चॅम्पियन्स ट्रॉफी - २०२५
जलदकथा लेखन
जलदकथा लेखन
आई की सासू भाग ३
©® सौ.हेमा पाटील.
तुषार आपल्या रुममध्ये आला. आईची नजर त्याला बोचली होती. त्यामुळे तो तिथे थांबला नाही. प्रज्ञा आपला डबा घेऊन रुममध्ये आली. स्वतःची तयारी करून त्याला बाय करून निघून पण गेली. स्वयंपाकघरात जे काही घडले होते त्याचा मागमूसही तिच्या चेहऱ्यावर दिसला नाही.
ती गेली आणि मीनाताई त्यांच्या रुममध्ये शिरल्या.
"काय रे? आज तुला जायचे नाही का ऑफिसला?" त्यांनी विचारले.
"जायचेय ना. माझीही सुट्टी संपलीय."
"मग इथे का बसलायस येऊन?"
"आई, तू ऐकलेस ना सकाळी?" तुषार म्हणाला.
"हो, ऐकले."
आई फक्त एवढेच बोलली. ते ऐकून तुषारला आणखी टेन्शन आले.
"मला आज डबा नको. मी ऑफीसमध्ये खाईन काहीतरी." असे म्हणत तुषार उठला आणि स्वतःची तयारी करू लागला.
"मी पटकन बनवते. डबा घेऊनच जा. चहा ठेवतेय, घ्यायला ये." असे म्हणत मीनाताई रुममधून बाहेर पडल्या.
तुषार तयारी करुन स्वयंपाकघराच्या दिशेने निघाला होता. त्याच्या मनाला अपराधी वाटत होते.
तो डायनिंग टेबलपाशी बसला. मीनाताईंनी त्याला चहा आणून दिला. चहा पिऊन झाल्यावर तो म्हणाला,
"मी काही मदत करू का तुला?"
"नको. करते मी. जिने मदत करायला हवी होती ती तर गेली निघून." मीनाताई पोळी लाटताना म्हणाल्या. भाजी टाकली आहे फोडणीला, दोन पोळ्या झाल्या की घेऊन जा डबा."
यावर तो काही बोलला नाही. काय बोलणार? इकडे आड तिकडे विहीर अशी त्याची अवस्था झाली होती. आजचा तर पहिलाच दिवस होता.
मुकाट्याने डबा घेऊन तो बाहेर पडला.
मुकाट्याने डबा घेऊन तो बाहेर पडला.
रात्री त्याला यायला उशीर झाला. तो आला तेव्हा सगळ्यांची जेवणे सुरू होती. मृगया आणि प्रज्ञाची बडबड सुरू होती. आई बाबा शांतपणे जेवत होते. तो आल्यावर मीनाताई त्याला म्हणाल्या,
"फ्रेश होऊन ये. तुझे ताट करते."
तो पण दमला होता. हातपाय धुवून तो आला तोपर्यंत मीनाताईंनी ताट केले होते.
तो पण दमला होता. हातपाय धुवून तो आला तोपर्यंत मीनाताईंनी ताट केले होते.
रात्री बेडरूममध्ये त्याने विचारले,
"कधी आलीस कामावरून?"
"तुझ्यापुढेच आले. लांब जावे लागतेय. आधी मी अंधेरीतच हाॅस्टेलमध्ये रहायचे. त्यामुळे प्रवासाचा त्रास होत नव्हता. इथून चांगलेच दूर आहे."
तिला दररोज हा त्रास घ्यावा लागणार होता, तसेच वेळही जाणार होता हे त्याच्या लक्षात आले.
तिला दररोज हा त्रास घ्यावा लागणार होता, तसेच वेळही जाणार होता हे त्याच्या लक्षात आले.
त्यांनी ठरवलं की, दोघं एकमेकांसोबत अधिक वेळ घालवतील आणि छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतील.
दुसऱ्या दिवशी सकाळी ती आपला डबा बनवून घेऊन गेली तेव्हा तो स्वयंपाकघरात आला.
"आई, जरा चौकशी कर आपल्या भांडी फरशीला येणाऱ्या मावशीकडे. जेवण बनवण्यासाठी कुणी बाई आहे का? किंवा शेजारी विचार. आपल्याकडे दोन्ही वेळचा स्वयंपाक करायला बाई लावायची आहे." तुषार म्हणाला.
"काय? आता बाईच्या हातचे खायचे का? आयुष्यभर मी स्वतःच्या हाताने जेवण बनवले. सुनेच्या हातचे खायचे तर तिला जमत नाही, वेळ नाही." मीनाताई कडवटपणे म्हणाल्या. त्यांचा सुनेवरचा रोष लक्षात आला आणि तुषार म्हणाला,
"आई, तुझा काळ वेगळा होता. डोंबिवलीपासून अंधेरीपर्यंत प्रवास करणे सोपे नाही हे मला माहित आहे. लोकलला किती गर्दी असते हे मी तुला सांगायला नको, शिवाय तिथे जाऊन नऊ तास काम करायचे असते तिला. बरं, नुसत्या पाट्या टाकायच्या नाहीत तर जबाबदारीचे काम असते. हातून काही चूक झाली तर ती खूप महागात पडते. त्यामुळे प्रत्येक मिनिटाला सजग असावे लागते."
"तिला घरात येऊन पंधरा दिवस झाले नाहीत तर लगेच तिची बाजू घ्यायला लागलास, अन् आई आयुष्यभर खपतेय त्याचे काहीच नाही." असे म्हणत मीनाताईंनी डोळ्याला पदर लावला.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
काय होते पुढे? तुषारने घेतलेला निर्णय मीनाताई मान्य करतात का? की यावरुन घरात वाद होतात? हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग वाचावा.
काय होते पुढे? तुषारने घेतलेला निर्णय मीनाताई मान्य करतात का? की यावरुन घरात वाद होतात? हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग वाचावा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा