Login

समर्पण-एक प्रेमकथा भाग १०८

एक अनोखी प्रेमकथा
समर्पण-एक प्रेमकथा भाग १०८

मागील भागाचा सारांश: केतकीने नीरजाला तिची व कुणालची लव्हस्टोरी सांगितली तसेच कुणालचे आई-वडील तिला भेटायला येणार असल्याचेही सांगितले. नीरजाने आग्रह केल्याने केतकीने तिच्या आईला फोन लावला, पण तिकडून पुन्हा फोन करू नकोस अस सांगण्यात आलं.

आता बघूया पुढे….

नीरजा व केतकीने गप्पा मारता मारता जेवण केलं.

“नीरजा, उद्या कुणालच्या आई-वडिलांना भेटायला तू येशील ना?” केतकीने विचारले.

“ते घरी येणार आहेत का?” नीरजाने प्रतिप्रश्न केला.

“बहुतेक तरी नाही. बाहेर हॉटेलमध्ये भेटू अस कुणाल बोलत होता.” केतकीने उत्तर दिले.

“मला कुणालला भेटायचं आहेच, नीरवचा काही प्लॅन नसेल तर त्याच्या आई वडिलांना भेटायला येईल.” नीरजा म्हणाली.

“तुमचं फिरायचं काही प्लॅनिंग ठरलं आहे का?” केतकी.

“माहीत नाही. एक डॉ कामिनी म्हणून आहेत त्यांना आज संध्याकाळी भेटायचं आहे.” नीरजा.

“ओके. नीरव कधी येणार आहेत?” केतकी.

“आपल्या गप्पा झाल्यावर त्यांना मॅसेज केला होता. काही वेळात येतीलच.” नीरजाच्या चेहऱ्यावर स्माईल आली होती.

“ओहो! नीरवला भेटायला एक मुलगी खूपच आतुर झालेली दिसतेय.” केतकी मिश्किल हसून म्हणाली.

नीरजा गालातल्या गालात हसून म्हणाली,
“माहीत नाही का, पण त्यांना भेटायला मन अधीर झालंय.”

“इसीको प्यार कहते हैं.” केतकी बोलत असतानाच नीरजाला नीरवचा फोन आला.

फोनवर बोलून झाल्यावर नीरजा म्हणाली,
“केतकी, नीरव खाली माझी वाट बघत आहेत. मी जाते.”

“हो चालेल. मला उद्याचं कळवशील.” केतकीने नीरजाला मिठी मारली.

नीरजा लिफ्ट मधून खाली गेली. नीरव कॅब घेऊन तिची वाट बघत होता. नीरजा कॅब मध्ये जाऊन बसल्यावर नीरवही कॅबमध्ये बसला व त्यांची कॅब हॉटेलच्या दिशेने निघाली.

“इतक्या दिवसांनी मैत्रिणीला भेटून कसं वाटलं?” नीरव बोलता बोलता नीरजा जवळ सरकला होता.

“एकदम भारी.” नीरजाच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.

“तुझ्या चेहऱ्यावरून ते समजत आहेच.” नीरवने हळूच नीरजाचा हात हातात घेतला होता.

नीरजा खाली मान घालून लाजत होती. नीरवने आपला हात स्वतःहून हातात घ्यावं अस तिला कधीपासून वाटत होतं. आज तिचं ते स्वप्न पूर्ण झालं होतं.

“मित्राशी भेटलात का?” नीरजाने नीरवकडे न बघताच विचारले.

“हो. तो खूपच बिजी असतो, तर जास्तवेळ बोलता आल नाही. तसही मला त्याच हॉस्पिटल मॅनेजमेंट समजून घ्यायच होतं. ते काम झालं.” नीरव व त्याच्या मित्रामध्ये ज्या गप्पा झाल्या त्या त्याने तिला सांगितल्या.

गप्पा मारता नीरव व नीरजा हॉटेल जवळ पोहोचले होते. कॅब मधून नीरव आधी उतरला, मग त्याने नीरजाला हात दिला, मग ती बाहेर आली. हॉटेलमध्ये प्रवेश करतानाही नीरवने तिचा हात सोडला नव्हता.

रूम जवळ गेल्यावर नीरवने तिचा हात सोडून आपल्या कडील चावीने दरवाजा उघडला व तिला आत जाण्यास सांगितले. नीरजा आत गेली व समोरील दृश्य बघून बघतच राहिली.

संपूर्ण रूम हार्ट शेपच्या लाल फुग्यांनी सजवलेली होती. बेडवर गुलाबाच्या पाकळ्यांनी हार्ट काढलेलं होतं. साईडच्या टेबलवर मंद सुवासिक मेणबत्त्या पेटलेल्या होत्या. समोर भिंतीवर आय लव्ह यू नीरजा अस लिहिलेलं होतं. नीरजा समोर बघत असतानाच नीरव तिच्यासमोर येऊन गुडघ्यावर बसला व त्याने आपल्या खिशातून अंगठीचा बॉक्स तिच्या समोर धरला.

“आय लव्ह यू नीरजा. आयुष्यभर मला अशीच साथ देशील.”

नीरजाने आपला हात त्याच्या पुढे केला. नीरवने आपल्या कडील अंगठी तिच्या बोटात घातली. नीरव उभा राहिल्या बरोबर नीरजाने त्याला मिठी मारली. नीरजा रडत होती. तो तिच्या केसातून हात फिरवत होता. नीरजाने त्याच्या भोवतीची मिठी अजून घट्ट केली.

नीरजाच्या डोळ्यातील पाणी तिने या क्षणाची किती वाट पाहिली होती, याची साक्ष देत होते. नीरवने तिला मिठीतून हळूच बाजूला केले व तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. नीरजाच्या डोळ्यातील पाणी त्याने पुसले. नीरवच्या एकेक स्पर्शाने ती मोहरून निघाली होती. तिचे गाल लाजून लाल झाले होते.

नीरव व नीरजा बेडवर बसले. नीरजा नीरवने दिलेल्या अंगठी कडे बघून म्हणाली,

“नीरव, ही हिऱ्याची अंगठी आहे. इतकी महाग अंगठी कशाला घेतलीत?”

“नीरजा, हिऱ्यासारखी मुलगी माझ्या आयुष्यात आली आहे, तर तिला हिऱ्याची अंगठी नको का.” नीरवने नीरजाला पुन्हा जवळ घेतले. दोघेजण बेडवर पाठ टेकवून एकमेकांच्या कुशीत बसले होते.

“नीरजा, मी जरा जास्तच उशीर केला ना?” नीरव म्हणाला.

“ हं आता त्याबाबतीत मी जास्त हुशार आहे ना.” नीरजा हसून म्हणाली.

“मी खरंच प्रेमाच्या बाबतीत जरा जास्तच मंद आहे. मला तू खूप आधीपासूनच आवडायला लागली होती, पण ते प्रेम होते की आकर्षण हे मला कळत नव्हते. तू माझ्यासाठी किती परफेक्ट आहे, हे सगळ्यानी सांगण्याचा प्रयत्न केला, पण मी काही कोणाचे ऐकले नाही.” नीरव.

“असो, आता जे झालं त्याचा विचार करायचा नाही. आता आपण एकमेकांच्या प्रेमात आहोत हेच खरं आहे आणि आपण शेवटच्या श्वासापर्यंत असच सोबत रहायचं आहे.” नीरजा.

“हो. आता मी तुला कधीच अंतर देणार नाही. नीरजा, तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही. तू माझ्यासोबत नसणं हे मी इमॅजिन करू शकत नाही.” नीरव बोलताना इमोशनल झाला होता.

नीरवची हनुवटी आपल्या हातात घेऊन नीरजा म्हणाली,
“नीरव, मी कायम तुमच्या जवळच राहणार आहे.”

“आपण दोघांना एकत्र आलेलं बघून दोन्ही आयांना व मुक्ताला खूप आनंद होईल ना.” नीरव.

“हो मग. त्यांच्यासाठी हे मोठं सरप्राईज असेल.” नीरजा.

नीरव व नीरजा बोलत असतानाच नीरवचा फोन वाजला. फोनवर बोलून झाल्यावर नीरव म्हणाला,

“नीरजा, डॉ कामिनीचा फोन होता. पुढील तासाभरात ती आपल्याला इथेच भेटायला येणार आहे.”


“ओके. बर होईल त्यांच्या कडून डॉ गौरवचं सत्य तरी आपल्याला कळेल.” नीरजा.

“मला एक सांग. डॉ स्नेहा गौरवच्या प्रेमात पडली असेल असं तुला वाटत का?” नीरवला प्रश्न पडला होता.

“हो. तिच्या बोलण्यावरून, वागण्यावरून तरी तेच वाटतंय.” नीरजाने उत्तर दिले.

“केतकीच्या आयुष्यात कोण आलंय?” नीरव.

“कुणाल नावाचा तिचा मित्र आहे. तोही महाराष्ट्रीयन आहे. उद्या त्याचे आई वडील तिला भेटायला इकडे येणार आहेत. केतकी म्हणत होती की, त्यांना भेटताना मी तिच्यासोबत असावं असं.” नीरजा.

“तिची इच्छा आहे तर काही वेळेसाठी आपण दोघेही त्यांच्यासोबत जाऊ. तिला वेळ आणि ठिकाण विचारून घे, त्यानुसार आपण आपलं फिरण्याचं प्लॅनिंग करूयात. परवा पहाटे आपली फ्लाईट आहे. बंगलोरला आलो आहोत, तर थोडतरी बाहेर फिरुयात.” नीरव.

“मला केतकीला भेटता यावं म्हणून तुम्ही हे सगळं प्लॅन केलं?” नीरजाने विचारले.

“हो आणि आपल्या दोघांनाही मोकळा वेळ मिळावा म्हणून. तिकडे पुण्यात आपण आपल्या कामांमध्ये इतके बिजी असायचो की असा निवांत वेळ कधीच मिळत नव्हता. शिवाय मला तुला अस प्रपोज करायचं होतं की, ते तुझ्या कायम लक्षात राहील.” नीरव.

नीरजाने त्याला घट्ट मिठी मारली व ती ‘थँक् यू’ अस म्हणाली.

“थँक् यू काय त्यात. इट्स माय प्लेझर. मला आयुष्यातील प्रत्येक क्षण तुझ्यासोबत असाच स्पेशल जगायचा आहे.” नीरव.

वाचक मित्र मैत्रिणींना माझा नमस्कार, नीरजा जशी नीरवच्या तिच्याकडे प्रेम व्यक्त करण्याची वाट बघत होती, तशीच तुम्हीही नीरव व नीरजा एकत्र येण्याची वाट बघत होते. नीरजा प्रमाणे तुम्ही सगळेजण खुश झाला असालच.

आपली ही कथा आता शेवटाकडे आहे. काही भागातच ही कथा संपणार आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? हे कमेंट करून नक्की कळवा.