Login

संबंध सेतू नेहा उजाळे मॅडम आणि माझे ऋणानुबंध

Sambandh Setu Neha Ujale And Bhagyashri Sambare
नवीन ओळख.. जणू जुने ऋणानुबंध..
संबंध सेतू.


टिम महेश 5 नंबर गृप मध्ये माझी नवीन ओळख झाली नेहा उमेश उजाळे मॅडमशी.. निमित्त ईरा. ब्लॉगिंग ची चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 स्पर्धा. आम्ही एका टिम मध्ये आलो आणि नेहा मॅडम नी स्वतःहून जवाबदारी घेतली ती सगळ्याचे पोस्ट करण्याआधी व्याकरण वगैरे चूका सुधारणा करून देण्याची. माझ्या पोस्ट मी यांना पाठवणार सुधारणा झाली की ईरा वर पोस्ट टाकणार. मोठ्या जवाबदारीने त्यांनी कार्य पार पाडले. मला खरचं कौतुक वाटायचे त्यांचे.


दुसरा प्रसंग कविता प्रेम टायटल मी लिहिली. आवाज रेकॉर्ड नेहा मॅडमनी केला त्यांच्या आवाजात कविता सादर केली आणि तो व्हिडीओ तयार आमच्या टिमचे कॅप्टन महेश सर यांनी केला आमचे टिम वर्क छानच जुळून आले.नेहा मॅडम मदतीला पुढे असतात. हे दोन प्रसंगातून कळले असेल अशा गोड स्वभावाच्या नेहा मॅडम.


नेहा मॅडम आणि मी लेखणी च्या मुळे ईराच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एकत्र आलो पण हळूहळू छानच बंध जोडले गेले. आपल्या नेहा मॅडम स्वयंपाकात सुगरण आहे शिरा प्रसादाचा खूपच छान करतात असे ऐकून आहे. लेखणी छानच आहे. नवीन विचार लिखाणात दिसून येतात. जून्या रूढी आणि अंधश्रद्धांचा विरोधी आहे दिसून येते.

नेहा मॅडम सोबत स्नेह जुळून आला नवीन ओळख ईरा मुळे झाली. यानिमित्ताने ईराचे आभार मानले पाहिजेत. ईराने स्पर्धेच्या निमित्ताने नवीन मैत्री मला गिफ्ट दिली आहे. नवी मैत्री म्हणू की जूने ऋणानुबंध.... की चॅम्पियन ट्रॉफी निकाल जाहीर होईल तेव्हा ट्रॉफी तर घेऊच पण निकालाआधी ईरानी नवीन मैत्री दिली धन्यवाद ईरा....


नेहा मॅडमचे सासर आणि माहेर दोन्ही ठाणे मुंबईचे.. नेहा मॅडम ना एकच मुलगी आहे चैत्रा नावाची ती उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर नोकरी करत आहे. नेहा मॅडमचा जन्म 17 मे 1969. सॉरी मॅडम जन्म वर्ष टाकले. लपवण्यासारखे वय वाटत नाही तुमचे.... आडनावासारखा उजळलेला चेहरा आहे त्यांचा नेहा मॅडमनी बीए मराठी साहित्यात केले आहे. नेहा मॅडम सासरी खूपच मोठ्या एकत्र कुटुंबात राहिल्या. अनेक गोष्टीना हसत खेळत तोंड देत आल्या.


मैत्री होण्यासाठी, बंध जुळून येण्यासाठी सारखे काही गुण जुळून यावे लागतात. .आमचे गुण गप्पा मारायला, बडबड करायला आम्हाला दोघींना आवडते आणि मैत्री करायला आवडते. नेहा मॅडम आणि मी दोघींना लिखाणात आवड.... याच मुळे आमच गुळपीठ जुळून आले.. मौज मज्जा करायला, फिरायला आवडते नेहा मॅडम ना.. माझ्या सारखेच.. "सलामत रहे दोस्ताना हमारा.."



नेहा मॅडम आपली मैत्री, बंध ऋणानुबंध असेच फुलो, फळो, बहरो... तुमचे लिखाण बहरो तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा....