यासारखं झालंय.”
एका दमात सगळं बोलून सिद्धार्थ थांबला त्याची छाती धपापत होती. दम लागला होता. डॉक्टरांनी त्याच्या समोर पाण्याचा ग्लास ठेवला आणि राव म्हणाले,
“ तुमचं स्वप्न म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मी काही टेस्ट करून घेतो.”
रावांनी काही रूटीन न्यूरो चाचण्या, रिफ्लेक्स, प्युपील रेस्पॉन्स, आणि इइजी केलं. स्क्रीनवर तरंग उमटत होते. एका रेषेत उमटणारे तरंग अचानक कुठे तरी भरकटत होते. राव विचारमग्न झाले.
“हे साधं ‘रँडम ड्रीमिंग’ नाही. तुझ्या मेंदूच्या थेटा-गॅमा बँडमध्ये असामान्य समकालिकता दिसतेय. निदान करण्यासाठी आपल्याला ‘हाय-डेन्सिटी इइजी आणि ‘टार्गेटेड स्टिम्युलेशन’ करावं लागेल.”
“म्हणजे?”
सिद्धार्थने काहीच न समजून विचारलं
“आज रात्री इथेच थांब. तुला झोपवून आम्ही मेंदूचे सिग्नल कॅप्चर करू. जर काही ‘क्रॉस-ओव्हर इव्हेंट’ होत असेल तर त्याची नोंद मिळेल.”
“आज रात्री इथेच थांब. तुला झोपवून आम्ही मेंदूचे सिग्नल कॅप्चर करू. जर काही ‘क्रॉस-ओव्हर इव्हेंट’ होत असेल तर त्याची नोंद मिळेल.”
यावर सिद्धार्थला काहीही कळलं नाही तरी त्याने कळल्यासारखी मान हलवली. डाॅक्टर रावांना उद्या कधी यायचं ते विचारून सिद्धार्थ घरी जायला निघाला.
—-----
—-----
सिद्धार्थ डाॅक्टर रावांनी सांगीतलेल्या वेळी संध्याकाळी त्यांच्या लॅब मधे गेला.
रावांनी सिद्धार्थला एका रिलायनिंग चेयरवर बसवलं. त्याच्या डोक्याभोवती इलेक्ट्रोड्स लावले गेले. वायर्स मॉनिटर्सला जोडलेल्या होत्या. हळूवार संगीत लॅबमध्ये ऐकू येत होत.
“सिद्धार्थ कोणतीही घाई नाही. तू केवळ तुझ्या श्वासावर लक्ष दे,”
राव सौम्य आवाजात म्हणाले,
“ सिद्धार्थ स्वप्नात तू जरी कुठे गेलास तरी आम्ही इथेच आहोत. घाबरू नकोस. मी इथेच तुझ्या जवळ आहे.”
सिद्धार्थने डोळे मिटले. त्याच्या श्वासांचा लयबद्ध उतार-चढाव ऐकू येत होता. अचानक श्र्वासाचा ऐकू येणा-या आवाजाचा पोत बदलला. सिद्धार्थला काल, परवा जसं वाटलं तसंच आताही वाटत होतं. त्याने डोळे उघडले तर स्वतःला मध्यभागी चौकात उभा आहे असं पाहिलं.
तांबूस प्रकाश सगळीकडे पसरला होता, तसंच धुक्याची चादरही पसरलेली दिसली. खाली सगळीकडे दगडी फरश्यांचे रस्ते होते. सिद्धार्थ स्तिमित नजरेने सगळीकडे बघत होता तेवढ्यात त्याच्या कानावर हाक आली
“सिद्धार्थ!”
तो अनोळखी आवाज! त्यानं वळून पाहिलं. दूरवर त्याला एक सावली दिसली. ती क्षणभर हलली. चेहरा अजूनही दिसत नव्हता.
त्याने एक पाऊल पुढे टाकलं. तोच त्याच्या पावलांखाली काहीतरी टोचलं. सिद्धार्थने पाय उचलून बघितलं तर एक लहानशी चिन्ह असलेली धातूची वस्तू होती. ते एक धातूचं कडं होतं. त्याने ते कडं उचलून हातात घेताच ते उष्ण झालं. चिन्हावर लिहीलेल होतं,
“जे निवडशील, तेच तुझं जग असेल.”
त्याच वेळी वातावरणात मनाला निराश करणारे ध्वनींचे सूर ऐकू येत होते. आणि
“ब्लिप!”
त्याच वेळी वातावरणात मनाला निराश करणारे ध्वनींचे सूर ऐकू येत होते. आणि
“ब्लिप!”
मॉनिटर्सवर वक्ररेषा दिसू लागल्या. रावांनी हातातील पेन घट्ट पकडलं.
“तो त्या जगात गेला आहे. लॉगिंग सुरू ठेवा.”
त्यांनी सहाय्यकाला म्हटलं.
चौकात उभ्या असणाऱ्या सिद्धार्थने सावलीच्या दिशेने धाव घ्यायचा प्रयत्न केला, पण तो त्या सावलीपर्यंत पोहोचू शकला नाही. सिद्धार्थला एकदम थकवा आला. तो आवाज म्हणाला,
"उद्या, उद्या भेट.”
सावली हळू हळू विरली. तांबूस उजेडाचा रंग राखाडी होत गेला.
सिद्धार्थ मुठीत ते धातूचं कडं घट्ट धरून बसला होता. तो अतिशय घामाघूम झाला होता .
काही क्षणात सिद्धार्थने डोळे उघडले. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तो लॅब मध्ये आहे. लॅब, इलेक्ट्रोड्स, लॅब मधली थंड हवा. सिद्धार्थला फरक जाणवला
राव नजर लावून स्क्रीनकडे पाहत होते.
“तू कुठे होतास?”
त्यांनी हलक्या आवाजात सिद्धार्थला विचारलं.
सिद्धार्थने मुठ उघडली. धातूचं कडं त्याच्या हातात होतं. त्याच्यातील उष्णता जराही कमी झाली नव्हती.
“हे इथे कसं आलं?”
आपल्या हातातलं कड बघून सिद्धार्थने आश्चर्याने विचारलं. हे विचारताना त्याच्या आवाजात थरथर होती.
डाॅक्टर राव तीन सेकंद थांबले आणि म्हणाले.
डाॅक्टर राव तीन सेकंद थांबले आणि म्हणाले.
“ते फक्त स्वप्न नाही.”
आणि त्याच क्षणी दुसऱ्या मॉनिटरवर लाल अक्षरं चमकली,
‘क्राॅस ओव्हर मार्कर डिटेक्टेड’
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा