"गागर मे सागर असतो आई..." ती म्हणाली
"सूक्ष्माकडे जाताना स्थूल रूप विसरता येत नाही बाळ..."मी म्हणाले
"स्थूल रूप छिन्नविच्छिन्न झाले की सूक्ष्म वेगळे करावे लागते." ती म्हणाली
"छिन्नविच्छिन्न झालेले गोळा करता येतेच की..."
"गोळा केले तरी अखंड, सलग होत नाहीच...ओबडधोबड दिसते."
" ज्याच्याकडे चौदा रत्ने आहेत त्याने दिसण्याची पर्वा कशाला करावी ?"
"चौदा रत्ने मंथन करून उपसून घेतली जातात आई. तिथं देवही मागे राहत नाहीत."
"मोती-पोवळ्यांचा खजिना द्वारकेच्या कणाकणात लपवून ठेवणाऱ्या समुद्राला चौदा रत्नांचा मोह नसावा." मी म्हणाले
"आई...तुला समुद्र तळापासून माहीत आहे." ती म्हणाली
"माझेही वडील भिक्षुकी करायचे ना..."
"कसे गेले ते ?"

"बायकोचे श्राद्ध करायला गेले होते. समुद्राने ओढून नेले." मी म्हणाले
"तरी तुला समुद्र आवडतो."
"मुक्ती दिली ना त्याने वडिलांना...कॅन्सर होता...खूप काळ तडफडत राहिले असते, एकदाच गुदमरून गेले." मी म्हणाले
"समुद्र दयाळू असतो."
"असतोच...पण स्वतःवर झालेला अन्याय सहन करत नाही."
"आता मला कळलं..." ती थांबली
"काय कळलं ??"
"मी तुला आई का म्हणते ?"
"का ?"
"काही नाही..."
"तरी..."
"मी समुद्र आहे...मी समुद्र आहे..." ती ओरडायला लागली
दवाखान्याचे छप्पर फाटेल अशी ओरडायला लागली. तिला घेऊन गेले. इंजेक्शन देऊन झोपवले गेले. मी आणि डॉक घरी आलो. चारी बाजूनी वेढलेल्या समुद्रात मी एकटीच होते. बुद्धीच्या लाकडी फळकुटाचा आधार घेत तरंगत होते. किनारा नजरेला दिसत नव्हता. रात्र वरवर चढत होती. कधी निद्रा, कधी ग्लानी तर कधी पूर्ण शुद्धीत...मी समुद्रात गारठत चालले होते. ध्रुवाचा तारा अंधाराची शाल ओढून बसला होता.
दिशांचे भान गेले होते. विजा कडाडत होत्या, तुफान पाऊस सुरू झाला होता. ढगांचा गडगडाट अखंड होत होता.
"माया...उठ...माया..." डॉकचा कातर आवाज कानावर येत होता.
मी खाडकन जागी झाले.
"काय झालं ?" मी विचारलं
"प्राजक्ताने पेटवून घेतलं माया...स्वयंपाकघरात जाऊन आतून दार लावून घेतलं आणि...तेलाचा डब्बा अंगावर ओतून घेतला, प्राजक्ताने पेटवून घेतलं."
मनू दिसला नव्हता...समुद्र पेटला...कुणालाही उद्धवस्त न करता आतून-बाहेरून पेटून उठला. समुद्र फार दयाळू असतो. स्वतःला पेटवून घेतले. समुद्र पेटला...!!

डॉ. नयनचंद्र सरस्वते
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा