समर्पण-एक प्रेमकथा भाग ११० (अंतिम)
मागील भागाचा सारांश: डॉ कामिनीने गौरव बद्दल सगळं काही खरं नीरव व नीरजाला सांगितले. दोघांनाही ते ऐकून शॉक बसला.
आता बघूया पुढे….
नीरजाला जाग आली तेव्हा तिने बाजूला नीरवला झोपलेलं बघितलं. नीरवला इतकं आपल्या जवळ बघून तिला कालची रात्र आठवली आणि ती लाजली.
‘नीरव, आता खऱ्या अर्थाने आपल्या नात्याला सुरुवात झाली आहे. इतक्या दिवसापासून ज्या क्षणाची वाट मी बघत होते, तो क्षण अखेर माझ्यासमोर येऊन ठेपला, हे मला खरंच वाटत नाहीये.’
नीरजा पुढील कितीतरी वेळ नीरवला न्याहाळत होती. मोबाईल हातात घेतल्यावर तिने नेट चालू केले, तर केतकीचा मॅसेज आलेला होता. कुणाल व त्याचे आई वडील कुठे भेटणार आहेत, याचा पत्ता व वेळ तिने मॅसेज केलेली होती.
नीरजाने नीरवला उठवले. दोघेजण रेडी झाले, नाश्ता करून ते बाहेर फिरायला गेले. नीरव व नीरजा एकमेकांसोबत खूप फोटो काढत होते. एकमेकांसोबत ते क्वालिटी टाईम घालवत होते. केतकी सोबत लंचला भेटायचे असल्याने नीरव व नीरजा कॅबमध्ये बसून हॉटेलच्या दिशेने निघाले होते. मोबाईल मधील फोटो बघत असताना नीरवच्या डोळ्यात पाणी आले होते, ते बघून नीरजा म्हणाली,
“नीरव, तुमच्या डोळ्यात पाणी का?”
“आपले फोटो बघून आले. मला असं वाटायचं की आपल्याकडे सगळं काही आहे, तरी काहीतरी कमी वाटते आहे, तर ती कमी तुझी होती.”
नीरजाने नीरवच्या डोळ्यातील पाणी पुसले व त्याच्या गालावर किस केले.
केतकी, कुणाल व त्याचे आई वडील आधीच हॉटेलला पोहोचलेले होते. नीरव व नीरजा ते बसलेल्या दिशेने गेले.
“काकू, तुम्ही?” कुणालच्या आईला बघून नीरजाला आश्चर्य वाटले होते.
“तुम्ही दोघे इकडे कसे?” कुणालच्या आई नीरव व नीरजाला बघून म्हणाल्या.
केतकी, कुणाल व कुणालचे वडील त्या तिघांकडे आश्चर्याने बघत होते.
“काकू, केतकी माझी मैत्रीण आहे. आम्ही दोघेजण बंगलोरला आलो होतोच, तर तिने आज कुणाल व तुम्हाला भेटायला आम्हाला बोलावलं.” नीरजा स्माईल देऊन म्हणाली.
“अच्छा. कुणाल माझाच मुलगा आहे.”
नीरवने सगळ्यांना स्माईल दिली.
“नीरजा, तू ह्यांना कशी ओळखतेस?” केतकीला प्रश्न पडला होता.
“रंजना काकू शालिनी आईंच्या मैत्रीण आहेत. त्या आमच्या घरी राहायला आल्या होत्या, तेव्हा आमची भेट झाली होती.” नीरजाने उत्तर दिले.
सगळ्यांची एकमेकांसोबत ओळख झाल्यावर सगळ्यांनी एकत्र बसून गप्पा मारता मारता जेवण केले. जेवण झाल्यावर नीरव व नीरजाने सगळ्यांचा निरोप घेतला.
तिकडून दोघेजण शॉपिंग करायला गेले. घरातील सगळ्यांसाठी नीरव व नीरजाने गिफ्ट्स घेतले. बंगलोर एक्सप्लोर करून संध्याकाळी नीरव व नीरजा हॉटेल वर पोहोचले.
“नीरव, मी जाम थकलेय. आता अजून पॅकिंग करायची आहे.” नीरजा बॅगमध्ये सामान भरत होती. नीरव काहीच बोलला नाही, म्हणून तिने त्याच्याकडे बघितले तर तो मोबाईल मध्ये बघण्यात मग्न होता व त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते.
“नीरव, काय झालंय?” नीरजाने त्याच्या जवळ जाऊन विचारले.
“गौरव व स्नेहाने रेजिग्नेशन लेटर मला मेल केलंय.”
“काय????” नीरजाला शॉक बसला होता.
“अस अचानक या दोघांनी जॉब का सोडला? गौरव सरांचं माहीत नाही, पण स्नेहाने मला न सांगता जॉब कसा सोडला?” आपला मोबाईल हातात घेत नीरजा बडबड करत होती.
नीरजाने नेट ऑन केले तर स्नेहाचा मॅसेज आलेला होता.
“नीरव सरांनी तुला माझ्या रेजिग्नेशन बद्दल सांगितलं असेलच. काल मी आणि गौरव सरांनी लग्न केलंय. तुझ्या मनात गौरव सरांबद्दल चांगल्या भावना नाहीयेत, याची कल्पना मला आहे. गौरव सर मला माझ्यासाठी योग्य वाटतात. मी पूर्णपणे विचार करून त्यांच्याशी लग्न केलं आहे, त्यांनी मला कोणत्याही प्रकारचा फोर्स केला नव्हता.
तुला मी गौरव सरांशी लग्न केलेलं आवडणार नाही, हे माहीत असल्यानेच मी हा जॉब आणि पुणे सोडून गौरव सरांसोबत दुसऱ्या एका नवीन शहरात आपलं आयुष्य सेट करायला चालले आहे. आपल्या दोघींची मैत्री एकदम खास होती. तुझ्यासोबत घालवलेले सगळे क्षण कायम लक्षात राहतील.
नशीबात असेल तर पुन्हा आपली भेट होईलच. स्वतःची काळजी घे. बाय.”
नीरजा मॅसेज वाचून बेडवर बसली. नीरजाला अस बघून नीरवने तिच्या हातातून मोबाईल घेतला व स्नेहाचा मॅसेज वाचला.
“नीरव, गौरव सर स्नेहासोबत काही चुकीच वागले तर…” नीरजाच्या डोळ्यात पाणी होते.
“नीरजा, हे बघ ती काही लहान नाहीये. समोरचा व्यक्ती आपल्याला फसवतो आहे की नाही हे तिला कळायला पाहिजे. एवढ्या तडकाफडकी त्याच्याशी लग्न करताना तिने विचार करायला हवा होता. लग्न केलं तर केलं आणि तो तिला घेऊन पुण्यातून निघून गेला व तिला हे पटलेही.
तू तिला वेळोवेळी अडवण्याचा प्रयत्न केला, पण तिने त्याच्यावर जास्त विश्वास ठेवला. आता आपण एकच करू शकतो, देवाकडे ही प्रार्थना करूयात की, देव गौरवला सुबुद्धी देवो आणि स्नेहासोबत सुखी आयुष्य जगू देत.” नीरवने नीरजाला समजावून सांगितले.
नीरवने रूममध्येच जेवण मागवले होते. नीरजाला स्नेहाची काळजी वाटत असल्याने तिला जेवण जात नव्हते. नीरवने स्वतःच्या हाताने तिला भरवले. पहाटे जायचं असल्याने दोघांनी मिळून बॅग भरल्या. नीरजा व नीरव बेडवर एकमेकांच्या हातात हात गुंफून बसले होते. नीरजाने आपली मान नीरवच्या खांद्यावर टेकवली होती.
“नीरव, आता घरी हे सगळं कसं सांगायचं?”
“काय सांगायचं? मला कळलं नाही.” नीरव.
“आपल्याबद्दल. उद्यापासून आपण एकाच रूममध्ये राहू ना.” नीरजा.
“ते होय, बघू. आता तू शांत झोप. उद्या लवकर उठायचं आहे. तुला विमानातून आकाश बघायचं आहे.” नीरव.
गप्पा मारता मारता दोघेजण झोपी गेले. पहाटे लवकर उठून ते हॉटेल मधून बाहेर पडून एअरपोर्टच्या दिशेने गेले. विमानात बसल्यावर नीरजाला आकाश बघायला मिळाले होते. लहान मुलाच्या चेहऱ्यावर जसा आनंद असतो, तसा आनंद तिच्या चेहऱ्यावर बघायला मिळाला होता.
विमान पुणे एअरपोर्ट वर उतरल्यावर आपलं सामान घेऊन नीरव व नीरजा बाहेर आले, तर शिवानी गाडी घेऊन त्या दोघांची वाट बघत होती. नीरव व नीरजा गाडीत बसून घराच्या दिशेने निघाले.
घरी पोहोचल्यावर घराचा दरवाजा बंद होता. बाहेर कोणीच नव्हते. एरवी यावेळी घराचा दरवाजा उघडा असतो, सरस्वती गार्डनमध्ये फुलं तोडत असते, पण आज अस काहीच नव्हतं, नीरजाला प्रश्न पडला होता. नीरजाने दरवाजा ढकलला. नीरव तिच्या बाजूलाच उभा होता.
संगिता आईच्या हातात आरतीचे ताट होते.
“तुम्ही मंदिरात चालल्या आहात का?” नीरजाने विचारले.
त्यांनी नकारार्थी मान हलवली.
“तुम्हाला दोघांना ओवाळण्यासाठी त्या ताट घेऊन उभ्या आहेत.” उंबरठ्यावर तांदळाचे माप ठेवत शालिनी आई म्हणाल्या.
“आई, हे सगळं काय आहे? मला समजलं नाही.” नीरजाच्या चेहऱ्यावर आश्चर्य होते.
नीरव तिचा हात हातात घेऊन म्हणाला,
“मागच्या वेळी जेव्हा तू गृहप्रवेश केला, तेव्हा मी तुझ्याशी आईच्या इच्छेखातर लग्न केले होते. घरात येतानाच तुला माझ्या आयुष्यात बायकोचे स्थान द्यायचे नाही हे ठरवले होते. पण आता मी तुला माझी बायको म्हणून घरात घेऊन जाणार आहे.
“मागच्या वेळी जेव्हा तू गृहप्रवेश केला, तेव्हा मी तुझ्याशी आईच्या इच्छेखातर लग्न केले होते. घरात येतानाच तुला माझ्या आयुष्यात बायकोचे स्थान द्यायचे नाही हे ठरवले होते. पण आता मी तुला माझी बायको म्हणून घरात घेऊन जाणार आहे.
काल रात्रीच मी मुक्ताला फोन करून ही सगळी अरेंजमेंट करून ठेवायला सांगितली होती. तुला सरप्राईज द्यायचे होते.”
नीरजाच्या डोळ्यात पाणी आले होते. संगिता आईंनी नीरजा व नीरवला ओवाळले. नीरजा माप ओलांडून घरात गेली. आज तिचा तिच्या सासरी पुन्हा गृहप्रवेश झाला होता. फक्त यावेळी नीरवचा हात धरून ती आत गेली. दोघांनी जोडीने शालिनी व संगिता आईच्या पाया पडून आशिर्वाद घेतला. मुक्ता हे सगळे क्षण कॅमेऱ्यात कैद करत होती.
नीरव व नीरजाला एकत्र बघून उपस्थित सर्वांच्या डोळ्यात पाणी आले होते.
समाप्त.
©® Dr Supriya dighe
( माझ्या या कथेला तुम्ही सर्वांनी जे भरभरून प्रेम दिले आहे, त्यासाठी सर्वांचे मनापासून आभार. आतापर्यंत लिहिलेल्या कथांमध्ये ही माझी सर्वात मोठी कथा आहे.
आता काही जणांना वाटत असेल की, कथा खूप घाईत आणि लवकर संपवली, पण नीरव व नीरजा एकत्र कसे येतात, हा प्रवासच मला या कथेत दाखवायचा होता आणि नीरव व नीरजा एकत्र आल्याने या ही कथा इथेच शेवट होते आहे.
तुम्हाला माझी ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा.
ही कथा जरी संपली असेल तरी इतर नवनवीन कथांमधून आपली भेट होतंच जाईल.
माझ्या लिखाणावर आपले प्रेम असेच राहुद्या. धन्यवाद)
आता काही जणांना वाटत असेल की, कथा खूप घाईत आणि लवकर संपवली, पण नीरव व नीरजा एकत्र कसे येतात, हा प्रवासच मला या कथेत दाखवायचा होता आणि नीरव व नीरजा एकत्र आल्याने या ही कथा इथेच शेवट होते आहे.
तुम्हाला माझी ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा.
ही कथा जरी संपली असेल तरी इतर नवनवीन कथांमधून आपली भेट होतंच जाईल.
माझ्या लिखाणावर आपले प्रेम असेच राहुद्या. धन्यवाद)