समुद्र किनारा

कविता
निळ्याशार लाटांवर
बेभानपणे उधळला वारा
केसांवरची बट करून बाजुला
रंग गुलाबी गाली तिच्या आला....१

समुद्र किनारी बांधून बंगले
वाळूचे घर स्वप्नांचे सुंदर
हाती हात घेऊन माझा
साक्षीला आहे मावळता सिकंदर.. २

नि:शब्द मनाचे अबोल प्रेम हे
लाटांच्या गाजात विरून जाते
हरवून जातो नकळतपणे तुझ्यात
निवांत क्षणाची सोबत करते....३

कधी तप्त तर कधी थंड वाटे
वाळूत सापडे शंख, शिंपले, मोती
चौफेर नजर टाकताच भासे
समुद्र किनारी हिरवळ भासते....४

©® अश्विनी मिश्रीकोटकर