सनईच्या सुरात गुपित...भाग 2
सायलीने हळुवार हातांनी ती लाकडी पेटी उघडली. आत प्रेमपत्रांचा गठ्ठा नीट रचलेला होता, जणू त्यांना काळानेही स्पर्श केला नव्हता. जुन्या काळातील चकचकीत अक्षरात लिहिलेलं पहिलं पत्र तिने अलगद उचललं.
अनिरुद्धकडे बघितलं,
"वाचू?" तिने इशाऱ्याने त्याला विचारलं.
"वाचू?" तिने इशाऱ्याने त्याला विचारलं.
तिच्या लक्षात आलं की रोहन तिथेच उभा आहे.
"रोहन बाळा जरा हा अल्बम ठेऊन येतोस का?"
"हो आई."
रोहन तिथून निघून गेला.
सायलीने पत्र उघडणार तो पुन्हा परत आला.
धापा टाकत,
"आई मी आलोय."
सायली आणि अनिरुद्धने एकमेकांकडे बघितलं.
"रोहन अरे तू परत का आलास?"
"तूच म्हणालीस ना अल्बम ठेऊन येतोस का."
"मी आणि बाबा कामात आहोत तू जा बघू इथून."
"हो जातो ना, पण जाता जाता आजीला सांगून जातो."
"कारट्या..."
सायली काही बोलणार तो धावत सुटला.
सायलीने पत्र वाचलं.
"प्रिय सरस्वती,
तुझ्या त्या नाजूक हातांनी विणलेल्या स्वेटरमधला ऊब अजूनही मला जाणवतोय. तू विणताना घेतलेला प्रत्येक धागा माझ्यासाठी एक आठवण आहे.
तुझ्या त्या नाजूक हातांनी विणलेल्या स्वेटरमधला ऊब अजूनही मला जाणवतोय. तू विणताना घेतलेला प्रत्येक धागा माझ्यासाठी एक आठवण आहे.
तुझा,
आर. "
आर. "
सायलीने अनिरुद्धकडे आश्चर्याने बघितलं.
"आर? म्हणजे तुमचे बाबा?"
अनिरुद्धने हातात पत्र घेतलं आणि तो थोडा गोंधळला.
"आई-बाबांचं प्रेमविवाह नव्हतं ना? मग हे पत्र कोणाचं?"
सायलीला कुतूहल दाटून आलं.
सायलीला कुतूहल दाटून आलं.
"मी ही हाच विचार करतोय."
तिच्या सासूबाई सरस्वती कायम प्रेमळ आणि शांत स्वभावाच्या होत्या. त्यांचा एक वेगळाच करारीपणा होता. पण त्यांनी त्यांच्या जुन्या आयुष्याबद्दल फारसं कधीच सांगितलं नव्हतं, त्या तश्याही कमी बोलायच्या. एखादा कप्पा कसा आपण बंद करून ठेवतो तसं त्यांनी केलं असावं.
दोघेही पेटी घेऊन खाली बसले.
"आपल्या आईच्या आयुष्यात काहीतरी होतं जे आपण कधीच जाणलं नाही." अनिरुद्ध विचारात बुडाल्यासारखा म्हणाला.
"उरलेली पत्रं वाचायची का?" सायलीने विचारलं.
अनिरुद्ध थोडा गोंधळला.
"आईला विचारू का?"
"आईला विचारू का?"
"अरे, त्यांनी जर ही पत्रं इतकी वर्षं उघडून बघितली नाहीत, तर त्याचा अर्थ त्यांना ते आठवणही नकोय. पण आपल्याला त्यांच्या भूतकाळाविषयी थोडं कळलं तर काही हरकत नाही ना?"
"अग पण सायली."
"अनिरुद्ध पण बिन काही नाही, काही गोष्टींचा उलगडा झाला तर काय बिघडणार आहे."
अनिरुद्धला सायलीचं म्हणणं पटल्यासारखं झालं, त्यांनी एक एक करून पत्र वाचायला सुरुवात केली.
त्या पत्रांमधून एक वेगळीच प्रेमकहाणी उलगडू लागली.
सरस्वती आणि आर. म्हणजेच 'रामकृष्ण'
रामकृष्ण आणि सरस्वती कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते. रामकृष्ण एक गुणी, हुशार पण गरीब कुटुंबातून आलेला मुलगा होता. सरस्वती एका प्रतिष्ठित कुटुंबातली. दोघांचं प्रेम खुलत चाललं होतं, पण सरस्वतीच्या वडिलांना हे मान्य नव्हतं.
"सरस्वती, मी तुला आणखी काहीच देऊ शकत नाही, पण माझं मन कायम तुझंच असेल," एका पत्रात रामकृष्णने लिहिलं होतं.
सायलीच्या डोळ्यात एक वेगळंच आकर्षण आलं.
"हे तर एखाद्या चित्रपटासारखं आहे, म्हणजे आईचं पहिलं प्रेम कोणी दुसराच होता?"
तिने दुसरं पत्र वाचलं, त्यात एक कविता लिहिली होती.
"मृगजळापरी भास तुझे
जवळ जाता नसतेस तू
ये ना लवकर परतुनी
का असे छळतेस तू...
ये ना आता सावरायला
तोल सारखा जातोय माझा
सुकलेत आता डोळे माझे
अश्रू तरी कुठून आणू आता...
तोल सारखा जातोय माझा
सुकलेत आता डोळे माझे
अश्रू तरी कुठून आणू आता...
संपले आहे सारे आता
उरला फक्त विरह सोबती
दूर दिसणाऱ्या सखीला
मन साद माझे घालती...
उरला फक्त विरह सोबती
दूर दिसणाऱ्या सखीला
मन साद माझे घालती...
अनिरुद्ध शांत होता.
"पण मग आईने बाबांशी लग्न का केलं?"
त्यांना अजूनही संपूर्ण कथा उमगली नव्हती.
सायलीने पेटीत अजून चाळून पाहिलं आणि तिथे एक जुना पिवळसर पडलेला फोटो सापडला. त्यात तरुण सरस्वती एका तरुण मुलासोबत उभी होती, तोच रामकृष्ण असावा.
"तुला वाटतं, अजून काही पत्रं किंवा फोटो असतील?" सायलीने विचारलं.
"कदाचित, पण हे कसं शोधायचं?" अनिरुद्ध विचारात पडला.
"आपल्या घरातल्या मोठ्या मंडळींना विचारू शकतो ना?"
"नाही नको, हे योग्य वाटणार नाही."
"पण.."
"नको सायली, असं घरच्यांना आई विषयी विचारणं योग्य वाटणार नाही, आईला कळलं तर काय वाटेल."
सायली विचारात गढली होती.
"काय विचार करतेस?"
"अनिरुद्ध ही पेटी इतक्या वर्षात कधी आपल्या नजरेस पडली नाही आणि आजच कशी ही आपल्या नजरेसमोर आली."
"हो ग विचार करण्यासारखंच आहे."
"ही पेटी इथे आहे हे आईला माहीतही नसेल, त्या तर सरू आणि विजू सोबत बिझी आहेत."
"एक मिनिट सायली, काल हरीकाकांनी स्टोअररूमची साफसफाई केली, आय एम डॅम शुअर हरीकाकांनी ही पेटी इथे आणून ठेवली आणि नंतर ते परत ठेवायला विसरले."
"ते काहीही असो पण आता माझी उत्सुकता वाढली आहे, काय घडलं असेल आईंच्या आयुष्यात?"
सायलीला सरस्वतीच्या भूतकाळाबद्दल अधिक जाणून घ्यायचं होतं.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा