संपदा (एक रहस्य) .....भाग २
(मागील भागात आपण पाहिले सखाराम शेतात गेल्यावर त्याला तेथील दृष्य पाहून धक्का बसला. आता पुढे.....)
त्याला तिथेच भोवोळ आल्यासारखी झाली. तो तिथेच खाली कोसळला. दुसऱ्या दिवशी सखारामला जेव्हा जाग आली, त्यावेळी तो दवाखान्यात होता. सारे अंग ठणकत होते, तोंडाचा भाग खूप दुखत होता, त्याने आजूबाजूला बघितले......... त्याची मुलगी संपदा आणि बायको शेजारच्या बाकावर बसून होत्या. त्यांचे डोळे रडून - रडून सुजल्यासारखे दिसत होते. त्याने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण, तो काहीच बोलू शकला नाही. उलट त्याचे तोंड जास्तच दुखायला लागले. त्याने हाताने त्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या दोन्ही हातांना सलाईन लावल्या होत्या. तेवढ्यात संपदा चे लक्ष वडिलांकडे गेले. त्यांना शुद्ध आलेली बघून तिला खूप आनंद झाला. तिने आईला पण ते सांगितले. त्या दोघी सखाराम जवळ गेल्या. बायकोने सखारामच्या डोक्यावरून हात फिरवला, संपदाने डॉक्टरांना बोलावून आणले. डॉक्टरांनी सखारामला तपासले व ते आता बरे आहेत व धोक्याच्या बाहेर आलेले आहेत असे सांगितले. काही दिवसात सखाराम घरी परतला. पण, तो आता काही बोलू शकत नव्हता. कारण........... त्यांची जीभ कापली गेली होती.
त्या रात्रीपासून सखाराम खूप घाबरून जगत होता. त्या रात्री त्याने बघितलेले दृश्य त्याच्या डोळ्यासमोरुन अजिबात जात नव्हते. आता संपदा आणि तिची आई शेतावर जाऊन काम करत होत्या .कारण सखाराम त्याला बसलेल्या धक्क्यातून सावरू शकला नव्हता.
............. एकेदिवशी गावामध्ये राहणाऱ्या सागर कुंभार चा मुलगा अचानक गायब झाल्याची बातमी साऱ्या गावभर पसरली. त्याचा मुलगा अगदी सात-आठ वर्षांचा होता. पुन्हा गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले............ सखाराम ची झालेली अवस्था साऱ्या गावाने बघितली होती. त्यामुळे गावाला त्या लहान मुलाची काळजी वाटत होती.आणि......., दोन दिवसानंतर काही गावकऱ्यांना त्या लहान मुलाचे शव तात्याराव पाटलांच्या विहिरीत तरंगताना दिसले. सगळा गाव या प्रकरणाने हादरला.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा