Login

समांतर जगाचा प्रवासी भाग. ४

एक काल्पनिक विज्ञान कथा
चॅम्पीयन ट्राॅफी २०२५
जलद कथा
“या कथेतल्या वैज्ञानिक संज्ञा खरी असल्या तरी परिणाम व प्रसंग हे लेखकाच्या कल्पनेतून निर्माण झालेले आहेत.”

समांतर जग भाग ४
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सिद्धार्थ नेहमीपेक्षा अधिक लवकर लॅबमध्ये पोहोचला. त्याच्या शर्टच्या आतील खिशात ते धातूचं कडं होतं. त्या कड्याची ऊष्णता सिद्धार्थला जाणवत होती.

रावांनी त्याला खुर्चीवर बसवून दिवसाच्या नोंदी समजावून सांगितल्या.
“तुझ्या आर इ एम -स्टेजमध्ये मेंदूची गॅमा-समकालिकता मानवी सरासरीपेक्षा तीन पट. ‘क्रॉस-ओव्हर’ म्हणजे—तू ज्या लहरीवर जातोस, ती लहर आपल्या कडच्या भौतिक वास्तवात मोजता येते. आणि सगळ्यात गूढ म्हणजे… हे चिन्ह.”

“ तिथे पडलं होतं ते उचललं.”
सिद्धार्थ म्हणाला.


रावांनी सावधपणे ते हातात घेतलं.
“अलॉय कंपोझिशन तपासू. पण आज रात्री आपण एक पाऊल पुढे जाऊ. ट्रिगर्ड रीकॉल—तू त्या जगात गेल्यावर विशिष्ट शब्द उच्चार. आम्ही तोच शब्द इथे ध्वनी म्हणून देऊ. दोन्हीकडचा प्रतिध्वनी जमला तर आपल्याला ‘लिंक्ड इव्हेंट’ मिळेल.”
—---
रात्री पुन्हा इलेक्ट्रोड्स. मॉनिटर्स सुरू झाले. ध्वनिरहित शांतता होती .श्वासाची लय फक्त ऐकू येत होती.
तो चौक. गल्लीचं एक टोक. कडेला किरकोळ दुकाने. भिंतीवर एक नकाशा;


“सिद्धार्थ!”


तोच आवाज. यावेळी सावली नाही एक तरुणी त्याच्या काही अंतरावर उभी होती. लांबसडक वेणी, कपाळावर लहान टिकली, डोळ्यांत ओळखीचं हसू.


“तू का दरवेळी घाईत येतोस?”
त्या तरुणीने सिद्धार्थला विचारलं.
“मला वेळ कमी असतो,”
सिद्धार्थ हळूच म्हणाला. सिद्धार्थने त्या अनोळखी तरुणीला तिचे नाव विचारले

ती तरुणी थोडा वेळ काहीच बोलली नाही. ती फक्त सिद्धार्थ कडे पाहत राहिली.
“येथे नावं जुळतात, पण बोलली जात नाहीत. आपली सगळी ओळख फक्त कृतीत असते.”
तरुणीच्या या बोलण्याचा सिद्धार्थला काहीच अर्थ लागला नाही. नाव जुळतात म्हणजे काय ? सगळी ओळख कृतीत असते म्हणजे काय,? याचा काहीच अर्थ त्याला कळला नाही .हे त्याच्या चेहऱ्या वरून तरुणीने ओळखलं
त्याने खिशातून कडं काढून दाखवलं.
“हे तुला माहिती आहे का?”
सिद्धार्थने विचारलं.

तिने हात पुढे केला, पण त्या कड्याला स्पर्श करण्याआधीच आपला हात मागे घेतला आणि म्हणाली,
“हे निवडीचं बीज आहे. एकदा ते सक्रिय झालं की प्रवासी स्वतःचं जग निवडल्या शिवाय सुटत नाही.”


“मी प्रवासी?”


“हो तूच.”
तिच्या आवाजात ठामपणा होता. तिच्या आवाजात ठामपणा असला तरी तिच्या डोळ्यात मात्र उदास पणा सिद्धार्थला जाणवला. त्याच क्षणी त्याला घंटेचा नाद ऐकू आला. सिद्धार्थला आठवलं रावांनी सांगितलेला ट्रिगर-शब्द.

त्याने दात-ओठ खाऊन उच्चारला.
“सावली.”
इकडे लॅबमध्ये लगेच रावांनी मायक्रोफोन ऑन केला. “सावली.” त्याचा आवाज स्पीकर्समधून खोलीभर पसरला.


मॉनिटर्सवर तरंगांंचा आलेख तयार झाला.. दोन ग्राफच्या शिखरांनी एकाच क्षणी दोन टोकं जोडली.
‘ लिंक अचिव्ह’
चौकात उभ्या असलेल्या त्यातरुणीचे डोळे मोठे झाले. ती म्हणाली,

“तू दोन्ही बाजूंना ऐकतोयस मग लवकरच तुला निवड करावी लागेल.”

“का?”
सिद्धार्थ ने विचारलं.


“कारण दोन जगांना एकाच अवकाशात राहता येत नाही.”


““आज वेळ कमी आहे. उद्या त्या जुन्या ग्रंथालयात ये. पहाटेच्या आधी. मी तुला सगळं सांगेन.”

“तुझं नाव तरी…”


“नावांच्या पलीकडे जाऊन विचार कर.”
ती हसली.
लॅबमध्ये अलार्म शिटी वाजली. सिद्धार्थच्या श्वासात वेगाने चढउतार होऊ लागली. रावांनी स्टिम्युलेशन थांबवलं.


त्याने डोळे उघडले तेव्हा त्याने एका हाताने खुर्चीचा हात धरून ठेवला होता.


“कसा आहेस?” रावांनी विचारलं.


“उद्या तिने जुन्या ग्रंथालयात बोलवले आहे.”
सिद्धार्थ म्हणाला.
रावांनी दीर्घ श्वास घेतला.
“आज आपल्याला ‘लिंक्ड इव्हेंट’ मिळाला. याचा अर्थ हा केवळ कल्पनाविलास नाही. पण काळजी घे. तुझं ऑटोनॉमिक सिस्टम सीमेजवळ गेलं होतं. तू आणखी खोलवर गेलास तर तुला परत आणणं कठीण होईल.”
सिद्धार्थने खिशातलं चिन्ह चाचपडलं. कड्यातील उष्णता कमी झाली होती,


“उद्या पहाटे,” तो स्वतःशी पुटपुटला, “जुनं ग्रंथालय.”

0

🎭 Series Post

View all