संपदा एक रहस्य भाग-३
(मागील भागात आपण बघितले सागरच्या मुलाच्या बातमीने अख्खा गाव हादरून गेला होता...आता पुढे....)
सागर ने व त्याच्या बायकोने मुलाचा मृत शरीर बघून हंबरडा फोडला होता पण गावातल्या प्रत्येक माणसाच्या मनात एकच प्रश्न उभा राहात होता की मुलाचं यांच्या विहिरीत कसं जेव्हा सखारामच्या कानावर ही बातमी आली तेव्हा तर त्याची भीतीने गाळणच उडाली होती त्याचं अंग थरथर कापत होता त्याच्या अंगाला दरदरून घाम फुटला तो तापाने फणफणला होता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि जे काही होत आहे ते भुता मुळेच असा सर्वांचा समज झाला तात्यारावांना तर काहीच समजत नव्हतं असं अचानक काय घडत होतं आधी सखाराम नंतर सागर चा मुलगा दोघांची जी काही अवस्था झाली ती त्यांच्या शेतामध्येच पोलिसांनी आता तत्यारवांकडे चौकशी चालू केली होती. तात्यारावांनी कधी स्वप्नातही आपल्या दारात चौकशीसाठी पोलिस येतील याची कल्पना केली नव्हती मागच्या वर्षीच तात्या रावांचा शहरात नोकरी करणारा तळा ताठा मुलगा अपघातांमध्ये मराठा पावला होता आता घरामध्ये ते दोघेच राहत होते तात्याराव यांची बायको आणि तात्याला एक मुलगी होती तिचेही लग्न झालेले होते व ती सासरी होती तात्याराव आंकडे एक इन्स्पेक्टर हवालदार चौकशीसाठी आले त्यांनी काही प्रश्न विचारले आणि मग ते सखाराम कडे चौकशीसाठी गेले.
इन्स्पेक्टर शंतनु एक रुबाबदार देखना प्रामाणिक इन्स्पेक्टर होता त्याच्यावर या केसची जबाबदारी त्याच्या वरिष्ठांनी सोपवली होती शेजारच्या गावच्या हम्मा पाटलाचा झालेला खून सखाराम ला झालेली मारहाण आणि छोट्या मुलाचा झालेला खून या सगळ्याचा कुठेतरी संबंध आहे असे शंतनुला वाटत होते.सखाराम कडे शंतनु आला त्यावेळी संपदा तिच्या मैत्रिणीकडे गेली होती.शंतनु ने सखाराम ला काही प्रश्न विचारले पण तो बोलू शकत नव्हता व तो शाळा शिकला नसल्याने त्याने काय पाहिले हे तो लिहूनही सांगू शकत नव्हता.सखाराम क्या इशाऱ्यांचा अर्थ कोणालाच लावता येत नव्हता.तेवढ्यात संपदा घरी आली.संपादने जेव्हा शंतनु ला बघितले तेव्हा तर ती त्याच्या पाहताक्षणी प्रेमात पडली.असा रुबाबदार तरुण आपल्या आयुष्यात यावा असे तिला वाटू लागले. शंतनु ने सखाराम च्या बायकोला ह्या कोण ? असे विचारले.त्यावेळी तिने हीच आमची मुलगी संपदा असे सांगितले.त्यावर संपादने शंतनु ल वडिलांना झालेल्या मारहाणी नंतर त्यांच्या मनावर थोडा परिणाम झाला असल्याचे सांगितले.त्यामुळे ते विचित्र हातवारे सारखे करत असतात असे सांगितले.
शंतनु आणि हवालदार चौधरी सागर च्या घरी जातात.तर दुसरीकडे संपदा ला जिकडे - तिकडे शंतनु च दिसत होता.तिच्या मनामध्ये त्याच्यासाठी प्रेमाचे अंकुर फुलले होते.तर शंतनु या सगळ्या गोष्टींपासून अनभिज्ञ होता.शंतनु सागरच्या घरी गेला त्यावेळी त्याच्या घरावर शोककळा पसरली होती.सागर आणि त्याची पत्नी आपल्या मुलाच्या मृत्यूने हादरून गेले होते.सगरची पत्नी अन्न - पाणी घ्यायलाही तयार नव्हती.शंतनु ने सागर ला एका बाजूला बोलावून चौकशी चालू केली........
शंतनु - तुम्हाला मुले किती ?
सागर - हाच माझा एकुलता एक मुलगा होता साहेब.(रडत)
शंतनु - तुमचं कोणाशी वैर आहे का?
सागर - नाही हो. आम्ही सरळ मार्गी शेतकरी माणसं.
आम्ही काय कोणाशी वैर ठेवणार.
शंतनु - तुमची कोणावर शंका आहे का ?
सागर - नाही.आमचा कोणावर संशय नाही.सगळे लोक म्हणतात भुताने मारला असल माझ्या पोराला....( हुंदके देत)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा