सनईच्या सुरात गुपित...भाग 8
"रामकृष्ण एक प्रामाणिक माणूस होता. त्याचं सामाजिक कार्य काही लोकांना नको होतं. तो भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत होता. काही मोठ्या नावांबद्दल त्याने पुरावे गोळा केले होते."
"कोणत्या नावांबद्दल?" सायली अधीरतेने म्हणाली.
जोशी मास्तर थोडा वेळ थांबले आणि मग हळूच म्हणाले,
"देशमुख कुटुंबाच्या एका व्यक्तीचा त्यात सहभाग होता."
सायली आणि अनिरुद्ध दोघेही धक्का बसल्यासारखे स्तब्ध झाले.
"कोण आहे ती व्यक्ती?" अनिरुद्धच्या आवाजात तणाव स्पष्ट दिसत होता.
जोशी मास्तरांनी डोळे बंद केले आणि थोड्या वेळाने हळूच पुटपुटले,
"सुदर्शन देशमुख."
सायली आणि अनिरुद्धला जणू विजेचा धक्का बसला. सुदर्शन देशमुख म्हणजे कोण?
"ते कोण?" सायलीने विचारले.
जोशी मास्तरांनी खोल आवाजात उत्तर दिलं,
"तुमच्या वडिलांचा लहान भाऊ."
सायली आणि अनिरुद्ध घरी परतले पण त्यांच्या मनात आता प्रचंड गोंधळ माजला होता.
"आईने कधीही सुदर्शन काकांबद्दल काही सांगितलं नव्हतं." अनिरुद्ध म्हणाला.
"कारण त्या सत्यापासून लांब राहायचं ठरवून बसल्या होत्या." सायली म्हणाली.
त्यांनी घरी आल्यावर लगेचच सरस्वतीला विचारायचं ठरवलं.
सायलीने थेट मुद्द्यावर येत विचारलं,
"आई सुदर्शन काका कोण होते?"
सरस्वतीने कपाळावर आठ्या घातल्या.
"तुम्हाला हे नाव कुठे ऐकायला मिळालं?"
जोशी मास्तरांनी सांगितलं ते म्हणाले की रामकृष्णजींच्या मृत्यूमध्ये त्यांचा काहीतरी सहभाग होता."
सरस्वती गप्प झाल्या, त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तणाव उमटला.
"आई हे खरं आहे का?"
त्यांनी डोळे मिटले आणि मंद स्वरात म्हणाल्या,
"हो."
सायली आणि अनिरुद्ध दोघंही हादरले.
"हो."
सायली आणि अनिरुद्ध दोघंही हादरले.
"सुदर्शन राजकारणात होते आणि काही लोकांशी त्यांचे संबंध होते. रामकृष्ण भ्रष्टाचाराच्या विरोधात पुरावे गोळा करत होता आणि त्या पुराव्यांमध्ये सुदर्शनचं नाव होतं."
"म्हणजे त्यांनी." सायलीने धक्का बसल्यासारख्या आवाजात विचारलं.
"त्यांनीच रामकृष्णला संपवलं."
सायली आणि अनिरुद्ध गप्प बसले.
संपूर्ण सत्य त्यांच्या समोर स्पष्ट झालं होतं.
संपूर्ण सत्य त्यांच्या समोर स्पष्ट झालं होतं.
रामकृष्ण देशमुख यांचा मृत्यू फक्त एक अपघात नव्हता. तो एका कौटुंबिक कटाचा परिणाम होता.
आता एकच प्रश्न होता त्यांनी पुढे काय करायचं?
आता एकच प्रश्न होता त्यांनी पुढे काय करायचं?
सायली आणि अनिरुद्ध गोंधळले होते. रामकृष्णजींच्या मृत्यूसाठी त्यांच्याच कुटुंबातील व्यक्ती जबाबदार होती हे त्यांना पचवणं अवघड जात होतं.
"आई तुम्ही हे सत्य इतकी वर्षं लपवून ठेवलं?" सायलीचा स्वर थोडा कडवट झाला.
त्यांनी शांतपणे तिच्याकडे पाहिलं.
"सायली कधी कधी सत्य उघड केल्याने जुन्या जखमा अधिक खोल होतात. मी त्या भूतकाळाशी झगडले आहे पण मला ठाऊक होतं की माझ्या निर्णयाने तुम्हा दोघांवर परिणाम होऊ नये."
"पण त्यांना शिक्षा नाही झाली? कोणीच काही केलं नाही?" अनिरुद्धने विचारलं.
सरस्वतीने दीर्घ श्वास घेतला.
"सुदर्शनराव यांचा प्रभाव मोठा होता. त्यांच्याविरोधात कोणी पुरावा ठेवला असता तरी त्याचा काही उपयोग झाला नसता."
"म्हणजे आपण काहीच करू शकत नाही?" सायली निराशपणे म्हणाली.
त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
"काही वेळा न्याय मिळवण्यासाठी प्रत्यक्ष लढणं गरजेचं असतं पण काही वेळा शांत बसूनही गोष्टी उलगडतात. तुम्ही हा निर्णय घ्या की तुम्हाला काय करायचं आहे."
सायली आणि अनिरुद्ध एकमेकांकडे पाहू लागले. आता त्यांच्यासमोर एक मोठा प्रश्न होता की या सत्याचा पुढे काय उपयोग करायचा?
सायली रात्री शांतपणे विचार करत बसली होती. तिने अनिरुद्धकडे पाहिलं.
"आपण एवढ्या मोठ्या सत्यापर्यंत पोहोचलो आहोत पण आपल्याकडे ठोस पुरावे नाहीत. आपल्याला काहीतरी सापडायला हवं."
अनिरुद्धने मान डोलावली.
"आपण अजून शोधू शकतो, जोशी मास्तरांनी म्हटलं होतं की रामकृष्णजींनी काही पुरावे गोळा केले होते. ते कुठेतरी असतीलच."
"पण ते गेले तेव्हा त्यांचं सामान कुठे गेलं?" सायली विचार करू लागली.
त्याचवेळी तिला आठवलं गावात अजूनही रामकृष्णजींचं एक जुनं घर होतं. कदाचित तिथे काही मिळू शकेल.
सायली आणि अनिरुद्ध दुसऱ्याच दिवशी त्या जुन्या घराकडे गेले. घर खूप दिवसांपासून बंद होतं, धूळ साचलेली होती, पण त्या घरात अजूनही एक वेगळं वातावरण होतं. जणू काही भूतकाळ तिथे अडकून राहिला होता.
"इथे काही सापडेल का?" अनिरुद्धने विचारलं.
"बघायला काय हरकत आहे?" सायली म्हणाली.
ते दोघं आत गेले आणि कपाट, पेट्या उघडून शोधू लागले. काही वेळाने सायलीच्या नजरेत एक जुनी धूळ साचलेली पेटी भरली.
तिने हळूच ती उघडली. त्यात काही जुनी पत्रं, काही फाटलेले कागद आणि एक बंद लिफाफा होता.
सायलीने तो उघडून पाहिला आणि तिच्या हृदयाचा ठोका चुकला.
तो एक लेखा-जोडपत्र होतं,
ज्यात सुदर्शन देशमुख यांनी मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केल्याचा स्पष्ट उल्लेख होता.
ज्यात सुदर्शन देशमुख यांनी मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केल्याचा स्पष्ट उल्लेख होता.
"अनिरुद्ध हे बघ रामकृष्णजींना हे सापडल्यामुळेच त्यांना संपवलं गेलं असावं."
अनिरुद्धने तो कागद पाहून गडबडीत फोन काढला.
"आपण लगेच हे कुणाला तरी द्यायला हवं. कदाचित हेच पुरावे आपल्याला न्याय मिळवून देतील."
क्रमशः
ऋतुजा वैरागडकर
सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेज वर येतील त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा