चॅम्पीयन ट्राॅफी २०२५
जलद कथा
समांतर जग ५
"या कथेतल्या वैज्ञानिक संज्ञा खरी असल्या तरी परिणाम व प्रसंग हे लेखकाच्या कल्पनेतून निर्माण झालेले आहेत.”
पहाटेच्या हवेत एक वेगळाच गंध मिसळला होता. सिद्धार्थ चौक पार करून त्या जुन्या ग्रंथालयासमोर उभा राहिला. लोखंडी गजांची दारं अर्धवट उघडी होती. आत अंधारात धुळीचे कण प्रकाशझोतामध्ये चमकत होते.
“ये.”
तिचा आवाज आतून आला.
ग्रंथालयात आत शेल्फांच्या मध्ये ती उभी होती. आज तिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट होती.
“तू उशिरा आलास,” ती म्हणाली,
.
“तुझ्या स्मृती इथे जिवंत आहेत.”
ती तरुणी म्हणाली.
“माझ्या स्मृती?”
सिद्धार्थने आश्चर्याने विचारलं.
"तुझ्या दुसऱ्या जगाने घेतलेल्या, नाहीतर तुझ्या जगाने विसरलेल्या ? ते सांगणं कठीण आहे.”
तिने एक कप्पा उघडला. आत छोटी-छोटी नोंद-पुस्तकं होती, प्रत्येकाच्या पानावर नाजुक अक्षर: वर्ष, दिवस, घटना.असं लिहीलं होत.
“हे काय?”
“तुझ्या आयुष्याचा अध्याय. इथे प्रत्येक प्रवाश्याच्या आठवणी जपल्या जातात, कारण आपण जोपर्यंत त्या जगात जगत असतो तोपर्यंत आपण त्या जगाचे प्रवासीच असतो. नंतर त्या जगाशी संपर्क तुटला तरी इथे त्याच्या आयुष्याच्या स्मृती जपून ठेवल्या जातात.”
तिने एका पुस्तकाची पाने उलटली.
“हे काय?”
“तुझ्या आयुष्याचा अध्याय. इथे प्रत्येक प्रवाश्याच्या आठवणी जपल्या जातात, कारण आपण जोपर्यंत त्या जगात जगत असतो तोपर्यंत आपण त्या जगाचे प्रवासीच असतो. नंतर त्या जगाशी संपर्क तुटला तरी इथे त्याच्या आयुष्याच्या स्मृती जपून ठेवल्या जातात.”
तिने एका पुस्तकाची पाने उलटली.
त्याच्या डोळ्यांसमोर दिसू लागलं. एक लहान मुलगा,घराच्या अंगणात खेळतोय. फुललेला पळस; आईचा केसांना येणारा फुलांचा सुगंध, बाबा हात धरून शाळेच्या पहिल्या दिवशी घेऊन त्याला जातायत.हे इतकं अचूक कसं लिहीलय.
सिद्धार्थचे डोळे पाणावले.
“हे हे सगळं मला का नाही आठवत?”
“कारण तुला कधीतरी कुठेतरी ‘निवड’ करायला भाग पाडलं गेलं असेल म्हणून तुला आठवत नाही. तुझ्या काही स्मृती इथे अडकून राहिल्या.”
“नीट सांग.”
सिद्धार्थ त्या तरुणीला म्हणाला.
“हे ‘जग’ प्रवाश्यांना पूर्णत्वाचा भास देतं. जिथे तू अपूर्ण आहेस, तिथे तुला ओळख मिळते. तू दररोज रात्री जेव्हा झोपतोस, तेव्हा तुझं चेतन इथे येऊन आपलं काम पूर्ण करतो.. पण पूर्णत्व म्हणजे निवड. कोणत्या जगाची? दोन्ही जगाची नाही.”
तो थबकला.
“मग तू? तुझं माझ्याशी नातं काय?”
ती थोडा वेळ शांत राहिली.
“मी तुझ्या ‘स्मृतींची वाहक’ आहे. तुझ्या लहानपणीच्या आठवणी, तुझ्या पहिल्या पुरस्काराचा अभिमान, तुझ्या पहिल्या जखमेची टोचणी. मी ते सगळं जिवंत ठेवते इथे ग्रंथालयात. तू मला म्हणूनच ओळखतोस नावाशिवाय.”
ग्रंथालयाबाहेर जोराचा वारा सुटला. भवतालून किर्र आवाज ऐकू येऊ लागले. शेल्फमधील पुस्तकांची पाने आपोआप उलटायला लागली. एका पानावर धूसर आकृती चमकली.
‘निवडीचा शिक्कामोर्तब.’
“हे चिन्ह”
सिद्धार्थने खिशातून ते चिन्हरूपी धातूचं कडं दाखवलं.
ती मान हलवून म्हणाली ,
“ज्याच्याकडे हे असतं, त्याच्या निवडीची वेळ जवळ येते.”
लॅबमध्ये त्याच वेळी रावांनी मॉनिटर्सवरून नजर हटवली नाही.
“सिद्धार्थचच्यापण पॅटर्न ‘कॉग्निटिव रीकॉल’कडे झुकतोय. कदाचित तो काही जिवंत आठवणी पाहतोय.”
सहाय्यक घाबरून म्हणाला,
“सर, एच आर व्हि ‘खाली जातोय.”
“फायटो स्टिम कमी करा. आपण थोडा वेळ देऊया. जर त्याने काही निवडलं, तर आपल्याला परत खेचण्यासाठी विंडो उघडी ठेवावी लागेल.”
ग्रंथालयात तिने सिद्धार्थचा हात धरला. त्या हाताचा स्पर्श सिद्धार्थला उबदार वाटला.
“तू मला सोडून गेलास तर मी थांबेन. इथे. तुझी वाट पहात. पण जर इथे राहिलास तर तुझ्या वास्तवातील आईचा, मित्रांचा, अपूर्ण कामांचा सगळ्यांचा धागा तुटेल.”
तो खजील झाला.
“मग योग्य काय?”
.
“योग्य असणं नेहमीच आपल्याला हवं तसंच नसतं.”
तिच्या डोळ्यांत पाणी आलं.
“पण सत्य तेच. तुझ्या अपूर्णतेला सामोरं जाणं म्हणजे खरं जग. इथे तू नायक आहेस, तिथे तू मानव आहेस.”
तेवढ्यात कपाटाच्या कप्प्यात एक घंटा आपोआप वाजली. धातूच्या खेड्यातली एक क्षण थरथर काढली. सिद्धार्थला आश्चर्य वाटलं.
ती घाई घाईने म्हणाली,
“वेळ संपतोय. चौथ्य. दिवशी लॅकेससच्या दाराशी ये. शहराच्या काठाशी. तिथे अंतिम रस्ता फुटतो.”
( लॅकेसस हा ग्रीक शब्द आहे. लॅकेसीस म्हणजे आयुष्याची लांबी ठरवणारी देवता असा अर्थ आहे.)
“तू येशील?”
सिद्धार्थ तिला विचारलं.
“मी तिथेच असते,”
ती हसली, “तुझ्या आठवणींसारखी.”
ग्रंथालयाचं दार बंद झालं. धुळीचा गंध विरळ होत चालला होता.
सिद्धार्थने डोळे मिटले आणि त्याला लॅबची थंडगार हवा-पुन्हा जाणवली.
“काय पाहिलंस?”
रावांनी विचारलं.
सिद्धार्थने उत्तर दिलं नाही. त्याने केवळ ते धातूचं कडं मुठीत घट्ट पकडलं.
—-----
चौथ्या दिवशी सिद्धार्थ पुन्हा त्या जगात गेला. शहराच्या कडेला लॅकेससचं दार होतं. आकाराने प्राचीन, पाषाणावर कोरलेलं नक्षी. दाराच्या पलीकडे धुक्याची पायवाट.
ती तेथे आधीपासून उभी होती. आज तिच्या चेहऱ्यावर शांतभाव होते.
“तू आलास. याचा अर्थ तू अजून तुझं जग निवडलेलं नाहीस.”
“मी निवड करायला आलोय,”
सिद्धार्थ म्हणाला, पण त्याच्या आवाजात थरथर होती.
तीने पायवाटेकडे इशारा केला.
“ही पायवाट दोन भागांत फुटते. डावीकडची पायवाट इथल्या जगात जाते. इथे तू नायक. तुझ्या स्मृती पूर्ण सुरक्षित आहेत. तुझी कथा शास्त्राच्या पलीकडली भासते.
उजवीकडची पायवाट तुझं वास्तव आहे. तिथे तुझ्या वेदना, तुझी अपूर्णता, आहे तिथे तू खरा आहेस.”
“आणि तू?”
“मी तुझ्या आठवणींचा प्रकाश. तू ज्या जगात जाशील, तिथल्या तुझ्या स्मृती मी सांभाळेन. पण एक जग निवडलंस की दुसऱ्या जगातील मी फक्त सावली उरेन.”
लॅबमध्ये रावांनी शेवटच्या टप्प्याची तयारी केली.
“तो ‘डिसिजन थ्रेशोल्ड’कडे जातोय. जर त्याने वास्तव निवडलं तर ‘क्रॉस-लिंक’ कायमची तोडावी लागेल—नाहीतर परत-परत खेचलं जाईल.”
डाॅक्टर राव म्हणाले.
“सर, हे धोकादायक आहे.”
“हो. पण त्याच्यासाठी आवश्यक गोष्टी तयार ठेवल्या आहेत.”
मानवी पायवाटेच्या उंबरठ्यावर सिद्धार्थ थांबला. डावीकडे ऊन, उजवीकडे ढग. उजवीकडे तिचीच लांबलचक, लांबट सावली.
“तू माझ्यासोबत आलीस तर?”
त्याने लहान मुलासारखा निरागस प्रश्न विचारला.
ती हलकीशी हसली.
“मी कुठेच तुझ्या सोबत’ नाही येऊ शकत. मी तुझ्यात आहे, तुझ्या आठवणीत आहे. जिथे तू, तिथे मी. पण दोन ठिकाणी नाही.”
त्याने खिशातून ते धातूचं कडं काढलं.
आज ते गार होतं. यि आधी असं झालं नव्हतं.
“जर मी इथेच थांबलो तर?”
“मग तुझं वास्तव संपेल.तुझ्या आईचे बोल धूसर होणार, मित्रांचा आवाज, कामांचा मिळणारा आनंद तुला मिळणार नाही. तुझे कुटुंब तुझ्या पासून दुरावेल. चालेल तुला?”
“ नाही. मला माझ्या वास्तव जगातचं राह्यला आवडेल.”
तीचे डोळे चमकले. “मग निर्णय झाला.”
तेवढ्यात दूरवरून लंबकासारखा आवाज आला वेळ सांगणारा. दाराच्या वरच्या शिळेवरची नक्षी जिवंत होऊन हलली. पायवाटेच्या दोन्ही दिशांनी किर्र आवाज येऊ लागले.
“जा,”
ती म्हणाली, “वास्तव जगात परत जा पण लक्षात ठेव मी पूर्ण नाहीशी होणार नाही. कधी कधी तुला माझं अस्तित्व सावलीसारखं जाणवेल तेव्हा घाबरू नकोस. फक्त लांब श्वास घे.”
लॅबमध्ये डाॅक्टर राव यांनी स्विच ओढला.
“क्रॉस-लिंक सीव्हर ऑन.”
मॉनिटर्सवर चमचमता रेषां ऊमटल्या.आणि अचानक सरळ झाल्या. बी——प… बी——प… स्थिर.
“सिद्धार्थ, तुला ऐकू येतंय?”
रावांचा आवाज इंटरकॉममध्ये.
“जर परत यायचं असेल तर आताच.”
पायवाटेवर सिद्धार्थ मागे वळून पाहतो. ती काही पावलं दूर उभी असते. हसतानाच डोळ्यांच्या कडांना पाणी येत.
“तुझं नाव?”
तो पुन्हा एकदा विचारतो.
ती मान हलवते.
“ज्याचं उत्तर तू स्वतः दिलंस ‘मानवी असणं’.”
“मी विसरणार नाही.”
“विसरावंसं म्हणून नाही जगावंसं म्हणून सांगीतलं.”
त्याने उजव्या मार्गावर पाऊल ठेवलं. धुकं कमी झालं. रस्त्यावर शांतता वाटत होती. कुठलेही आवाज नव्हते हळूहळू त्या पाऊलवाटे वरून सिद्धार्थ वास्तवात परत यायला लागला.
.लॅबमध्ये त्याचे डोळे हळूच उघडले. छतावरील लाईट्स थोडे झगमगले. त्याचा थकलेला, पण शांत चेहरा होता.
डाॅक्टर राव पुढे आले.
“परतलास.”
सिद्धार्थ हलकेच मान डोलावतो. त्याच्या मुठीतील कड्याचे तुटून दोन तुकडे झाले होते.
“आता?” त्याने विचारलं.
डाॅक्टर राव म्हणाले ,
“आता अंतिम टप्पा. लिंक कायमची तोडावी लागेल. एकदा ती लिंक तुटली की त्या जगात तुला नेणं बंद होईल.”
“पूर्ण करा तो अंतिम टप्पा .”
सिद्धार्थचा आवाज स्थिर होता.
रावांनी कन्सोलवर शेवटचा सिक्वेन्स एंटर केला. खोलीत निळसर प्रकाश पसरला आणि मंदावला.
मॉनिटर्सवर
‘पोर्टल इनॲक्टीव्ह’
असा संदेश आला.
सिद्धार्थने दिर्घ श्वास घेतला.
त्याने डोळे मिटून स्मित केलं.
—-
डॉ. राव त्याच्या जवळ आले.
“सिद्धार्थ, अभिनंदन. तू परत आलास. आणि आता तुझा समांतर जगाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे.”
सिद्धार्थने विचारलं,
“म्हणजे… आता मला पुन्हा असं स्वप्न पडणार नाही?”
डॉ. रावांनी नकारार्थी मान हलवली.
“नाही. तुझा मेंदू आता स्थिर झाला आहे. तुला कधीही तिथे खेचलं जाणार नाही. पण…”
सिद्धार्थने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.
डॉक्टर गंभीरपणे म्हणाले—
“त्या जगातल्या काही धूसर छटा… काही वेळा तुला जाणवतील. कधी जागेपणी सावल्यांसारख्या, कधी स्वप्नांच्या तुकड्यांसारख्या. ते आठवणींसारखं असेल. त्यांना तू थांबवू शकणार नाहीस. पण त्यांना सहन करावं लागेल.”
सिद्धार्थ काही क्षण शांत बसला.
त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
“काही हरकत नाही डॉक्टर. खऱ्या जगातलं दुःखही माझंच… आणि आनंदही माझाच. आता मला कुठल्या खोट्या जगाची गरज नाही.”
लॅबमध्ये शांतता पसरली. मशीनचे दिवे बंद झाले.
सिद्धार्थ हळूहळू उठून खिडकीतून बाहेर पाहू लागला. बाहेरचा सकाळचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला होता.
आता तो परत आला होता.
एकाच जगात. आपल्या खऱ्या जगात.
—-----------------------------------
कथा समाप्त
या कथेत EEG, Theta–Gamma लहरी, High-density EEG यांसारख्या काही संज्ञा प्रत्यक्ष विज्ञानात अस्तित्वात आहेत. मात्र त्यांचे परिणाम, ‘Cross-over event’ वा स्वप्नातील वस्तू वास्तवात येणे हे पूर्णपणे कल्पनारम्य आहे. याचा वास्तविक वैद्यकीय उपचार वा वैज्ञानिक पुराव्याशी संबंध नाही. ही कथा केवळ काल्पनिक विज्ञानकथा म्हणूनच अनुभवावी.”
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा