सनईच्या सुरात गुपित...भाग 7
सायलीने अनिरुद्धकडे पाहिलं.
"आपल्याला अजून शोध घ्यायला लागेल. या मृत्यूंच्या मागचं सत्य बाहेर काढायलाच हवं."
आणि तिथेच त्या जुन्या वडाच्या झाडाखाली एका गूढ प्रवासाला खरी सुरुवात झाली...
ते जायला निघाले तस नरेंद्रने आवाज दिला.
"थांबा.."
"काय झालं काका."
"एक मिनिट कपाटात पुन्हा एक पॅकेट दिसलं होतं." तो आठवत बोलला.
लगेच आत जाऊन त्याने कपाटातून पॅकेट आणला.
सायलीने ते पत्र उघडलं,
प्रिय सरस्वती,
माझ्या आयुष्यात मला सर्वात मोठा आनंद तुझ्या सहवासात मिळाला. तुझ्या प्रेमाने मला उभं केलं पण तुझ्या वियोगाने मी खूप काही गमावलं. मी आयुष्यभर समाजासाठी लढलो, पण माझ्या स्वतःच्या आयुष्याला मी न्याय देऊ शकलो नाही.
आज माझ्या समोर एक मोठा धोका आहे. काही लोक माझ्या विरोधात आहेत. मला वाटतं की मी फार काळ राहणार नाही. पण एक सांगतो मी तुला कधीच दोष दिला नाही. तू मला नेहमीच प्रेरणा दिलीस.
माझ्या आयुष्याचा शेवट होईल पण माझ्या आठवणी कायम राहतील आणि त्या आठवणींमध्ये एक सुंदर चेहरा असेल तो तुझाच चेहरा असेल.
माफ कर मला सरस्वती, मी तुला वचन दिलं होतं की मी मोठा होऊन परत येईन. पण ते पूर्ण करू शकलो नाही.
तुझा,
रामकृष्ण..."
आज माझ्या समोर एक मोठा धोका आहे. काही लोक माझ्या विरोधात आहेत. मला वाटतं की मी फार काळ राहणार नाही. पण एक सांगतो मी तुला कधीच दोष दिला नाही. तू मला नेहमीच प्रेरणा दिलीस.
माझ्या आयुष्याचा शेवट होईल पण माझ्या आठवणी कायम राहतील आणि त्या आठवणींमध्ये एक सुंदर चेहरा असेल तो तुझाच चेहरा असेल.
माफ कर मला सरस्वती, मी तुला वचन दिलं होतं की मी मोठा होऊन परत येईन. पण ते पूर्ण करू शकलो नाही.
तुझा,
रामकृष्ण..."
सायली आणि अनिरुद्ध काही क्षण स्तब्ध राहिले. त्या पत्राने संपूर्ण चित्र स्पष्ट झालं.
रामकृष्णला त्याच्या कामामुळे शत्रू मिळाले होते. त्याचा मृत्यू केवळ अपघात नव्हता, तर एक नियोजित कट होता. आणि सरस्वतीने हे जाणूनही त्याच्या आठवणींना शांतपणे आपल्या मनात जपलं होतं.
सायली आणि अनिरुद्ध घरी परतले त्यांचं मन भावनांनी भारावलेलं होतं.
सायलीने त्या रात्री सरस्वतीला हळूच विचारलं,
"आई तुम्ही कधीच रामकृष्णजींच्या मृत्यूबद्दल चौकशी केली नाही का?"
त्यांनी मंद हसत उत्तर दिलं,
"कधी कधी सत्य माहीत असतानाही ते उगाळण्यात अर्थ नसतो बाळा. मी त्याला न्याय मिळावा म्हणून काही करू शकले नसते. पण त्याच्या आठवणींना शांतपणे जपणं हाच त्याच्यासाठी माझा न्याय होता."
सायलीने त्यांना घट्ट मिठी मारली.
सायली दुसऱ्या दिवशी सकाळी सरस्वतीच्या खोलीत गेली,
"आई चहा आणलाय."
"अग तू का घेऊन आली, मी आले असते दिवाणखान्यात."
"असू द्या हो, तेवढंच तुमच्याशी बोलणं होईल."
"म्हणजे अजून काहीतरी बोलायचंच आहे."
"तुम्ही बसा आणि चहा घ्या."
सरस्वतीने हसत हातात कप घेतला आणि बसली.
"आई तुम्ही कधी रामकृष्णजींच्या मृत्यूनंतर चौकशी केली होती का?"
सरस्वती शांत होऊन काही वेळ विचार करत राहिल्या.
"सायली काही वेळा उत्तर शोधण्यापेक्षा काही प्रश्न न विचारलेले बरे असतात." त्या शांतपणे म्हणाल्या.
"पण आई तुम्ही त्यांना इतकं ओळखत होतात, त्यांच्यावर विश्वास होता मग तुम्ही हे सहजपणे कसं स्वीकारलंत?"
त्यांनी सायलीकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाल्या,
"कारण मला माहीत होतं की सत्य शोधायला गेले असते तर काही नाती तुटली असती."
सायली गोंधळली.
"म्हणजे?"
"म्हणजे?"
"रामकृष्ण फक्त माझा मित्र नव्हता, त्याच्या मृत्यूच्या मागे काही लोक होते जे कदाचित माझ्या जवळचे होते. मी चौकशी केली असती तर कदाचित माझ्या कुटुंबावर परिणाम झाला असता."
सायली स्तब्ध झाली.
"म्हणजे हे कोणीतरी घरातलंच होतं?"
सरस्वतीने काहीही उत्तर दिलं नव्हतं, फक्त नजर फिरवली.
सायलीच्या मनात आता नव्या संशयाने जागा घेतली
सायली आणि अनिरुद्धने एकत्र बसून या गोष्टीचा मागोवा घ्यायचं ठरवलं.
"आपल्याला रामकृष्णजींच्या शेवटच्या काही दिवसांबद्दल माहिती मिळवावी लागेल." सायली म्हणाली.
"पण आपण कोणाला विचारणार?"
सायलीला आठवलं, रामकृष्णजींना ओळखणाऱ्या काही जणांबद्दल त्यांच्या पत्रांमध्ये उल्लेख होता. त्यात एक नाव होतं जोशी मास्तर.
जोशी मास्तर म्हणजे रामकृष्णजींच्या सामाजिक कार्यालयातील एक सहकारी होते. ते अजूनही जिवंत असतील का?
सायलीने लगेच शोध घ्यायला सुरुवात केली. काही चौकशीनंतर तिला कळलं की जोशी मास्तर अजूनही गावात एका वृद्धाश्रमात राहत होते.
सायली आणि अनिरुद्ध वृद्धाश्रमात पोहोचले. जोशी मास्तर आता वयस्कर झाले होते पण अजूनही त्यांच्या डोळ्यांत तेज होतं.
"रामकृष्णबद्दल चौकशी करायला आलात?" त्यांनी थेट विचारलं.
सायली आणि अनिरुद्ध एकमेकांकडे पाहू लागले.
"हो." अनिरुद्ध म्हणाला.
"हो." अनिरुद्ध म्हणाला.
"आम्हाला त्याच्या मृत्यूबद्दल खरी माहिती हवी आहे. खूप शोधाशोध केल्यानंतर आम्ही इथवर पोहोचलो आहोत."
जोशी मास्तरांनी दीर्घ श्वास घेतला आणि हळूवारपणे बोलू लागले.
"रामकृष्ण एक प्रामाणिक माणूस होता. त्याचं सामाजिक कार्य काही लोकांना नको होतं. तो भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत होता. काही मोठ्या नावांबद्दल त्याने पुरावे गोळा केले होते."
कोणत्या नावांबद्दल?" सायली अधीरतेने म्हणाली.
क्रमशः
ऋतुजा वैरागडकर
सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेज वर येतील त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा