संभ्रम

संभ्रम
नाटक : राधिकाचा संभ्रम

पात्र परिचय :

राधिका : एक दहावीची विद्यार्थिनी, ती हुशार आहे पण सध्या तणावात आहे.

आई : राधिकाची आई, ती राधिकेच्या भविष्याबद्दल खूप चिंतित आहे.

वडील : राधिकाचे वडील, ते राधिकेवर प्रेम करतात पण त्यांच्याकडूनही उच्च अपेक्षा आहेत.

सोनिया : राधिकाची मैत्रीण, ती सतत मार्क्स आणि करिअरबद्दल बोलते.

दृश्य १: राधिकाचे खोली

(राधिका टेबलावर बसून पुस्तक उघडते, पण तिचे मन कुठेच लागत नाही. ती खिडकीतून बाहेर पाहते.)

राधिका: (स्वतःशी बोलत)

पुस्तके, परीक्षा, मार्क्स, ग्रेड ,हे सगळे कधी संपणार? मला काय करावे ते कळत नाही.! आई बाबा तर गंभीर राव झाले आहेत. घराचं वातातवण अगदी लायब्ररी सारखं पिन ड्रॉप सायलेन्स सारखं वाटतं. आई बाबा माझे मित्र मैत्रिण कमी स्ट्रिक टीचर वाटतात. मी खूप फ्रस्टरेट झाली आहे का !

ती स्वतः ला प्रश्न विचारत होती.?

(दरवाजा ठोठावला जातो. आई आत येते.)

आई: राधिका, यंदा तुझी दहावीची परीक्षा आहे ना!. तू अभ्यास करत आहेस ना?

राधिका: (मन मोकळे करत) आई, मला खूप टेन्शन आलं आहे.सगळीकडे फक्त मार्क्स, मार्क्स आणि मार्क्सच. मला काय करायचे आहे हे मलाच कळत नाही. ( राधिका आईला मिठी मारते.)

आई: काय झालं बाळा ? परीक्षेचं टेन्शन आलं आहे.

राधिका : हम्म्म,

आई: राधा, तुझ स्वप्न आहे ना डॉक्टर बनायच आहे. तू अभ्यासा कडे लक्ष दे. बाकीच बघायला आम्ही आहोत. आता तर खरी सुरवात झाली आहे आयुष्याला!

राधिका : हो आई

आई: राधा तुला चांगले मार्क मिळाले तर नक्कीच गर्व्हरमेंट कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळेल. स्कॉरशिप शिप पण मिळेल.

राधिका: आई मला कमी मार्क पडले तर. ( पुढं काय बोलायचं ते विसरते आईचा चेहरा बघून विसरून जाते )

आई : असे कसे मार्क कमी पडतील, तू इतका अभ्यास करत आहे, मेहनत करत आहेस, मग मार्क कमी पडतील कसे, अजुन सहा महिने आहेत. शाळेत चाचणी परीक्षा झाली तेव्हा किती छान मार्क मिळाले.

राधिका : हो आई

आई : तूझ्या जितक्या अपेक्षा स्वतः कडून आहेत, तितक्याच आमच्या पण आहेत राधा, जेंव्हा पासुन तू सांगितल होत, तुला मेडिकल करायचं आहे, आम्हाला किती आनंद झाला होता, तुला सांगू! आमचा तुझ्यावर विश्वास आहे, तू नक्की तुझ आमचं स्वप्न पुर्ण करणारं.

राधिका : हो आई .

आई : राधिका, मला तुझ्या बाबांना तुला खूप शिकवायच आहे. तुला डॉक्टर बनवायचे आहे. त्यासाठी ते खूप मेहनत करत आहेत.तुला भविष्यात पैशाची कमतरता येऊ नये म्हणून पैसे साठवत आहेत बाळा.मला माहीत आहे तुला याची जाणीव आहे. हे समजत आम्हाला बाळा. तू आमचं स्वप्न पूर्ण करणारं आहेस. तू फक्त तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे.

(राधिका शांतपणे डोके खाली घालते.)

आईशी बोलून तिला अभ्यासाच अधिकच टेन्शन आलं होतं. आई वडील तिच डॉक्टर बनण्याच स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट घेत आहेत. हेचं आईनं सांगितलं. त्याचंच दडपण आलं.

दृश्य २:

शाळेत मध्ये मधल्या सुट्टीत त्या दोघी बोलत होत्या, तेंव्हा त्यांच्यातील बोलणं.

(राधिका आणि तिचे क्लास फ्रेंड्स कॅन्टीनमध्ये बसून डबा खात बोलतात .)

सोनिया: राधिका, कोणत साईड निवडणार आहे? कशात करिअर करणार आहेस? मी तर इंजिनियर बनणार आहे.

स्मृती: मी कॉमर्स करणार आहे. मला सी एस किंवा सी ए करायचं आहे.

नित्या : मी आता युनिट टेस्ट मध्ये मार्क कमी मिळाले आहेत. घरी आई बाबा खुप ओरडले. नव्वद टक्के मार्क मिळाले नाही तर ऍडमिशन मिळणार नाही. चांगल्या कॉलेज मध्ये. आता अभ्यास करायचा स्पीड वाढवला पाहिजे. घरच्यांच्या माझ्याकडुन खुप अपेक्षा आहेत ग!

आशूतोष: मला तर ग्रॅज्युएशन साठी अब्रॉड जायचं आहे. माझा दादा शिक्षण झाल्यावर जॉब साठी फॉरेनला गेला आहे. मला तर ग्रॅज्युएशन साठी जायचं आहे.

ऋषभ : मी आय आय टी ची तयारी करणार आहे. मला दीदी सारखं चेन्नईला शिकायला जायचं आहे. तिला आता शिक्षण पुर्ण झाल्यावर चांगल पॅकेज मिळालं आहे. आई तर सतत सांगत असते, दीदी कडून शिक काहीतरी.

सोनिया: राधिका तु पण नीट ची तयारी करणार आहेस ना ? तुला डॉक्टर बनायचं आहे ना! तु तर युनिट टेस्ट मध्ये पण टॉप केलं आहे.

राधिका: मला माहीत नाही सोनिया. मला डॉक्टर बनवायचे आहे असे नाही. आता युनिट टेस्ट होती. पोर्शन कमी होता. आणि टॉप नाही केलं हा मला नाइटी पर्सेंट मिळाले तरी मला तिसरा रँक मिळाला आहे.

सोनिया: पण तुझ्या आई-वडिलांना काय वाटेल? त्यांना तुला डॉक्टर बनलेल बघायचं आहे. तुला थर्ड रँक मिळाला म्हणून काही बोलले का ?

राधिका: बोलले नाही.पण मला माझ्या आई वडिलांच्या माझ्याकडुन असलेल्या अपेक्षा बघुन टेन्शन येत आहे. या टेस्ट रिझल्ट बघुन टेन्शन वाढत आहे.

मी काय करू ?  मला कळत नाही आहे. मला डॉक्टर बनायचं आहे का नाही ते ! मला इतका अभ्यास झेपेल का ? आता देखील इतका अभ्यास केला होता , पण थर्ड रँक मिळाला आहे.

सोनिया : होईल ग सगळं, तू फक्त अभ्यास करण्यावर भर दे. चल आता युनिट टेस्ट झाली. नेक्स्ट वीक टर्म एंड ची एक्साम आहे. क्लास मध्ये प्रिलियम एक्झाम घेणार आहेत. त्याचा अभ्यास करायचा आहे. आई तर सारखी अभ्यास कर म्हणून मागे लागलेली असते.

इतक्यात रिसेस संपल्याची घंटा वाजली. त्यामुळें पुढचं बोलणं तसचं राहील.

दृश्य ३: राधिकाचे घर

(रात्री, राधिका खोलीत एकटी बसून आहे. ती डायरीत लिहित आहे.)

राधिका: (डायरीत) मला वाटते मी वेडी झाली आहे. सगळीकडून अपेक्षा, सगळीकडून दबाव. मला स्वतःला उत्तर सापडत नाहीये. माझ्या आई वडिलांच्या माझ्याकडुन खुप अपेक्षा आहेत.

शाळेत देखील टीचर म्हणत होत्या, असाच चांगला अभ्यास कर, बोर्डाच्या परीक्षेत, आपल्या शाळेचं नाव उंचावशील तु,

आज सोनिया म्हणत होती, आई सारखी सारखी तिच्या मागे असते. अभ्यास कर म्हणून. मग माझे आई बाबा मला काहीच बोलत का नाही, काहीच प्रश्न विचारायचे नाहीत का त्यांना ? , त्यांच्याशी बोलल की टेन्शन उडून जात.

सगळे जण त्यांच्या करिअर बद्दल फोकस आहेत.सगळे फक्तं पर्सेंटेज, करिअर, अब्रॉड एज्युकेशन, रँक, फ्युचर प्लॅन बद्दलच बोलत आहेत. माझे आई बाबा काहीच का विचारत नाहीत. ? त्याचं वागणं मला टेन्शन वाढवत आहे.

सगळ्यांच्या माझ्याकडुन असलेल्या अपेक्षा बघून अभ्यास करायचं दडपण वाढत आहे. मी नाही त्यांच्या अपेक्षेला पात्र ठरले तर. ! विचार करून पण अंगाला थरथर सुटते. काय करू मी ?

(दरवाजा उघडला जातो. वडील आत येतात.)

वडील : राधिका, कशी आहेस?

राधिका : (डोळे पुसून) ठीक आहे बाबा.

वडील : अभ्यास कसा सूरू आहे.?

राधिका : चांगला.

(राधिका काही बोलत नाही.)

वडील : परीक्षेचं टेन्शन आलं आहे का ? तुला अस वाटतं आहे का, आपली आर्थिक परिस्थिती मुळे तुझ डॉक्टर व्हायचं स्वप्न अपूर्ण राहिल. मी आई असताना तु या गोष्टीचा विचार सुद्धा करू नको, तू फक्त अभ्यासावर लक्ष दे.

बाकी पैशाच बघायला आम्ही भक्कम आहोत. आताच्या टेस्ट मध्ये तुला थर्ड रँक मिळाला आहे. असाच चांगला अभ्यास केला तर पुढच्या परीक्षेत सेकंड रँक मिळेल. काळजी नको करू बाळा, तुला डॉक्टर बनवायचे आहे हे लक्षात ठेव.

तुझ्या भविष्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. तू तूझ्या मेहनतीवर, अभ्यासावर लक्ष दे. तुझ स्वप्न पुर्ण करण्यासाठी आम्ही दोघं कुठेही कमी पडणार नाही.

( बाबा तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात. तिचा अभ्यासाचा वेळ वाया जावू नये म्हणून गूड नाईट म्हणून निघून जातात. )

दृश्य ४ काउंसलचें लेक्चर

आज शाळेत करिअर काउंसलरला बोलावल होत. सगळे जण काउंसलरच बोलणं मनापासून ऐकत होते. ते सांगत होते

"तुझ्या भविष्याची चाबी तुझ्या हातात आहे"

नमस्कार, माझ्या मित्र मैत्रिणींनो,

आज आपण सर्वजण एकत्र आहोत, आपल्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्प्यावर. दहावी ही परीक्षा तुमच्या जीवनाची दिशा बदलण्याची शक्ती बाळगून आहे. या परीक्षेची तयारी करताना तुम्हाला अनेक प्रश्न पडत असतील, अनेक शंका असतील. करिअरची चिंता, भविष्याची चिंता, या सर्व गोष्टी तुमच्या मनात असतील.

पण, माझ्या मित्रांनो, चिंता करण्याचे काहीच कारण नाही. कारण, तुझ्या भविष्याची चाबी तुझ्या हातात आहे.

आजच्या युगात करिअरच्या अनेक संधी आहेत. तुला कोणते क्षेत्र आवडते, तुझी आवड काय आहे, याचा विचार करून तुला योग्य करिअर निवडता येते. पण, करिअर निवडण्या पूर्वी तुला स्वतःला चांगल्या प्रकारे ओळखून घेणे गरजेचे आहे. तुझ्या क्षमता काय आहेत, तुझी मजबूत बाजू काय आहे, याचा विचार करून तुला योग्य निर्णय घेता येईल.
अभ्यास करताना ताण येणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे.

पण, हा ताण तुझ्यावर हावी होऊ देऊ नकोस. हा ताण तुला अधिक मेहनत करण्यासाठी प्रेरित करतो. तुला लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रेरित करतो. पण, हा ताण जर नियंत्रणात न राहिला तर तो तुझ्यासाठी हानिकारक ठरू शकतो.

म्हणून, अभ्यास करताना तुला योग्य ब्रेक घ्यायला हवेत. खेळा, संगीत ऐका, मित्रांसोबत वेळ घालवा. या सर्व गोष्टी तुला तणाव मुक्त राहण्यास मदत करतील.

आपल्याला लक्षात ठेवायला हवे की, जीवन फक्त अभ्यासा पुरतं मर्यादित नाही. आपल्याला आपल्या आवडीच्या गोष्टी करायला हव्यात. आपल्या मित्रांसोबत वेळ घालवायला हवा. आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायला हवा. या सर्व गोष्टी आपल्याला एक संतुलित जीवन जगण्यास मदत करतील.

अखेरीला, मी तुम्हाला सांगू इच्छितो की, तुम्ही सर्वजण खूप हुशार आहात. तुम्ही सर्व काही करू शकता. तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. तुम्हाला तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुम्हाला कधीही हार मानू नये.

तुम्हाला कोणतीही अडचण असेल, काही प्रश्न विचारायचे असतील तर मला पर्सनली भेटा. पुढचा आठवडा भर मी तुमच्या शाळेत येणार आहे.
धन्यवाद.

( आज शाळेत करिअर आणि दहावीचं वर्ष, अभ्यासाचा ताण यांचा समन्वय कसा मॅनेज करायचा यावर एक काऊन्सिलर यांचं सेशन होत. सेशन झाल्यावर त्यांनी मुलांना काही शंका असल्यास बोलायला सांगितल होत. पुढचे चार दिवस त्या मॅडम स्कूल मध्ये काऊन्सिलींग साठी येणार होत्या. ज्यांना पर्सनली भेटायचं असेल तर ते विद्यार्थी भेटू शकतात.)

दृश्य ५: काउंसलरची कॅबिन

(राधिका काउंसलरला आपली समस्या सांगते.)

राधिका: माझ्या आई वडिलांच्या माझ्याकडुन खुप अपेक्षा आहेत. मी त्यांना माझ डॉक्टर बनण्याच स्वप्न सांगितल आहे. त्यासाठी त्यांनी मला बेस्ट एज्युकेशन, बेस्ट क्लास सगळं काही देत आहेत.

माझ्या अभ्यासात मला डिस्टर्ब होउ नये म्हणून बाबा तर घरी आल्यावर टिव्ही पण बघत नाहीत. त्या ऐवजी पार्ट टाईम जॉब करतात. आई देखील घर सांभाळून छोटया छोटया ऑर्डर घेत असते. माझ्या पुढच्या शिक्षणासाठी पैसे कमी नको पडायला.

नववीच वर्ष सूरू झालं तेव्हां पासुन ते दोघ शांत शांत झाले आहेत. ना एकमेकांशी नेहमी सारखे भांडणं करतात, ना एकमेकांवर रुसातात, सतत मला अभ्यास करताना त्रास होऊ नये म्हणून शांत असतात.

त्याचं वागणं, एकमेकांशी लुटू पुटू च भांडणं बघितलं की घर नॉर्मल असल्या सारखं वाटतं. हे सगळं शांत, गंभीर वागणं बघुन भविष्याच,अभ्यासाचं टेन्शन वाढवतात.

गेल्या तीन चार वर्षात त्या दोघांनी स्वतः काहीही नवीन वस्तू घेतली नाही. हे सगळं बोलून दाखवत नाही.
त्यांचं हे समजूतदार पणाच वागणं बघुन अभ्यासाचं टेन्शन वाढत आहे.

छोटया छोटया गोष्टी देखील लक्ष्यात ठेवायला अडचण येते आहे , मला अभ्यासाचा खूप ताण होतोय. मला काय करावे ते मलाच कळत नाही. सतत एकच प्रश्न सतावत असतो, मी जर आई वडिलांच्या माझ्याकडुन असलेल्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकले तर, माझं भविष्य अंधारात गुडूप होईल का ? सतत भीती वाटते.

काउंसलर :  राधिका, हे अगदी सामान्य आहे. अनेक विद्यार्थी या वयात अशा समस्यांना सामोरे जातात. तू रिझल्टच टेन्शन का घेते!

तू फक्त तुझ्या मेहनतीवर अभ्यासावर लक्ष दे, आई बाबा त्याचं वागणं या कडे दुर्लक्ष कर. ते फक्त तुला भविष्यात पैशाची कमतरता आहे म्हणून तूझ्या इच्छा तुला माराव्या लागू नये म्हणून स्वतः ला तयार करत आहेत.

राधिका : मग त्यांचं वागणं, त्याचं माझ्याशी बोलण, मला थर्ड रँक मिळाला तरी एकही प्रश्न न विचारता शांत राहणं, हे सगळं काय समजायचं! या आधी ते कधीच अस वागत नव्ह्ते. मला नेहमी माझ्या अभ्यासा बद्दल प्रश्न विचारायचे, माझं छोटया टल छोट यश साजर करायचे. मी कधी मागे पडली तर या वेळीं नाही जमल तर ठीक आहे. अजून थोडा प्रयत्न कर. या आधी च्या पेक्षा जास्त चांगल काम केले आहे. थोडी अजून सुधारणा कर. म्हणून प्रोत्साहन द्यायचे. मग आता अस का वागतात.?

काउंसलर : अग त्यांनी तुला प्रश्न विचारले तर तुला टेंशन येइल म्हणून काही विचारल नसेल. तु मला सांग तुला भविष्यात काय बनायचं आहे ? तू ज्यावेळी पंचवीस वर्षांची असशील तेव्हां तू स्वतः ला कुठं उभी राहिलेल इमॅजिन करते.

राधिका : मी मला स्वतः एक पांढरा कोट घातलेली मुलगी म्हणून इमॅजिन करते.

काउंसलर : मग ते स्वप्न पुर्ण करण्यासाठी तुलाच मेहनत घ्यावी लागेल ना! तुझ अंतिम लक्ष तर तू निवडलेल आहे. आता त्याच्या सोप्या पायऱ्या चढत जायचं आहे. त्याची पहिली पायरी म्हणजे ही दहावीची परिक्षा.

तू इतर कोणत्याही गोष्टीचा विचार करू नको. तुला द्रोणाचार्य आणि अर्जुनाची गोष्ट माहीत आहे ना. तसचं तुझं लक्ष अभ्यासावर केंद्रित कर.

कोण काय बोलतं, कसं वागत,त्यांच्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर,या सगळ्या जर तर च्या गोष्टी बाजुला ठेवून दे.

अपेक्षा फक्त स्वतः कडून ठेव. त्या साठी स्वतः अभ्यास कर. अभ्यासात नियमित पणा ठेव. सातत्य आणि सराव या गोष्टीवर भर दे. जुने सोडवले पेपर स्वतः वेळ लावुन स्वतः सोडवून बघ. स्वतः तपासून बघ. तू जर तो पेपर तपासत असताना एक परीक्षक असती, तर तू लिहिलेल्या उत्तराला किती मार्क देशील, तितके मार्क प्रामाणिक पणे दे, मग पेपरला किती मार्क मिळाले ते बघ.

तुला स्वतःला लक्ष्यात येईल, आपण पेपर लिहिताना कुठं चुकतो, आपल्याला सुधारणा करण्याची गरज कुठ आहे.

तुला ज्या शंका आहेत त्या टीचर ना, तूझ्या मित्र मैत्रिणी यांच्या सोबत डिस्कस कर, म्हणजे तुला टेन्शन येणार नाही.

हे बघ डॉक्टर म्हणजे फक्त अंगात पांढरा शुभ्र कोट, गळयात स्टेट्स स्कोप इतकचं काही नाही. मेडिकल फील्ड मध्ये अजून खुप शाखा उपशाखा आहेत. जर तुला मेडिकल फील्ड मध्ये करियर करायचं असेल तर सायकोलॉजी ,फिजीओथेरपी , नॅचरोपॅथी सारखे कोर्सेस उपलब्ध आहेत.फार्मसी, डेंटल कॉलेज, यांसारखे पर्याय पण आहेत. हॉस्पिटॅलिटी मॅनेमेंटमध्ये देखील करता येईल. हे सगळ विचार करायला दहावीची परिक्षा झाल्यानंतर खुप वेळ शिल्लक आहे.

सध्या तरी तू आनंदाने, शांत चित्ताने अभ्यास करण्यावर भर दे. तुला आई वडिलांच्या वागण्याचा, प्रश्न न विचारण्याचा त्रास होत असेल , तर घरी गेल्यावर त्यांच्याशी बोल.

त्यांना समजावून सांग , आई बाबा मला डॉक्टर बनायचं आहे. की अजून दुसर काही शिकायचं आहे ते सगळं ठरवायला वेळ आहे. दहावीची परीक्षा दिली की सुट्टी मध्ये या विषयावर विचार करू. आता फक्त मी दहावीच्या परीक्षेत चांगला परफॉर्मन्स देणार आहे. मेहनत मात्र शंभर टक्के करणारं आहे.

पण त्यासाठी तुम्हीं दडपण घेऊ नका. तुमच्या डेली रूटीन मध्ये कोणताही बदल करू नका. जसे आहात तसेच आनंदी रहा. तुम्हाला कोणते प्रश्न विचारायचे असतील तर समोरून विचारा, जस मला या आधी विचारत होता, फक्त तुम्ही दोघं आनंदी रहा.

म्हणजे मला अभ्यासावर लक्ष देता येईल, तुमच्या शांत राहण्याच, वागण्यात बदल करण्याचं दडपण येत, तुम्ही नेहमी सारखे माझे मित्र मैत्रिणी बनुन वागता तसेच आनंदी वागा, माझी चेष्टा करा, थोडंसं चिडवा , रागवा आणि

नंतर जसं प्रेमाने जवळ घायचा, लाड करायचे, चुक झाली समजून सांगायचे, अशीच प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे, तसचं वागा, मग अभ्यास करायला हुरूप येतो. तुमची साथ असेल तर सगळ काही सोप वाटतं.

राधिका : थँक्यु डॉक्टर , मी घरी जाऊन आई वडिलांच्या सोबत बोलते, त्यांना या आधी जसे ते माझ्याशी मैत्रीच्या नात्याने वागत होते तसेच आनंदी वागायला सांगते.

तुम्ही सांगितल तसं अभ्यास करायचा प्रयत्न करते. सातत्य, नियमित सराव, पेपर सोडवून स्वतः तपासून बघणं, अडलेली गोष्ट टीचर ना विचारणं, मित्र मैत्रिणी सोबत डिस्कस करण, हे सगळं आचरणात आणण्याचा प्रयत्न करेन. रिझल्ट ची चिंता न करता, शंभर टक्के मेहनत करण्यावर भर देईन.

राधिकाच्या चेहऱ्यावर आनंद होता. मनातल सगळ काही बोलून दाखवल्या मुळे हलक वाटतं होत.घुसमट मोकळी झाली होती. ती आजच आई वडिलांच्या सोबत बोलायचं मनाशी पक्के ठरवते.

(राधिका काउंसलरच्या सल्ल्यानुसार आपल्या आई-वडिलांशी बोलते आणि त्यांना आपली भावना सांगते.)

दृश्य ६ राधिकाच घर

घरी आल्यावर ती तिच्या आई वडिलांच्या सोबत बोलतं होती. समोर चहाचे रिकामे कप होते. राधिकाने काउन्सिलर सोबत जे काही बोलण झालं ते आई बाबाना समजावून सांगते. ते दोघ गप्प बसले होते. तिच बोलण संपल्यावर

बाबा : सॉरी राधा, आम्ही आमच्या वागण्यात, बोलण्यात बदल केला त्यामुळें तुला दडपण आलं. हे आम्हाला समजलंच नाही.

आम्हाला तुझ्यावर संपूर्ण विश्र्वास आहे. तू खरचं बोलतं आहेस, तुला भविष्यात काय बनायचं आहे त्याचा विचार करायला परीक्षे नंतरची संपूर्ण सुट्टी पडली आहे.

तू तुझे शंभर टक्के मेहनत करण्यावर लक्ष दे. आम्ही तुझ्या सोबत आहोत. आम्ही अजिबात आमच्या वागण्यात बोलण्यात बदल करणारं नाही.

आई : राधिका, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुझ्या स्वप्नांना साध्य करण्यासाठी आकाशात उंच भरारी घे.

आई: सॉरी राधा , आमच्या लक्षात आलं नाही, आम्ही आमच्या वागण्यात केलेला छोटा बदल तुझ्यावर दडपण आणतो आहे. तुला भविष्यात जे काही बनायचं आहे ते बन. पण ते आनंदाने कर. आम्ही तूझ्या सोबत आहोत.

बाबा : चल मी मॅच लावतो. यावेळी आय पी एल च्या मॅचेस बघायच्या राहिल्या आहेत. त्याचा रिपीट शो कुठं चालु असेल तर बघतो.

( हातात रिमोट घेत बाबा म्हणाले )

बाबा : आणि टीव्ही चा आवाज कमी करतो. चिडून नको बघु.

( शेवटचं वाक्य आई कडे बघत म्हणाले)

आई : चल मी मस्त पैकी जंक फूड बनवते. तुला हेल्दी फूड देण्याच्या नादात सतत कमी मसालेदार जेवण खात आहे. काय बनवू ? पास्ता, पिझ्झा की आणखी काही?

राधिका : आई मस्त पैकी, चरचरीत , झणझणीत तिखट मिसळ पाव बनव.

आई : हो चालेल, अहो, लेकीला मिसळ खायची इच्छा आहे, मी उसळ बनवते. तुम्ही पाव, शेव, फरसाण घेउन या.

बाबा : नंतर थोड गोड

( आईचा चिडलेला चेहरा बघून पुढचं बोलण विसरतात )

आई : गोड म्हणून गुलाब जाम प्रिमिक्स च पॅकेट घेउन या. आजीबात आईस क्रीम वगेरे काही आणायचं नाही. बाहेर बघा पाऊस पडतो आहे. आणि यांना आईस क्रीम खायचं सुचत आहे.

(आई लटक्या रागात शेवटचं वाक्य बोलते. शेवटीं हट्ट करून बाबांना पिशवी घेऊन सामान आणायला पाठवते. बाबांना मॅच बघायची आहे, म्हणून ते बाहेर जायला टाळाटाळ करत होते. नवरा बायको प्रमाणे भांडत होते.)

राधिका : (हसत) थँक्यु आई, बाबा. असेच लुटू पुटु ची भांडणं करत राहा. आनंदी राहा. आता कस घर नॉर्मल असल्या सारखं वाटतं आहे.

अंतिम दृश्य:

(राधिका शांत चित्ताने अभ्यास करत आहेत.आई किचन मध्ये तिच्या आवडीची मिसळ बनवत आहे.वडील नुकतेच सामान घेउन करुन घरी आले होते.ते शांत पणे टिव्ही बघत आहेत.फक्त टिव्ही चा आवज कमी ठेवला आहे.

राधिका तिच्या घराकडे समाधानाने पाहत आहेत. आता तिच घर हे नेहमी प्रमाणे चालू आहे. ना तिच्या मनावर आई जास्त काम करत आहे, याचं दडपण आहे, ना बाबांना त्यांच्या मनासरखा टिव्ही बघता येत नाही , याची खंत)

बॅक ग्राउंड ला एक गाणं मनात गुणगुणत होती,

सच होने के खातीर तो
सपने किंमत मंगेंगे

डॉक्टर बनायचं स्वप्न माझं आहे, मग त्यासाठी आई बाबांनी त्याच्या इच्छा का दाबायच्या ? तिच्या मनात एक विचार चमकून गेला.

(समाप्त)


🎭 Series Post

View all